चालू घडामोडी (19 सप्टेंबर 2016)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका दौऱ्यावर :
- राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या जगप्रसिद्ध कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे.
- तसेच त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
- ‘ओरॅकल’च्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून, ही जगप्रसिद्ध कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करीत आहे.
- ओरॅकलतर्फे आयोजित ओपन वर्ल्ड या प्रतिष्ठेच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रमुख भाषण होणार आहे.
-
- एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परिषदेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानात ओरॅकल कंपनी सहभागी होणार आहे.
- भविष्यातील गरजांचा विचार करून त्या अनुरूप सुविधा, यंत्रणा उभी करण्यात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
- तसेच राज्यातील स्मार्ट सिटी अभियानासाठी आवश्यक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची उभारणीही ओरॅकलतर्फे करण्यात येणार आहे.
अब्जाधीश आचार्य बालकृष्ण :
- भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत आता ‘पतंजली’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आचार्य बालकृष्ण यांच्या नावाचा समावेश झाला आहे.
- पतंजली आयुर्वेद ही योग गुरू रामदेव बाबा यांनी सुरू केलेली कंपनी आहे.
- चीनमधील एका प्रसिद्ध मासिकाने जाहीर केलेल्या यादीनुसार भारतातील एकूण 399 उद्योगपतींमध्ये बालकृष्ण यांचा 25वा क्रमांक असून, त्यांच्याकडे तब्बल 25 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
- ‘पतंजली’च्या स्थापनेपासून अवघ्या पाच वर्षांत बालकृष्ण हे अब्जाधीश बनले आहेत.
- रामदेव बाबा हे पतंजली आयुर्वेद या कंपनीचा चेहरा असले, तरी कंपनीचे 96 टक्के शेअर हे बालकृष्ण यांच्या नावावर आहेत.
- चीनमधील हुरून मासिकाने म्हटले आहे, की पतंजली हा सर्वांत वेगाने वाढणारा ‘एफएमसीजी’ ब्रॅंड असून, 2015-16 मध्ये या कंपनीची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होती.
ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत संभाजीचा गोल्डन कामगिरी :
- औरंगाबादचा उदयोन्मुख 17 वर्षीय नेमबाज संभाजी शिवाजी झनझन-पाटील याने इतिहास रचताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी डबल गोल्डन धमाका केला.
- तसेच या शानदार कामगिरीने भारतानेदेखील पहिल्याच दिवशी सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली.
- अजरबेजानच्या गबाला येथे सुरू असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत औरंगाबादच्या संभाजी पाटील याने ज्युनियर पुरुषांच्या 25 मीटर स्टँडर्ड पिस्टल स्पर्धेत 562 गुणांसह ऑस्ट्रेलियाच्या सरगेई इवग्लेस्की आणि जेम्स एशमोर यांना मागे टाकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
- सरगेईने रौप्य आणि जेम्स एश्मोर याने कांस्यपदक जिंकले.
- संभाजीने सांघिक सुवर्ण गुरमीत आणि रितुराजसिंह यांच्यासाथीने देशाला जिंकून दिले. त्याआधी बंगालच्या शुभंकर प्रामाणिक याने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
यंदाचे साहित्य संमेलन डोंबिवलीत :
- याआधी कधीही साहित्य संमेलन न अनुभवलेले आणि महाराष्ट्रातले पहिले साक्षर शहर म्हणून ओळख असणाऱ्या मराठमोळ्या डोंबिवलीला आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.
- तसेच येत्या काळात होऊ घातलेले 90 वे साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार यावर अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत (दि.18) शिक्कामोर्तब झाले.
- मात्र, या निर्णयाची अधिकृत घोषणा मंगळवारी (दि.20) नागपूर येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेत करण्याचा अजब निर्णय महामंडळातर्फे घेण्यात आला आहे.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेत झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विलास देशपांडे, इंद्रजित ओरके, सुधाकर भाले, प्रकाश पायगुडे, दादा गोरे, उज्ज्वला मेहेंदळे यांच्या समितीने स्थळ निवड अहवाल मांडला.
- तसेच यावर झालेल्या चर्चेत संमेलनासाठी डोंबिवली किंवा बेळगाव यापैकी एका ठिकाणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. अखेर चर्चेअंती डोंबिवलीची निवड करण्यात आली.
क्रिकेट संघटनेतर्फे माजी कर्णधारांचा सत्कार होणार :
- यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्कवर 22 सप्टेंबरपासून भारताच्या खेळल्या जाणाऱ्या 500 व्या कसोटी सामन्यादरम्यान उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेतर्फे भारताच्या माजी 12 कसोटी कर्णधारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
- माजी कर्णधारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अनेक माजी कर्णधारांबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
- ‘यूपीसीए’चे संचालक राजीव शुक्ला यांनी (दि.18) पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘यूपीसीएने सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी सकाळी माजी कसोटी कर्णधारांचा विशेष सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.’
- आतापर्यंत 12 माजी कसोटी कर्णधारांनी निमंत्रणाचा स्वीकार करीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.
दिनविशेष :
- 1867 : पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक यांचा जन्मदिन.
- 1893 : न्यू झीलँडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
- 1911 : सर विल्यम गोल्डिंग, नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश लेखक यांचा जन्मदिन.
- 1957 : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा