Current Affairs of 19 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्याच्या दौऱ्यात घोषणा :

  • बिहार जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याच्या विकासासाठी तब्बल एक लाख 25 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.
  • राज्य विधानसभेची निवडणूक या वर्षअखेपर्यंत होणार आहे.
  • तसेच आरामधील रमणा मैदानावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी रस्ते विकासाच्या दहा योजनांचा शिलान्यास केला.
  • राज्यात सुरू असलेल्या विविध योजनांसाठी 40 हजार कोटी रुपये पूर्वी दिले आहेत. हे सर्व धरून हे पॅकेज एक लाख 65 हजार कोटी रुपयांचे होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2015)

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी संदेश “वेब कॉमिक”वर अवतरला :

  • माजी राष्ट्रपती आणि देशाचे क्षेपणास्त्रपुरुष डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी संदेश आणि त्यांचा जीवनाप्रती असणारा सकारात्मक दृष्टिकोन आता “वेब कॉमिक”वर अवतरला आहे.
  • ऑस्ट्रेलियातील फ्री-लान्स आर्टिस्ट गेव्हिन थान यांचे ऑनलाइन पोर्टल “झेन पेन्सिल”वर हे विचार वाचता येतील.
  • डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या “विंग ऑफ फायर” या ग्रंथातून काही निवडक सुभाषिते संकलित करण्यात आली असून, ती वेब कॉमिकमध्ये मांडण्यात आली आहेत.
  • तसेच पाण्यात पोहणे शिकू पाहणाऱ्या एका तरुण मुलीची प्रेरणादायी कथा, यात मांडली जाणार आहे.
  • समाजातील सत्तावादाच्या विरोधात तरुणांनी कसे उभे राहायचे, याचे प्रेरणादायी संदेश यात वाचता येतील.
  • या कॉमिक बुकमध्ये डॉ. कलामांच्या जीवनातील काही निवडक प्रसंगही विस्ताराने मांडण्यात येणार आहेत.
  • डॉ. कलाम यांना शास्त्रज्ञ होण्यापूर्वी वैमानिक व्हायचे होते यासाठी त्यांनी “मद्रास इन्स्टिट्यूट टेक्‍नॉलॉजी”मधून एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवीदेखील घेतली होती; पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते त्यांना शक्‍य झाले नाही. याचा सविस्तर आढावा या कॉमिकमध्ये घेण्यात आला आहे.
  • तसेच डॉ. कलाम यांच्या व्यक्‍तिरिक्‍त रवींद्रनाथ टागोर, जिद्दू कृष्णमूर्ती आणि महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचारही “झेन पेन्सिल” या पोर्टलवर पाहायला मिळतात. 2012 मध्ये हे पोर्टल सुरू झाले होते.
  • तेव्हापासून ते आजतागायत त्याची लोकप्रियता कायम आहे.

ख्रिस रॉजर्स क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर :

  • स्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा सलामीवीर ख्रिस रॉजर्स याने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मंगळवार जाहीर केला.
  • इंग्लंडविरुद्ध मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.
  • आता त्यापाठोपाठ रॉजर्सनेही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
  • इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने ऑस्ट्रेलिया पिछाडीवर आहे.
  • मालिकेतील शेवटचा सामना गुरुवारपासून खेळविला जाणार आहे.
  • डावखुरा ख्रिस रॉजर्स हा 38 वर्षांचा असून, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 62.42 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत.

महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित :

  • महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
  • अल्पवयीन मुली, महिलांचा विनयभंग, छेडछाडीतही महाराष्ट्र अव्वल असल्याचा निष्कर्षही समोर आला आहे.
  • एनसीआरबीने 2014 मध्ये देशभरात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली.
  • त्यानुसार एकूण गुन्हेगारीत मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पिछाडीवर असला तरी वृद्ध आणि महिलांविरोधी अत्याचारात महाराष्ट्र पुढे आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे निधन :

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि रवींद्र संगीत गायिका शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी निधन झाले.

  • त्या 74 वर्षांच्या होत्या.
  • त्यांनी देशातच नव्हे तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेत रवींद्र संगीत गायन आणि नृत्य, नाटकांचे प्रभावी सादरीकरण केले होते.
  • रवींद्रनाथांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गीतांजली संगीत समूहाची स्थापना केली होती.
  • प्रणव मुखर्जी आणि शुभ्रा यांचा विवाह 13 जुलै 1957 रोजी झाला.

‘मार्शमॅलो’ (6.0) अँड्रॉइडचे व्हर्जन लवकरच बाजारात दाखल :

  • आईसक्रीम (4.0), जेलीबीन (4.1), किटकॅट (4.4), आणि लॉलिपॉप (5.0) नंतर गुगलचे ‘मार्शमॅलो’ (6.0) या नावाचे अँड्रॉइडचे पुढील व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
  • ज्या डेव्हलपर्सना अँड्रॉइडसाठी नवीन अप्लिकेशन्स तयार करायची आहेत किंवा अपडेट करायची आहेत ते आता सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकतात, असंही इसॉन म्हणाले.
  • नवीन ‘मार्शमॅलो’चे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर व सुधारीत पॉवर सेव्हिंग मोड असणार आहे.
  • प्रत्येक नवीन अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना किंवा ते अपडेट करताना युजर्सना संमतीची आवश्यकता भासणार नाही, असंही गुगलतर्फे सांगण्यात आलं आहे.

दिनविशेष :

  • जागतिक छायाचित्र दिन
  • 1919 : अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • 1950 : डॉ. सुधा नारायण मुर्ती, ज्येष्ठ समाजसेविका व लेखिका.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2015)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago