चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2016)
राज्यस्तरीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत अभिमन्यू गांधी चॅम्पियन :
- पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित राज्यस्तरीय खुल्या स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अभिमन्यू गांधीने मुंबईच्याच प्रियांक जयस्वालचा 4-2 अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले.
- अंतिम फेरी मुंबईकरांमध्येच झाल्याने स्पर्धेवर मुंबईचे एकाहाती वर्चस्व राहिले.
- पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत दोन्ही मुंबईकरांमधील अंतिम लढतीत चांगलीच रंगली.
- अडीच तास चाललेली ही निर्णायक लढत 28 वर्षीय अभिमन्यूने 48-56, 50-11, 26-69, 75-25, 61-27, 63-56 अशी जिंकली.
- तसेच, सर्वाधिक गुणांच्या ब्रेकचे पारितोषिक आनंद रघुवंशीने पटकावले.
यूबीए प्रो बास्केटबॉल लीगमध्ये चेन्नई स्लॅमला विजेतेपद :
- चेन्नई स्लॅम संघाने नियोजनबद्ध खेळ करीत यूबीए प्रो बास्केटबॉल लीगच्या तिसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले.
- म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेली निर्णायक लढत चेन्नईने 69-59 अशी जिंकली.
- धडाकेबाज खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाबला गेल्या लढतीतील आपला फॉर्म कायम ठेवण्यात अपयश आले.
- दुसरीकडे, योग्य नियोजन आणि कल्पकतेची जोड देऊन चेन्नईने चारही क्वाटर्समध्ये वर्चस्व राखले.
- तसेच यासह चेन्नईने 10 लाख, तर उपविजेत्या पंजाबने 5 लाखांचे पारितोषिक मिळविले.
बुलंदशहरचे नवे एसएसपी अनीस अन्सारी :
- बुलंदशहर येथे झालेल्या घृणास्पद प्रकरणात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कारवाईचा बडगा उगारत (दि.31 जुलै) जिल्हा पोलिस अधीक्षक वैभव कृष्णसह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
- दरम्यान, बुलंदशहरचे नवीन वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) म्हणून अनीस अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्मार्टफोन विक्रीचा वेग मंदावला :
- भारतात स्मार्टफोनची विक्री एप्रिल ते जून या तिमाहीत लक्षणीयरीत्या मंदावली असून, याला स्थानिक भाषांमध्ये इंटरनेट वापरण्याची सुविधा नसणे आहे.
- तसेच यामुळे भारतातील स्मार्टफोनधारकांतील पाचपैकी केवळ एकच स्मार्टफोनधारक इंटरनेटचा वापर करतो, असे काउंटर पॉइंट टेक्नॉलॉजीज या हॉंगकॉंगस्थित संस्थेने केलेल्या पाहणीत आढळले आहे.
- जूनअखेर संपलेल्या तिमाहीत स्मार्टफोनची बाजारपेठ 15 टक्के वाढली आहे.
- जानेवारी ते मार्च तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत 23 टक्के वाढ झाली होती.
- स्मार्टफोन विक्रीचा वेग मंदावण्याला प्रामुख्याने स्थानिक भाषांमध्ये इंटरनेट वापरण्याची सुविधा नसणे आणि स्थानिक गोष्टींविषयी त्यावर माहिती नसणे हे कारण आहे.
- देशातील स्मार्टफोन बाजारपेठेत दक्षिण कोरियातील सॅमसंग कंपनीने आपले आघाडीचे स्थान मागील तिमाहीत कायम ठेवले आहे.
नरसिंग यादवची डोपिंगमधून सुटका :
- कुस्तीपटू नरसिंग यादवला राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (नाडा) कडून दिलासा मिळाला आहे.
- डोपिंगप्रकरणी नरसिंग यादव याच्यावर घालण्यात आलेली बंदी नाडाने उठविल्यामुळे ते रिओ येथे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणार आहे.
- नरसिंग यादवला डोपिंगमध्ये अडकवण्यात आले होते, असे नाडाने स्पष्टपणे म्हटले आहे, तर या निर्णयामुळे आपण आनंदी असून, आपल्याला न्याय मिळाला असे नरसिंग यादवने म्हटले आहे.
- रिओ ऑलिम्पिकपूर्वी डोपिंग टेस्टमध्ये कुस्तीपटू नरसिंग यादव पकडला गेला होता. यात त्याचा काही दोष नसून त्याच्या ड्रिंक्समध्ये काहीतरी भेसळ झाल्याचे सांगत नाडाने त्याला मोठा दिलासा दिला असून त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यात आली आहे.
- नरसिंगने दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या सुशीलकुमार विरुद्ध न्यायालयीन लढाई जिंकताना रिओ ऑलिम्पिक प्रवेश मिळवला होता.
आता वेगवान ‘टॅल्गो’ ट्रेन मुंबईत :
- मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच काही तासांनी कमी होणार आहे.
- या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान अशी ‘टॅल्गो’ ट्रेन सुरू केली जाणार असून, तिची सध्या चाचणी केली जात आहे.
- दोन मार्गांवर यशस्वी चाचणी झाल्यानंतर या ट्रेनची चाचणी दिल्ली ते मुंबई अशी घेतली गेली.
- तसेच ही ट्रेन ताशी 130 किलोमीटच्या वेगाने धावून 13 ते 14 तासांत पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे दाखल झाली.
- जवळपास 45 कोटी रुपये किंमत असलेली ही ट्रेन सुपरफास्ट राजधानीपेक्षाही अधिक वेगवान असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
दिनविशेष :
- 1861 : प्रफुल्लचंद्र रे, बंगाली रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म दिन.
- 1869 : जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
- 1958 : अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू जन्म दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा