चालू घडामोडी (18 मे 2018)
माजी सैनिकांच्या पाल्यांना ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती’ मंजूर :
- केंद्र शासनाकडून दिली जाणारी पंतप्रधान शिष्यवृत्ती जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या सात पाल्यांना मंजूर झाली आहे. तसेच या पाल्यांना पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. येथील माजी सैनिक कल्याण कार्यालयाच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
- देशसेवेतून निवृत्त झालेल्या पाल्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजनेतून त्यांना व त्यांच्या पाल्यांना मदत करते. माजी सैनिक कल्याण कार्यालयाचे समन्वयक कमलाकर शेटे, सत्येंद्र चावरे आणि संजय देशपांडे हे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करतात. मंजुरीसाठी केंद्रसरकारकडे कर्नल सुहास जतकर हे पाठवून मंजुर करून घेतात.
- माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यातील सात विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येकींना 27 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे.
राजेश टोपे यांना ‘उत्कृष्ट भाषण पुरस्कार’ जाहीर :
- अंबड व घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांनी महाराष्ट्र विधानसभेतील कामकाजादरम्यान विविध प्रश्नांवर उत्कृष्ट भाषण केले. सभागृहासमोर प्रश्न मांडून सत्य परिस्थिती पुराव्यानिशी सादर केल्याने त्यांना विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर केले.
- आमदार टोपे यांची 2015 ते 2018 या कालावधीत उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभागृहनेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, संसदीय प्रधान सचिव अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या समितीने आमदार राजेश टोपे यांना उत्तम संसदपट्टू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
बारामतीमध्ये क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मंजूर :
- पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने बारामती, अकोला, अमरावती, चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मंजूर केले आहे.
- ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर बारामतीकरांची ही मागणी मंजूर झाली आहे.
- तसेच या पुढील काळात बारामती व पंचक्रोशीतील नागरिकांना नवीन पासपोर्ट तयार करण्यासह नूतनीकरणासाठी पुण्याचा हेलपाटा वाचणार आहे.
- परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या संदर्भात मोलाची मदत केली असून, सुप्रिया सुळे यांच्या मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे या साठी पाठपुरावा सुरु होता. आता परराष्ट्र मंत्रालयाने देशभरात 289 ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रात वरील पाच ठिकाणी ही कार्यालय सुरु होणार आहेत.
मुंबई-गोवा दरम्यान जलवाहतूक सुरू होणार :
- मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर, जलद आणि स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा जलमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत जलवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- सरकारने मुंबई-गोवा जलवाहतुकीस 1 डिसेंबर 2016 रोजी परवानगी दिली आहे. त्यानंतर गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई-गोवा मार्गावरून वाहतूक सेवेचा धूमधडाक्यात प्रारंभ करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जलवाहतुकीचा मुंबई ते गोवा संभाव्य तिकीट दर 900 रुपये असेल असे समजते.
- केंद्र सरकारतर्फे देशात जलवाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते व रेल्वे मार्गांच्या तुलनेत जलवाहतूक पर्यावरणपूरक आहे. त्यामुळेच केद्र सरकारने ‘सागरमाला’ प्रकल्पाची घोषणा केली. याअंर्तगत मुंबई-गोवा मार्गावरील जेट्टींचे काम पूर्ण केले जात आहे. मुंबई-गोवा जलमार्ग हा केंद्रासह राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो.
देशात ‘स्वच्छता सर्वेक्षणात’ इंदूर अग्रस्थानी :
- केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त यंदा देशभरातील शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूरने प्रथम, भोपाळने दुसरा क्रमांक, तर चंदिगडने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीमध्ये मुंबईने आघाडीचे स्थान मिळविले आहे. देशभरातील शहरांमध्ये मुंबईला कितवे स्थान मिळाले हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
- यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीचा नव्याने समावेश करण्यात आला. या श्रेणीमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख बनलेल्या मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
- भारतातील मोठय़ा स्वच्छ शहराचा मान आध्र प्रदेशमधील विजयवाडा शहराला मिळाला आहे. वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये उत्तर प्रदेशमधील गाझियाबादने आघाडी मिळविली आहे.
- नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद देणाऱ्या शहरांमध्ये राजस्थानमधील कोटा, महाराष्ट्रातील परभणीने, नावीन्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट कृती श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील नागपूरने आणि गोव्यातील पणजीने, तर सौर ऊर्जा व्यवस्थापन श्रेणीत नवी मुंबई, तिरुपतीने आघाडीचे स्थान पटकावले आहे.
अॅट्रॉसिटीबाबत याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका :
- अनुसूचित जाती जमाती कायदा म्हणजे अॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबत वादंग सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने 16 मे रोजी एका फेरविचार याचिकेची सुनावणी करताना पुन्हा एकदा पूर्वीचीच भूमिका घेत, अशा प्रकारच्या घटनांमध्ये केवळ एकच बाजू ऐकून घेऊन कुणाला अटक करू नये असे म्हटले आहे.
- अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. अॅट्रॉसिटी कायद्यात ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याची प्राथमिक चौकशी केल्याशिवाय अटक करता येणार नाही, अशी भूमिका न्यायालयाने यापूर्वीही घेतली होती. त्यावर देशभरात वादंग होऊन दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये दहा जण ठार झाले होते.
- 16 मे रोजीच्या सुनावणीत न्यायालयाने सांगितले, की कुठल्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य, जगण्याचा अधिकार याची जबाबादारी घटनेनुसार महत्त्वाची आहे. त्याचे रक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे संसदेस लोकांना कलम 21 अन्वये जीवित रक्षण व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क डावलणारा कायदा करता येणार नाही. आता या प्रकरणाची सुनावणी जुलैत होणार आहे.
दिनविशेष :
- छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा 18 मे 1682 मध्ये जन्म झाला.
- भारताचे 11वे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 मध्ये झाला.
- 18 मे 1972 रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
- भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी सन 1974 मध्ये 18 मे रोजी केली.
- पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने 18 मे 1998 रोजी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
- श्रीलंका सरकारने 18 मे 2009 रोजी ‘एलटीटीई’ला पराभूत करून सुमारे 26 वर्षच्या युद्धाला संपवले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा