Current Affairs of 19 January 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 जानेवारी 2016)
देशातील पहिले सेंद्रिय राज्य :
- सिक्कीम हे देशातील पहिले सेंद्रिय राज्य बनल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
- सिक्कीमचे उदाहरण हे देशासाठीच नव्हे, तर जगातील सेंद्रिय शेतीसाठी पथदर्शक ठरणार असल्याचे प्रंतप्रधान म्हणाले.
- ‘निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्याची गरज असल्याचे उदाहरण सिक्कीमने जगाला घालून दिले आहे.
- प्रंतप्रधान म्हणतात की शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी आणि कृषी विकासाला हातभार लावण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.
Must Read (नक्की वाचा):
महाराष्ट्रातील बाल शौर्य पुरस्कार :
- शौर्याचा अत्युच्च आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील चार मुलांसह 25 बालकांना 24 जानेवारी रोजी राजधानीत होणाऱ्या शानदार समारंभात राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
- त्यापैकी प्रतिष्ठेचा भारत पुरस्कार आपल्या चार मित्रांना वाचवते वेळी प्राणांची आहुती देणाऱ्या गौरव कवडुजी सहस्रबुद्धे याला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ घोषित झाला आहे.
- तीन मुलींनीदेखील या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
धूमकेतूवर बर्फाच्या स्वरूपात पाणी :
- अवकाश संशोधनाच्या इतिहासात सर्वात जास्त अभ्यास झालेला धूमकेतू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 67 पी चुरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूवर बर्फाच्या स्वरूपातील पाणी असल्याचे दिसून आले असून या संशोधनात एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.
- युरोपीयन अवकाश संस्थेच्या रोसेटा यानाच्या मदतीने गोळा केलेल्या माहितीत बर्फाचे हे थर दिसले असून ते डम्बेल्सच्या आकाराच्या या धूमकेतूच्या खालच्या इमहोटेप या भागात दिसले आहेत.
- दृश्य प्रकाशात या धूमकेतूवरील बर्फाचे पांढरे पट्टे स्पष्ट दिसत आहेत,धूमकेतूवरील कडय़ासारखा भाग व ढिगाऱ्यात या बर्फाचा समावेश आहे.
- कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी या संस्थेने हे संशोधन केले असून त्यात भारतीय वंशाचे मूर्ती गुडीपथी यांचा समावेश आहे.
राज्यातील पहिले ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ :
- रुग्णांना औषधांविषयी इत्थंभूत माहिती कळावी यासाठी राज्यातील पहिले ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ केईएम रुग्णालयात सुरू होणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
- एखादे औषध कसे व किती वेळा घ्यायचे, ते डॉक्टर एकदा सांगतो. काही वेळा रुग्णांच्या सर्वच शंकांचे निरसन होत नाही.
- हे औषध नेमके कशासाठी दिले आहे? या औषधात कोणते घटक आहेत? औषधाची किती रिअॅक्शन येऊ शकते? या औषधाचा फायदा कसा होणार? अशा प्रश्नांची उत्तरे देणे डॉक्टरांना शक्य नसते.
- त्यासाठीच ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ 20 जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आणि केईएम रुग्णालय मिळून हे केंद्र सुरू करणार असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.
स्टॉक एक्सचेंजची सफर शक्य :
- देशाच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत पर्यटकांना खुली करण्याबाबत सामंजस्य करार करण्यास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.
- पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील डेक्कन ओडिसी व त्याचे बोधचिन्ह यांच्या नोंदणीसाठी शासनाच्या ट्रेडमार्क विभागाकडे नोंदणी करणे.
- घृष्णेश्वर-वेरूळ परिसरात पर्यटन विकास महामंडळाच्या पडिक जमिनीवर महादेव वनाची निर्मिती करण्याकरिता वनविभागास जागा उपलब्ध करून देणे.
- माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय सुविधा विकसित करणे, घारापुरी बेटावरील गावकऱ्यांना महामंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यास मान्यता देण्यात आली.
जागतिक बॅंकेकडून ‘आधार’ प्रणाली उपयुक्त :
- जागतिक बॅंकेतर्फे 15 जानेवारी 2016 रोजी डिजिटल लाभांशांसंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला.
- या अहवालानुसार भारतातील आधार ही डिजिटल ओळख प्रणाली भारत सरकारसाठी उपयुक्त ठरली आहे.
- आधार कार्ड योजनेने भारत सरकारचे वर्षाला साडेसहाशे कोटी रुपये वाचविले असून, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.
- यासोबतच सर्व घटकांचा समावेश, उपयुक्तता व नावीन्यता या कसोट्यांवरही आधार प्रणाली उत्कृष्ट आहे, असे जागतिक बॅंकेकडून सांगण्यात आले.
- भारतातील अंदाजे शंभर कोटी लोक आधार प्रणालीद्वारे जोडले आहेत. या प्रणालीद्वारे गरीब वंचितांनाही डिजिटल ओळख मिळाली आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.
- जागतिक बॅंक समूहाचे प्रमुख : जिम यॉंग कीम
- जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ : कौशिक बसू
भारत अमेरिकेचा सर्वांत मोठा शास्त्रज्ञ निर्यातदार :
- नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या अहवालानुसार इतर देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांमध्ये भारतीय नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
- भारतातून अमेरिकेमध्ये नऊ लाख पन्नास हजार शास्त्रज्ञ आणि अभियंते स्थलांतरित झाले आहेत.
- इतर देशांमधून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झालेल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची संख्या 2003 मध्ये दोन कोटी सोळा लाख होती.
- ही संख्या 2013 मध्ये दोन कोटी नव्वद लाखांवर गेली आहे. यापैकी बहुतांश भारतीय आहेत, दहा वर्षांमध्ये वाढलेल्या संख्येपैकी तब्बल 85 टक्के फक्त भारतीयच आहेत.
- अमेरिकेतील एकूण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांपैकी 16 ते 18 टक्के स्थलांतरित आहेत, यापैकी 22 टक्के व्यक्तींना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे.
- अमेरिकी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या तुलनेत स्थलांतरित नागरिकांनी अधिक चांगले यश मिळविल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा