Current Affairs of 19 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 मे 2016)

भारत वंशीय स्वाती दांडेकर एडीबीच्या संचालक :

  • अमेरिकी सिनेटने भारतीय वंशाच्या मुत्सद्दी स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक केली आहे. हे पद राजदूताच्या दर्जाचे आहे.
  • दांडेकर या रॉबर्ट ए. ओर यांची जागा घेतील. ओर हे 2010 पासून या पदावर कार्यरत होते.
  • ओबामा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आशियाई बँकेच्या सर्वोच्च अमेरिकी पदासाठी स्वाती दांडेकर यांची नेमणूक केली होती.
  • 65 वर्षीय स्वाती दांडेकर 2003 ते 2009 या काळात आयोवा प्रतिनिधी सभेच्या सदस्य होत्या.
  • तसेच 2009 ते 2011 या काळात त्या आयोवा सिनेटच्याही सदस्य होत्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मे 2016)

केंद्रीय प्रदूषण संशोधन संस्था स्थापन होणार :

  • प्रदूषणाची वाढती पातळी चिंताजनक आहे व प्रदूषणाचे मापन करण्याबाबत देशभरात एकाच संस्थेची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.
  • तसेच यामुळे सरकारने केंद्रीय प्रदूषण संशोधन संस्थेची स्थापना करण्याचा प्रस्ताव राज्यांसमोर ठेवला आहे.
  • सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे असे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले.
  • दिल्लीत राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांचे संमेलन झाले.
  • अशी संमेलने दर 6 महिन्यांनी केंद्रीय व राज्य पातळ्यांवरही घेतली पाहिजेत, अशी सूचना करून जावडेकर यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या प्रदूषणाबाबत देशात सातत्याने संशोधन होणे गरजेचे आहे.
  • केंद्राने 6 प्रकारच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नव्या नियमावली मार्च 2016 मध्ये जारी केल्या असून, त्यांचे काटेकोर पालन राज्यांनी करावे, अशी सूचना त्यांनी केली.
  • तसेच या नियमावलींनी राज्य सरकारांनी या संमेलनातच मान्यता दिल्याचे जाहीर केले.
  • पंचमहाभूतांमधील संतुलन कायम राखणे व त्यांचे संरक्षण हे तर केंद्राचे मिशनच आहे.

पंतप्रधान उज्ज्वल योजनेची अंमलबजावणी :

  • पंतप्रधान उज्ज्वल योजनेची अंमलबजावणी करत एलईडी बल्बचे वाटप करण्यात आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • गुजरातमध्ये या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
  • जानेवारी 2015 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केल्यावरनंतर आंध्रप्रदेशमध्ये 1.89 कोटी एलईडी बल्बचे वाटप झाले आहे, तर महाराष्ट्रात 1.62 कोटी बल्बचे वाटप करण्यात आले आहे.
  • या दोन राज्यांनंतर उत्तर प्रदेश (1.01 कोटी), झारखंड (60.59 लाख), हिमाचल प्रदेश (59.52 लाख) यांचा क्रमांक लागतो.
  • पंजाब या यादीत सर्वांत शेवटी असून, तेथे केवळ 2,544 बल्बचे वाटप झाले आहे.

मित्सुबिशीच्या अध्यक्षांचा राजीनामा :

  • वाहन उत्पादन क्षेत्रातील मित्सुबिशी या कंपनीतील इंधनाच्या आकडेवारीमधील (फ्युएल डेटा स्कॅम) गैरव्यवहारप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष तेत्सुरो आईकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • प्रोडक्‍ट डेव्हलपमेंट विभागातून आईकावा यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता.
  • तसेच या संपूर्ण गैरव्यवहाराची सुरुवात याच विभागातून झाल्याने आईकावा यांनी राजीनामा दिल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
  • मित्सुबिशी मधील काही कर्मचाऱ्यांनी सहा लाखांपेक्षा अधिक मोटारींच्या इंधनक्षमतेविषयी खोटी आकडेवारी ग्राहकांना सांगितली होती.
  • कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मोटारींच्या चार मॉडेल्सची इंधनक्षमता 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढवून सांगितल्याचे कंपनीने मान्य केले आहे.
  • मित्सुबिशीने तयार केलेल्या चार मॉडेल्सपैकी दोन मॉडेल्सची निसान मोटर्सच्या ब्रॅंडअंतर्गत विक्री करण्यात आली.
  • शिवाय, कंपनीच्या आणखी मॉडेल्सचीदेखील खोटी आकडेवारी सांगण्यात आल्याची शक्‍यता चौकशीदरम्यान व्यक्त करण्यात आली आहे.
  • सध्या आईकावा यांच्या जागी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओसामू मासुको हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
  • निस्सानशी हिस्साविक्री करार पूर्ण होईपर्यंत त्यांना दोन्ही पदांचा कारभार सांभाळावा लागेल.
  • काही दिवसांपुर्वी दुसरी जपानी वाहन कंपनी निस्सान मोटर्सने मित्सुबिशीतील 34 टक्के हिस्सेदारीची खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

पृथ्वी-2 क्षेपणास्राची यशस्वी चाचणी :

  • लष्कराच्या वापरासाठी केल्या जाणाऱ्या परीक्षणाचा भाग म्हणून (दि.18) ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्म क्षेत्रात (आयटीआर) अण्वस्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-2 या स्वदेशनिर्मित क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
  • (दि.18) सकाळी 9.40 वाजतादरम्यान आयटीआरमधील संकुल-3 मध्ये मोबाइल लाँचरवर पृथ्वी-2 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्र ठेवून चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
  • पहिली चाचणी यशस्वी पार पडताच लागोपाठ दुसरी चाचणी घेण्याची योजना तांत्रिक अडचणींमुळे सोडून द्यावी लागली.
  • तसेच यापूर्वी चांदीपूर येथेच 12 ऑक्टोबर 2009 रोजी अशाच स्वरूपाच्या दोन्ही चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या होत्या.
  • क्षेपणास्त्राची काही वैशिष्ट्ये –
  • उंची- 9 मीटर, टप्पा एकच
  • मारा करण्याची क्षमता – 350 किमी.
  • अस्र क्षमता – 500 ते 1000 किलो.
  • इंजिन- दोन, द्रवरूप इंधन.
  • अत्याधुनिक यंत्रणा- अंतर्गत मार्गदर्शक प्रणालीमुळे अचूक वेध.
  • 2003 मध्ये सशस्त्र दलात समावेश.
  • डीआरडीओकडून विकसित केले गेलेले पहिले क्षेपणास्त्र

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मे 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago