Current Affairs of 19 October 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 ऑक्टोंबर 2015)
बीएनएसएलच्या ग्राहकांना लवकरच नव्या सुविधा प्राप्त होण्याची शक्यता :
- भारत संचार निगम लिमिटेडद्वारे (बीएसएनएल) ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांसाठी केंद्रीय पद्धती अवलंबिण्यात येणार असल्याने बीएनएसएलच्या ग्राहकांना लवकरच नव्या सुविधा प्राप्त होण्याची शक्यता आहे.
- त्यामध्ये रात्रीच्या वेळी विनामूल्य कॉल्स्चाही समावेश असल्याची माहिती बीएसएनएलमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
- दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी बीएनएनएल विविध अभिनव योजना राबवित आहे.
- अलिकडेच लॅण्डलाईनधारकांना रात्री 9 ते सकाळी सातच्या दरम्यान बीएसएनएल लॅण्डलाईन तसेच कोणत्याही मोबाईल क्रमांकावरील कॉल्स विनामूल्य करण्यात आले आहेत.
- आता आणखी काही आकर्षक योजना ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार आहेत. दिवाळीपर्यंत ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे केंद्रीकरण करण्यात येणार आहे.
- याशिवाय बीएसएनएलच्या लॅण्डलाईन तसेच मोबाईल ग्राहकांना आपले दोन्ही क्रमांक जोडता येणार आहेत.
- एप्रिलमध्ये आकडेवारीनुसार देशभरातील दूरसंचार कंपनीच्या ग्राहकांच्या तुलनेत बीएसएनएल सहाव्या क्रमांवर आली आहे.
- ऑगस्टअखेरपर्यंत देशभरात बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या 7 कोटींवर पोचली आहे.
- तसेच ऑगस्टनंतर दरमहा वाढ होणाऱ्या ग्राहकांच्या संख्येच्या स्पर्धेत बीएसएनएलचा समावेश पहिल्या पाचमध्ये झाला आहे
Must Read (नक्की वाचा):
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड :
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी आणि वस्त्रहरणकार म्हणून ओळख असणाऱ्या गंगाराम गवाणकर यांची निवड झाली आहे.
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गंगाराम गवाणकर यांची नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आल्याचे नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी घोषित केले.
कैलास सत्यार्थी यांना मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार :
- बाल हक्कांसाठी लढणारे व शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना हार्वर्ड विद्यापीठातर्फे वर्षातील सर्वोत्तम मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या हार्वर्ड विद्यापीठातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
- मानवी हक्कांची पायमल्ली न होऊ देता जीवनाचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकाला हा पुरस्कार देण्यात येतो.
- हा पुरस्कार मिळविणारे सत्यार्थी हे पहिले भारतीय नागरिक आहेत.
- बालकामगार व बाल हक्कांसाठी मोलाचे काम करणाऱ्या कैलास सत्यार्थी यांना यंदाचा मानवतावादी पुरस्कार देण्यात येत असल्याचे विद्यापीठाकडून आज स्पष्ट करण्यात आले.
काही दीर्घिका अतिशय वेगाने ताऱ्यांना जन्म देत होत्या :
- नऊ अब्ज वर्षांपूर्वी काही दीर्घिका या अतिशय वेगाने ताऱ्यांना जन्म देत होत्या व त्या आताच्या दीर्घिकांपेक्षा फारच कार्यक्षम होत्या असे संशोधकांनी म्हटले आहे.
- बहुतांश तारे जेथे दीर्घिकेचे वस्तुमान जास्त असते तेथे मेन सिक्वेन्सवर असतात.
- तेथे नवीन तारे निर्माण करण्याची क्षमता जास्त असते.
- असे असले तरी प्रत्येकवेळी जेव्हा नवीन ताऱ्यांचा स्फोट होतो तेव्हा तो भाग इतर भागापेक्षा जास्त प्रकाशमान दिसतो.
- दोन मोठय़ा दीर्घिकांची टक्कर ही तारकास्फोटाची स्थिती निर्माण करते त्या भागात महाकाय रेणवीय ढगात शीत वायू असतात व ते तारकानिर्मितीचे इंधन असते.
- खगोलवैज्ञानिकांनी असा प्रश्न केला आहे की, सुरुवातीच्या विश्वातील तारकास्फोट हे मोठय़ा वायू पुरवठय़ामुळे होतात किंवा दीर्घिकांमध्ये वायू निर्मिती होत असल्याने होतात.
- कावली इन्स्टिटय़ूट फॉर द फिजीक्स अँड मॅथेमेटिक्स ऑफ द युनिवर्स या संस्थेचे जॉन सिल्वरमन यांच्या नेतृत्वाखाली सात दीर्घिकांतील कार्बन मोनॉक्साईड या वायूचा अभ्यास करण्यात आला.
- त्यावेळी विश्व चार अब्ज वर्षे वयाचे होते. चिलीतील माउंटनटॉप येथे अटाकामा लार्ज मिलीमीटर अॅरे या ठिकाणी त्याचा अभ्यास करण्यात आला.
- काही मिलीमीटर लांबीच्या विद्युतचुंबकीय तरंगलांबीच्या लहरींचा शोध यात घेण्यात आला.
- संशोधकांच्या मते कार्बन मोनॉक्साईड वायूचे प्रमाण ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग जास्त असतानाही कमी होताना दिसले.
- या निरीक्षणांचा संबंध पृथ्वीनजीकच्या तारकास्फोट होत असलेल्या दीर्घिकांचे जे निरीक्षण करण्यात आले त्याच्याशी असून त्यात काही साम्यस्थळे आहेत.
- यात वायू कमी होण्याचा वेग हा अपेक्षेइतका नव्हता. संशोधकांच्या मते मेन सिक्वेन्स या भागात ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग किती जास्त असतो यावर त्या र्दीघिकेची कार्यक्षमता अवलंबून आहे.
- अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
अग्निक्षेपणास्त्राची चाचणी घेण्यास भारतावर अमेरिका आणि नाटोचा दबाव :
- 1989 मध्ये अग्निक्षेपणास्त्राची चाचणी घेण्यास भारतावर अमेरिका आणि नाटोचा दबाव होता.
- त्यामुळे चाचणीच्या काही तास अगोदर शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पंतप्रधान कार्यालयाचा अचानक फोन आल्याने अग्नीच्या उड्डाणास विलंब झाला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे.
- हॉर्परकॉलिन इंडियातर्फे सृजनपाल सिंह यांनी लिहिलेल्या “ऍडव्हांटेज इंडिया, फ्रॉम चॅलेंज टू ऑपोर्च्युनिटी” या पुस्तकात अग्निक्षेपणास्त्राची चाचणी घेण्यापूर्वी रात्री तीन वाजता नेमके काय घडले होते, याची माहिती कलाम यांनी या पुस्तकात दिली आहे.
- 22 मे 1989 रोजी अग्नीची यशस्वी चाचणी झाली.
- अग्नीची शर्यत आम्ही कशी जिंकली, याची माहिती कलाम यांनी दिली होती असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.
दिनविशेष :
- मानव अधिकार दिन.
- 1889 : दिग्बोई येथे भारतातील खनिज तेल देणारी पहिली विहीर खोदण्यात आली.
- 1970 : भारतात बनविलेले ‘मिग’ जातीचे पहिले लढाऊ विमान हवाई दलात दाखल झाले.