Current Affairs (चालू घडामोडी) of 2 December 2014 For MPSC Exams

अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | 26 जानेवारी ला होणार हरियाणातील ‘मर्दानी’ चा सत्कार |
2. | पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतच |
3. | इंटरनेट वापरण्यात भारतीय जगात भारी |
4. | बाबासाहेबांच्या स्मारकाचे 14 एप्रिलला भूमिपूजन |
5. | तृतीयपंथीयांना आधारकार्ड देण्याची ग्वाही |
6. | पदमश्री डॉ. प्रकाश आमटे यांना चंद्रपुर भूषण पुरस्कार प्रदान |
26 जानेवारी ला होणार हरियाणातील ‘मर्दानी’ चा सत्कार :
- चंदिगड मध्ये चालत्या बसमध्ये छेडछाड करणार्या तीन तरुणांची धुलाई करत त्यांनी चांगला धडा शिकवला, या दोन बहीणींचा हरियाणा सरकारतर्फे 26 जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री मनोहरलाल खटटर यांच्या हस्ते सत्कार होणार असून त्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतच :
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्टीकरण दिले.
- रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कुठलाही प्रस्ताव पुढे सरकू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
इंटरनेट वापरण्यात भारतीय जगात भारी :
- इंटरनेट चा सातत्याने वापर करण्यामध्ये भारतीय जगात भारी असल्याचे एका सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे.
- 52% भारतीय सातत्याने विविध उपकरणांच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करीत असतात .
- लंडन मधील ‘एटी केर्ने ग्लोबल रिसर्च‘ या व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनीने नुकतेच हे सर्वेक्षण केले.
- ‘कनेक्टेड कम्झूमर्स आर नॉट क्रियेटेड इक्वल : एग्लोबल पर्सपेक्टिव‘ असे या सर्वेक्षण प्रबंधाचे नाव आहे.
- चीन (36%), जपान (39%) व भारत (53%) इंटरनेट च वापर करतात.
बाबासाहेबांच्या स्मारकाचे 14 एप्रिलला भूमिपूजन :
- राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन 14 एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.
- हे स्मारक मुंबईत स्थापन होणार आहे.
तृतीयपंथीयांना आधारकार्ड देण्याची ग्वाही :
- जिल्ह्यातील तृतीयपंथी व दहविक्रय करणार्या महिलांना मतदान नोंदणी, आधार कार्ड आणि रेशन कार्ड देवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता येईल.
- जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसळ यांनी अशी ग्वाही दिली.
पदमश्री डॉ. प्रकाश आमटे यांना चंद्रपुर भूषण पुरस्कार प्रदान :
- लोकाग्रणी बळवंतराव देशमुख स्मृति प्रतिस्ठानाच्या वतीने स्नेहंकिय या सांस्कृतिक संस्थेच्या व्यासपीठावर रविवारी हा पुरस्कार देण्यात आला.
- मॅगसेसे पुरस्कारानंतर नुकताच त्यांना मदर तेरेसा पुरस्कारही जाहीर झाला आहे.
दिनविशेष :
- 1.1989 : पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंह यांची शपतविधी.
- 2.1911 : ब्रिटिश अधिपती पंचम जॉर्ज व रानी मेरी यांनी बोटीचे आगमन. ते मुंबईत जेथे उतरले तेथेच पुढे ‘ग्रेट वे ऑफ इंडिया’ बांधण्यात आले.