Current Affairs of 2 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2015)

तमिळनाडू सरकार ऍडव्हेंचर पार्क उभारणार :

  • केरळमधील कोल्लम जिल्ह्यात अचादायमंगलम या नावानेही ओळखले जानार्‍या डोंगराळ भागामध्ये तमिळनाडू सरकार ऍडव्हेंचर पार्क उभारणार असून, त्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी दुबईचा पर्यटन विभागदेखील मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  • याच परिसरामध्ये जटायूची अवाढव्य मूर्तीही उभारण्यात येईल. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याबरोबरच हे पार्क देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे काम करेल.
  • आघाडीचे चित्रपट निर्माते राजीव आंचल हे जटायूची महाकाय मूर्ती साकारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते स्वत: जटायूपुरा पर्यटन लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
  • ही मूर्ती स्थापत्यशास्त्राचादेखील अप्रतिम नमुना असेल. तिची समुद्रसपाटीपासूनची उंची 1 हजार फूट एवढी आहे. खासगी आणि सरकारी भागिदारीतून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारला जाणारा हा पहिला प्रकल्प आहे. या ऍडव्हेंचर पार्कमध्ये उभारली जाणारी जटायूची मूर्ती ही एखाद्या पक्ष्याची जगातील पहिली सर्वांत उंच मूर्ती असेल.
  • या ऍडव्हेंचर पार्कमध्ये 6-डी थिएटर, डिजिटल म्युझियम, ऍडव्हेंचर झोन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणारे रिसॉर्ट असेल. या पार्कमध्ये केबल कारचा वापर करण्यात येईल. नुकतेच या पार्कच्या www.jatayunaturepark.com अधिकृत संकेतस्थळाचे उद्‌घाटनही करण्यात आले.

राज्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यासाठीचा मसुदा तयार :

  • राज्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यासाठीचा मसुदा तयार करून त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
  • सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य सरकारच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात पत्रकारांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्‍न, आरोग्य विमा आणि पत्रकारांची सामाजिक सुरक्षा याबाबतही सकारात्मक निर्णय घेणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

सानिया मिर्झा अव्वल स्थानावर कायम :

  • देशातील नंबर वन टेनिस खेळाडू युकी भांबरी याची ताज्या एटीपी मानांकनानुसार दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो 93 व्या स्थानी आहे, तर सोमदेव देववर्मन याची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो आता 181 व्या स्थानावर आहे.
  • साकेत माईनेनी हा 171 व्या स्थानी, रामकुमार रामनाथन 260 व्या स्थानी पोहोचला आहे. त्याने 13 स्थानांनी सुधारणा केली आहे.
  • दुहेरी गटात, रोहन बोपण्णा नवव्या स्थानावर कायम आहे. लिएंडर पेस 41 व्या, तर पुरव राजा 93 व्या क्रमांकावर आहे.
  • डब्ल्यूटीए युगुल मानांकनात सानिया मिर्झा अव्वल स्थानावर कायम आहे. तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीससुद्धा 11355 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
  • तसेच एकेरीत अंकिता रैना ही 255 व्या स्थानावर आहे.

हिंद महासागराच्या तळाशी छिद्र पाडायला सुरुवात :

  • पृथ्वीच्या कठीण थराच्या खाली जाण्यासाठी शास्त्रज्ञ या आठवड्यात हिंद महासागराच्या तळाशी छिद्र पाडायला सुरुवात करतील.
  • इंटरनॅशनल ओशन डिस्कव्हरी प्रोग्रॅमच्या (आयओडीपी) मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालेल. पृथ्वीच्या आच्छादनापासून (खोलवरील भाग) त्यांना खडकाचा नमुना हवा असल्यामुळे हे छिद्र पाडले जाणार आहे.
  • या प्रक्रियेमध्ये संशोधकांना हा कठीण थर नेमका कशापासून बनलेला आहे याबद्दल त्यांची जी समज आहे ती तपासून घेता येईल अशी आशा आहे.
  • हे छिद्र पाडणारे जहाज जॉईडस् रिझोल्युशन (जेआर) आणि समुद्राचा तळ यांच्यातील 700 मीटर पाण्याशिवाय हे छिद्र पाडले जाईल. हाच तो प्रसिद्ध खंड/व्यत्यय आहे जेथून भूकंपासंबंधीच्या लाटा या आकस्मिकपणे गती बदलतात.

दीर्घिकेत एक कृष्णविवर ताऱ्याला गिळत असताना वैज्ञानिकांना प्रथमच पाहता आले :

  • तीस कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या दीर्घिकेत एक कृष्णविवर ताऱ्याला गिळत असताना वैज्ञानिकांना प्रथमच पाहता आले व त्यातून प्रकाशाच्या वेगाने द्रव्याची ज्वाला बाहेर फेकली जात होती.
  • सूर्याच्या आकाराइतका तारा गुरूत्वीय ओढीने अतिजास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरात कोसळतो व गिळला जातो, असे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे सिजोर्ट व्हॅन व्हेलझेन यांनी सांगितले.
  • त्यांनी हबल दुर्बिणीच्या मदतीने हे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, कृष्णविवराने तारा गिळताना पाहण्याची ही पहिलीच संधी आम्हाला मिळाली त्यातून शंकू आकाराच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या.
  • अनेक महिने हे नाटय़ अवकाशात घडत होते. कृष्णविवरे ही अवकाशातील अशी ठिकाणे आहेत जिथे गुरूत्वाकर्षणाने द्रव्य, वायू व प्रकाशही त्यातून बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे कृष्णविवरे दिसत नाहीत पण ती अवकाशात पोकळीचा परिणाम साधतात. खगोलवैज्ञानिकांच्या मते जेव्हा कृष्णविवर एखादा तारा गिळते तेव्हा त्याच्या जवळच्या भागातून चुंबकीय क्षेत्रातील मूलभूत प्लाझ्मा कण बाहेर पडतात.
  • ते फार वेगवान असतात. हा आधी अंदाज होता पण आता तो खरा ठरला आहे. महा वस्तुमानाची कृष्णविवरे ही खूप जास्त वस्तुमानाच्या दीर्घिकांच्या मध्यावर असतात.
  • आताचे हे कृष्णविवर शेवटच्या स्थानावर आहे व त्याचे वस्तुमान सूर्याच्या काही लक्ष पट अधिक आहे पण तरी त्याने तारा गिळला आहे.
  • तारा गिळला जात असतानाची क्रिया गेल्या डिसेंबरमध्ये दिसली व नंतर रेडिओ दुर्बिणींनी त्याचा पाठपुरावा करण्यात आला. हे सर्व घडत असताना पृथ्वीवरील दुर्बिणींनी क्ष किरण, रेडिओ व प्रकाशीय संदेश पकडले. त्यातून या घटनेचे बहुतरंगलांबीचे चित्र तयार करता आले.
  • तारा गिळताना या कृष्णविवरातून प्रवाह बाहेर पडले. कृष्णविवर असलेली दीर्घिका 30 कोटी प्रकाशवर्षे दूर आहे, बाकी कृष्णविवरे तीन पट दूर आहे.
  • आंतरराष्ट्रीय पथकाने दीर्घिकेतील प्रकाश वेगळ्या कारणाने दिसत असल्याचे म्हटले होते व तारा गिळण्याशी त्याचा संबंध फेटाळला होता, पण अचानक प्रकाश वाढल्याने तारा कृष्णविवरात अडकल्याने निर्माण झाला होता. वेलझेन यांनी सांगितले की, ताऱ्याच्या अवशेषांपासून बनलेले प्रवाह या घटनेची माहिती देतात.
  • ‘जर्नल सायन्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला

दिनविशेष :

  • संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य राष्ट्र दिन
  • लाओस राष्ट्र दिन
  • 2001 : एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago