चालू घडामोडी (19 जुलै 2015)
जम्मू-काश्मीर ऐतिहासिक निकाल :
- जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष कायदेशीर व घटनात्मक दर्जा बदलता येणार नाही व त्याला आव्हान देता येणार नाही, असा ऐतिहासिक निकाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे.
- जम्मू-काश्मीर राज्याचे सार्वभौमत्व हे महाराजांच्या राजवटीपासून आहे व हे संस्थान सामील करून घेतल्यानंतरही त्याची वेगळी राज्यघटना व तिचे कायदेशीर व घटनात्मक वैधत्व कायम आहे त्यात बदल करता येणार नाही सांगत निकाल जाहीर झाला.
- तसेच देशाच्या संसदेने 2002 मध्ये लागू केलेला आर्थिक मालमत्ता फेररचना व अंमलबजावणी सुरक्षा हित कायदा काश्मीरला लागू करता येणार नाही.
- तसेच राज्याने परवानगी दिली तरच केंद्र सरकार काश्मीरबाबत कायदे करू शकते.
- भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसारच केंद्राचे कायदे जम्मू-काश्मीरला लागू होत नाहीत. महाराजाचे संस्थान विलीन केले तरी त्याचे सार्वभौमत्व बाधित होत नाही, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेखाली पीक विमा योजना राबविणार :
- रायगड जिल्ह्य़ातील भात पिकाकरिता 60 मंडळांना व नागली पिकाकरिता 41 मंडळांना, राष्ट्रीय कृषी विमा योजनेखाली पीक विमा योजना खरीप हंगाम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- हवामानात सातत्याने होणारे बदल, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे घटणारे उत्पादन लक्षात घेऊन 2015 सालाकरिता ही योजना रबाविण्यात येणार आहे.
- पीक पेरल्यानंतर अपुरा पाऊस, अतिपाऊस, पूर, चक्रीवादळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम देऊन त्यांचे आर्थिक स्थर्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- भात व नागली करणाऱ्या शेतकऱ्याने पीक पेरणीपासून 1 महिना किंवा 31 जुलै यापकी जे आधी असेल त्यानुसार बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
- बँकेने शेतकऱ्यांचा प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 1 महिन्याच्या आत किंवा 31 ऑगस्ट 2015 यापैकी जे आधी असेल त्यानुसार विमा प्रस्ताव भारतीय कृषी विमा कंपनीस सादर करावयाचा आहे.
- भात पिकासाठी 60 टक्के सर्वसाधारण जोखीमस्तर व नाचणी पिकासाठी 80 टक्के जोखीमस्तर असून अनुक्रमे 15 हजार 400 रुपये व 13 हजार 100 रुपये विमा संरक्षित रक्कम दिली जाते.
- तसेच त्याकरिता 250 रुपये प्रमाणे सर्वसाधारण विमा हप्ता आकारला जातो.
- राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई अधिसूचित क्षेत्रासाठी [महसूल मंडळ (सर्कल) किंवा तालुका] पीक कापणीनुसार उत्पादनाच्या आकडेवारीवर आधारित असते. जर एखाद्या अधिसूचित क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना त्या प्रमाणात नुकसानभरपाई दिली जाते.
- शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी भात पिकासाठी 193 रुपये व नागली पिकासाठी 164 रुपये बँकेत जमा करावयाची आहे.
सानिया मिर्झाला या वर्षीचा ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार :
- जागतिक क्रमवारीतील दुहेरीची नंबर वन खेळाडू, विम्बल्डन महिला दुहेरी चॅम्पियन टेनिसस्टार सानिया मिर्झा ही यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित होऊ शकते.
- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची सानियाच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची योजना आहे.
- खेलरत्न पुरस्कार दर वर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसोबत प्रदान करतात.
- गतवर्षी एकाही खेळाडूला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला नव्हता.
- तसेच माहितीनुसार, 9 खेळाडूंनी खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला आहे.
- त्यांत दीपिका पल्लीकल (स्क्वॅश), सीमा अंतिल (डिस्कस थ्रो), विकास गौडा (डिस्कस थ्रो), सरदारसिंग (हॉकी), टिंटू लुका (अॅथलेटिक्स), अभिषेक वर्मा (धनुर्विद्या), गिरीशा एच. एन. (पॅरालिम्पियन हायजंपर), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) आणि जीव मिल्खासिंग (गोल्फ) यांचा समावेश आहे.
- सानियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
दिनविशेष :
- 1937 – महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आली.
- 1969 – अपोलो 11 हे यान व अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, एडवीन अलड्रिन व मायकेल कॉलीन्स हे चंद्राच्या कक्षेत पोहोचले.