Current Affairs of 19 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2017)
भारताची मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड 2017’ :
- जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड 2017’चा मुकूट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला.
- 17 वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे.
- चीनमधील सान्या येथे मिस वर्ल्ड 2017 ही स्पर्धा रंगली.
- जगभरातून आलेल्या 130 सौंदर्यवतींमध्ये रंगलेली कांटे की टक्कर, ग्लॅमर- फॅशनच्या दुनियेतील तारे आणि गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम अशा वातावरणात हा सोहळा पार पडला.
- अंतिम पाचमध्ये इंग्लंड, फ्रान्स, भारत, केनिया आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले.
Must Read (नक्की वाचा):
चीनच्या गुहांमध्ये 4 कोटी लोक :
- चीनच्या उत्तरेकडील प्रांतांत तब्बल चार कोटी लोक आजही गुहासदृश घरांमध्ये राहतात, असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही; पण ती वस्तुस्थिती आहे.
- अगदी इ.स.पूर्व काळापासून डोंगरांत घरं बांधून चिनी लोक राहत आले आहेत.
- ती अगदी गुहेसारखीच दिसतात. या घरांना योडाँग म्हटलं जातं आणि त्यात राहणा-यांना योडांगस म्हणून ओळखलं जातं.
- गान्सू, शँक्झी, हेनन व निंगझिया या भागांत अशी घरं दिसतात.
- ही घरं उन्हाळ्यात आतून थंड राहतात आणि थंडीत आतमध्ये ऊबदार वाटतं.
- मध्यप्रदेशात ग्वाल्हेर सोडून चंबळच्या खोयात शिरल्यावर जी बिहड (मातीची घरं) दिसू लागतात, तसंच चित्र चीनच्या उत्तरेकडील भागांत दिसतं.
- अर्थात तिथं फरक इतकाच की ती थेट डोंगरातच आहेत.
- चीनमध्ये 1956 रोजी भूकंपाचा खूप मोठा धक्का बसला. त्यावेळी डोंगरही खचले आणि शँक्झी प्रांतात योडाँगमध्ये राहणारे 8 लाख 10 हजार लोक ठार झाले होते.
दिनविशेष :
- 19 नोव्हेंबर : जागतिक नागरिक दिन.
- 1999 : चीनने शेन्झू 1 हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- 1917 : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान यांचा जन्मदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा