Current Affairs of 19 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 मार्च 2016)

कॉफीटेबल बुक ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमेन)’ :

  • पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स ऑफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन (दि.19) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे.
  • तसेच लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
  • पुण्यातील नारीशक्तीला ‘लोकमत’ने नेहमीच भरभक्कम पाठिंबा दिला आहे.
  • महिलांच्या जीवनोन्मुखतेने त्यांच्या कर्तबगारीला नेहमीच वेगळा आयाम दिलेला आहे, याचेच प्रत्यंतर हे कॉफीटेबल बुक वाचताना येईल.
  • दोन वर्षांपासून ‘लोकमत’ने ‘वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ सुरू केले आहेत.
  • असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या तेजस्विनींचा जागर संपूर्ण राज्यभर व्हावा व त्यांच्या कार्यातून महिलांना उमेद मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे.
  • ‘लोकमत’च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनींचा राज्य पातळीवरील ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
  • तसेच यामध्ये सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कला, शौर्य, क्रीडा आणि उद्योग या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मार्च 2016)

एअरबसची 275 कोटींची गुंतवणूक :

  • विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच 4 कोटी डॉलर्स (सुमारे 275 कोटी रूपये) गुंतवणार आहे.
  • तसेच या गुंतवणुकीतून दिल्ली राजधानी क्षेत्रात (एनसीआर) एक अद्ययावत पायलट प्रशिक्षण, तसेच विमान दुरुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा एअरबसचा इरादा आहे.
  • केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारत आहे.
  • प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ 2017 मध्ये होणार असून, 2018 ते 2028 या 10 वर्षांत या केंद्राद्वारे एअरबसच्या 8 हजार प्रशिक्षित पायलटस्चे तसेच 2 हजार विमान दुरूस्ती अभियंत्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असेल.
  • एअरबस कंपनीतर्फे संचलित या केंद्रात एअरबस उद्योगातील जागतिक विशेषज्ञ प्रशिक्षण देणार आहेत.
  • प्रशिक्षणार्थींना ए 320 विमानांच्या संपूर्ण उड्डाण प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला 4 सिम्युलेटर्स स्थापन केले जाणार असून कालांतराने त्यांची संख्या वाढवली जाईल.

EPF वरील व्याजदरात कपात :

  • देशभर चौफेर टीकेच्या भोवऱ्यात सापडलेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) व पेन्शनच्या रकमेवरील करप्रस्ताव सरकारने मागे घेतला आहे.
  • सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील पीएफ व्याजदरात (दि.18) केंद्र सरकारने कपात केली आहे.
  • पीपीएफवरील व्याजदर 8.7 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आले आहे.
  • तसेच त्याबरोबर किसान विकास पत्रावरील व्याजदरही कमी करण्यात आला आहे.
  • आतापर्यंत किसान विकास पत्रावर वार्षिक 8.7 टक्के व्याज देण्यात येत होते, आता त्यावर वार्षिक 7.8 टक्के व्याज देण्यात येणार आहे.
  • आता ईपीएफच्या 60 टक्के रकमेवर तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मधून 40 टक्के रक्कम काढली तरी त्यावर कर लागणार नाही, त्यामुळे कर्मचारी भविष्य निधीतून कितीही रक्कम काढली तरी त्यावर कर लागणार नाही.

उ.कोरियाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी :

  • उत्तर कोरियाने (दि.18) पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
  • अमेरिकेकडून घालण्यात आलेले निर्बंध झुगारून देत उत्तर कोरियाने मागील वर्षी एप्रिल महिन्यात दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.
  • उत्तर कोरियाच्या लष्करप्रमुखांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवदेनात म्हटले आहे, की प्योंगयांगच्या उत्तरेकडील तळावरून मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र सोडण्यात आले.
  • आठशे किलोमीटर अंतरावरील समुद्रातील लक्ष्याचा क्षेपणास्त्राने यशस्वीपणे वेध घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
  • दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा संयुक्त लष्करी सराव सुरू असून, त्यास उत्तर कोरियाने आक्षेप घेतला आहे.
  • मागील काही आठवड्यांत उत्तर कोरियाने कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली असून, त्याद्वारे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला आपला विरोध असल्याचे संकेत दिले होते.

दूरसंचार व्यवसायातून व्हिडीओकॉन बाहेर :

  • मोबाइल ग्राहकसंख्येत देशात सर्वात मोठय़ा असलेल्या भारती एअरटेलने व्हिडीओकॉनच्या दूरसंचार ध्वनिलहरी खरेदी करण्याचे मान्य केले आहे.
  • 1800 मेगाहर्टझ बॅण्डच्या उत्तर भारतातील सहा परिमंडळातील या ध्वनिलहरी स्पर्धक कंपनीला विकून व्हिडीओकॉन भारतातील दूरसंचार व्यवसायातून बाहेर पडली आहे.
  • विद्युत उपकरण निर्मितीतील क्षेत्रातील व्हिडीओकॉन समूहाने नोव्हेंबर 2012 मध्ये झालेल्या ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेत भाग घेत बिहार, हरयाणा, मध्य प्रदेश, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशगुजरात परिमंडळात शिरकाव केला होता.
  • भारती एअरटेलला मिळालेले हे ध्वनिलहरी परवाने डिसेंबर 2032 पर्यंत वैध राहणार आहेत.
  • व्हिडीओकॉनसाठी यापूर्वी बिर्ला समूहातील आयडिया सेल्यूलरने प्रयत्न केला होता.
  • भारतीय दूरसंचार क्षेत्रात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने नुकताच रशियन भागीदार सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेसचा ताबा घेतला आहे.

बंदर विकासासाठी 1 लाख कोटींचे प्रकल्प :

  • जलवाहतुकीला प्रोत्साहन आणि व्यापाराला चालना देण्यासाठी पाच वर्षांत बंदरांचा विकास केला जाणार आहे.
  • तसेच त्यासाठी एक लाख 20 हजार कोटींचे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
  • मुंबईत 14 ते 16 एप्रिलदरम्यान होणाऱ्या मेरिटाईम इंडिया समिटची घोषणा केली.
  • मेरिटाईम इंडिया समिटमध्ये 27 बंदर आधारित औद्योगिक समूह विकास (क्‍लस्टर), किनारपट्टी नौकानयन आणि देशांतर्गत वाहतुकीचा विकास आदी प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे.
  • बंदर आणि नौकानयन क्षेत्रात पाच वर्षांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एक कोटी रोजगारनिर्मितीची क्षमता आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिलला मेरिटाईम इंडिया समिटचे उद्‌घाटन होईल.
  • 20 हजार 157 कोटी रुपये गुंतवणुकीतून डहाणूजवळ वाढवन बंदर, कन्याकुमारीजवळचे कोलाचेल आणि पश्‍चिम बंगाल येथे सागर ही नवीन हरित बंदरे (ग्रीन पोर्ट) विकसित केली जातील.
  • जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर यासाठी गुजरातमधील सौराष्ट्र आणि तमिळनाडूमधील एन्नोर अशी दोन मरीन क्‍लस्टर्स निश्‍चित करण्यात आले.
  • तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर तमिळनाडूत कोस्टल स्टील क्‍लस्टर्स निश्‍चित करण्यात आले आहेत.

दिनविशेष :

  • 1842 : लोकहितवादी यांनी ‘शतपत्र’ या लेखनास प्रारंभ केला.
  • 1954 : इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ यांचा जन्म.
  • 1962 : पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
  • 1972 : भारत-बांगलादेश यांच्यात मैत्री करार झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मार्च 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago