Current Affairs of 19 June 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी 19 जून 2015

बिग बँग तारे अंतराळवीरांनी शोधले :

  • बिग बँग अर्थात विश्वाच्या जन्मानंतरच्या काळात प्रकाश देणारे तारे अंतराळवीरांनी शोधले आहेत.
  • हे तारे राक्षसी आकाराचे आहेत; पण त्यांनी विविध ग्रह तयार होण्याच्या काळात तसेच जीवन अस्तित्वात येताना विश्व प्रकाशमय ठेवून मोठीच कामगिरी बजावली आहे.
  • पृथ्वीला प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात अनेक घटकांचे मिश्रण आहे पण बिग बँगनंतर लगेचच प्रकाशमान होणाऱ्या या ताऱ्यात फक्त हैड्रोजन, हेलियम व थोडाफार लिथियम होता.
  • हे तारे सूर्याच्या शेकडो वा हजारो पटीने मोठे होते. त्यांचे जळणे जलदगतीने होते आणि ते अधिक तेजस्वीही होते.
  • या ताऱ्यावरील स्फोटातून जे घटक तयार झाले ते अवकाशात पोहोचले व त्यातून थर्मोन्यूक्लिअर प्रतिक्रिया झाल्या.
  • तसेच त्यातून आजचे तारे जन्माला आले व ऑक्सिजन (प्राणवायू), कार्बन आणि लोह यासारखे जीवनाला आवश्यक असणारे मूलभूत घटक तयार झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 18 जून 2015

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या हस्ते पीक विमा पोर्टलचे उद्‌घाटन :

  • पीक विमा योजनेची, आपल्या शेतातील पिकांवरील विमा, त्याचा हप्ता, विमा कंपन्या, बॅंका यांची माहिती शेतकऱ्यांना “कृषी विमा” वेब पोर्टलद्वारे त्याचप्रमाणे “एसएमएस” मार्फत स्थानिक भाषेत मिळू शकेल.
  • हवामान खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या इशाऱ्याची तत्काळ माहिती “नाऊ कास्ट” या वेबपोर्टलमार्फत तसेच “एसएमएस”द्वारे शेतकऱ्यांना मिळेल.
  • केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी आज या दोन्ही पोर्टलचे उद्‌घाटन केले.
  • सरकारच्या राष्ट्रीय कृषी विमा योजना (एनएआयएस), सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (एमएनएआयएस) आणि हवामानाधारित कृषी विमा योजना (डब्ल्यूबीसीआयएस) या प्रमुख तीन विमा योजनांतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक, प्रीमियम, अंतिम तारीख, विमा कंपन्यांशी संपर्क करणे याबाबतची माहिती “कृषी विमा‘ वेबपोर्टलद्वारे घेता येईल.
  • या वेबपोर्टलवर सर्व राज्यांची जिल्हावार, तालुकावार माहिती उपलब्ध आहे. त्या आधारे शेतकऱ्यांना आपापल्या भागातील पीक विम्याची स्थिती कळू शकेल.
  • त्याचप्रमाणे कृषी खात्याकडे “एसएमएस” सेवेसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर शेतकऱ्यांना पीक विम्याबाबतची माहिती निःशुल्कपणे पाठविली जाईल, असे राधामोहनसिंह यांनी सांगितले.
  • तसेच याअंतर्गत अतिवृष्टी, गारपीट, मुसळधार पाऊस यासारख्या परिस्थितीचा अंदाजवजा इशारा शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचविण्यासाठी देशभरातील 146 हवामान केंद्रांचा उपयोग केला जाणार आहे.

    या केंद्रांच्या 50 किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांना किमान तीन तास आधी”एसएमएस‘द्वारे हवामानाबाबतचे इशारे कळविले जाणार आहे.

चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित :

  • आंतरराष्ट्रीय योग दिनावरील परिषदेदरम्यान चिनी भाषेतील भगवद्गीता प्रकाशित करण्यात आल्यानंतर कम्युनिस्ट देशांत तिचा प्रवेश झाला आहे.
  • शांघायमधील झेजियांग विद्यापीठातील प्रा. झू चेंग आणि लिंग हाई यांनी भगवद्गीतेचे चिनी भाषेत भाषांतर केले असून, सिचुआन पीपल्स पब्लिकेशनच्यावतीने ती प्रकाशित करण्यात आली आहे.
  • भारतातील प्रसिद्ध योग प्रशिक्षकांच्या उपस्थितीत भगवद्गीतेचे प्रकाशन करण्यात आले.
  • चीनमधील भारताचे राजदूत अशोक के. कांत यांनी या भगवद्गीतेचे प्रकाशन केले.

दिनविशेष :

  • 1966 – मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानाजवळील बाळ ठाकरे यांच्या घरी शिवसेनेची स्थापना.
  • 1978 – इंग्लंडचा इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर 8 बळी घेत शतकसुद्धा ठोकले.
  • 1981 – भारताच्या अॅपल उपग्रहाचे प्रक्षेपण

 

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 20 जून 2015

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago