Current Affairs (चालू घडामोडी) of 19 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ‘ड्रोन’ आणि ‘लेझर गायडेड’ क्षेपणास्त्राची चाचणी
2. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केले श्रीलंके सोबत चार करार
3. अरुण जेटली प्रदान करणार चौथे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार
4. तिकीटांवर छापणार हेल्पलाइन क्रमांक
5. महिलांसाठी सुरू होणार वेब पोर्टल सुविधा
6. महाराष्ट्रानंतर हरियानातही गोहत्या बंदी

 

 

‘ड्रोन’ आणि ‘लेझर गायडेड’ क्षेपणास्त्राची चाचणी :

  • ‘ड्रोन’ आणि ‘लेझर गायडेड’ क्षेपणास्त्राची चाचणी पाकिस्तानने घेतली हे क्षेपणास्त्र सर्व प्रकारच्या वातावरणात वापरता येणार आहे.
  • कोणत्याही वातावरणात लक्ष्याचा भेद घेण्याची त्याची क्षमता असून ड्रोनचे नाव ‘बराक’ तर त्या क्षेपणास्त्राचे नाव ‘बर्फ’ आहे.
  • ड्रोनच्या चाचणीच्या वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केले श्रीलंके सोबत चार करार :

  • भारत आणि श्रीलंका यांच्यात रविद्रनाथ टागोर यांचे स्मारक उभारणे, व्हिसा, सीमाशुल्क, आणि युवककल्याण यांसारखे चार करार करण्यात आले.
  • तसेच भारत श्रीलंकेतील रेल्वेच्या विकासासाठी भारत योगदान देईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
  • भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेंट्रल बँक श्रीलंका यांच्यादरम्यान चलन हस्तांतराबाबद सामंजस्य करार करण्यात आला.

अरुण जेटली प्रदान करणार चौथे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार :

  • माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली 20 मार्च रोजी चौथे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान करणार आहेत.
  • छायाचित्रण क्षेत्रातील असाधारण बुद्धिमत्तेचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
  • वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार, व्यावसायिक आणि नावोदितांसाठी अशा विविध विभागांसाठी हे पुरस्कार दिले जातात.

तिकीटांवर छापणार हेल्पलाइन क्रमांक :

  • रेल्वे तिकीटाच्या पुढील बाजूस 138 आणि 182 हे हेल्पलाइन क्रमांक छापण्यात येणार आहेत.
  • प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जाहिरातीसाठी हेल्पलाइन क्रमांक छापले जाणार आहेत.
  • तसेच वैद्यकीय मदत, स्वच्छता, खाद्यपदार्थ या संबंधीची चौकशी करण्यासाठी रेल्वे विभागणे हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केले आहेत.

महिलांसाठी सुरू होणार वेब पोर्टल सुविधा :

  • महिला व अन्य दुर्बल गटांच्या सुरक्षेस सरकार लवकरच mysecurity.gov.in हे वेब पोर्टल सुरू करणार आहे.
  • तसेच स्वयंसेवी संस्था, व्यक्ति, संस्था आदींनी विकसित या पोर्टलवर उपलब्ध असतील.
  • मात्र या सर्वांसाठी पात्रता निकष पूर्ण केलेले असावेत.

महाराष्ट्रानंतर हरियानातही गोहत्या बंदी :

  • महाराष्ट्रा पाठोपाठ हरियानातही गोहत्या बंदी करण्यात आली आहे.
  • गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन विधेयक, 2015 हरियाणा सरकारने मंजूर केले.
  • या कायद्याचे उल्लंघन करणार्‍याला तीन वर्षाची शिक्षा तसेच 30,000 ते 1 लाख रुपयापर्यंत दंड ठोठवण्यात येणार आहे.
  • तर गोवंशाची निर्यात करणार्‍याला किमान तीन वर्ष तर कमाल सात वर्षाची शिक्षा तसेच 30,000 ते 1 लाख रुपये दंड असणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.