Current Affairs (चालू घडामोडी) of 18 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | एच. एस. ब्रह्मा यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड |
2. | नर्मदा नदीच्या कालव्यावर उभारला ऊर्जा निर्मिती प्रकल्प |
3. | अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार पुरस्कार |
एच. एस. ब्रह्मा यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड :
- 15 जानेवारी 2015 रोजी व्ही. एस. संपत हे सेवेतून निवृत्त झाले.
- आता देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून एच. एस. ब्रह्मा यांची निवड झाली आहे.
नर्मदा नदीच्या कालव्यावर उभारला ऊर्जा निर्मिती प्रकल्प :
- नर्मदा नदीच्या कालव्यावर 3.6 किलोमीटर अखंड लांबीचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प गुजरात सरकारने साकारला आहे.
- या प्रकल्पापासून दरवर्षी 1.62 कोटी युनिट विजेचे उत्पादन होणार आहे.
- नर्मदेच्या कालव्यावर साडेतीन किलोमीटर लांब छप्पर केले असुन, त्यावर 36 हजार सौर पॅनल बसविण्यात आले आहेत.
- हैदराबाद येथील मेघा इंजीनिरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने प्रकल्प पूर्णत्वास नेला असुन पुढील 25 वर्ष कंपनी त्याची देखभाल करणार आहे.
अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार पुरस्कार :
- मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाची दिशा तंत्रज्ञानभिमुख दृष्टीने टिपणारया अच्युत गोडबोले यांना यंदाचा डॉ. लाभसेटवार पुरस्कार देण्यात आला.