चालू घडामोडी (2 डिसेंबर 2016)
64व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक :
- ममता पुजारी, पायल चौधरी व रेखा यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय रेल्वे महिला संघाने 64व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघाचा 20-15 गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
- महाराष्ट्राच्या महिलांना उपांत्य फेरीत हरियाणाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तृतीय क्रमांकावर (कांस्यपदक) समाधान मानावे लागले.
- आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाच्या नवीन नियमांनुसार उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना तृतीय क्रमांक (कांस्यपदक) देण्यात आला.
- बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने पाटलीपुत्र क्रीडासंकुल (पाटणा) येथे संपलेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्र संघाचा 25-21 गुणांनी पराभव केला.
- तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय रेल्वेने आंध्र प्रदेशाला 37-20 गुणांनी नमविले. त्यामुळे आंध्र प्रदेश संघालासुद्धा कांस्यपदक देण्यात आले.
मॅग्नस कार्लसन बुद्धिबळ स्पर्धेचा विश्वविजेता :
- नार्वेच्या मॅग्नस कार्लसनने सलग तिसऱ्यांदा बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद मिळवून स्वत:लाच बर्थ डे गिफ्ट दिले आहे.
- भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदसाठी सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या युवा कार्लसनने रशियाच्या सर्गेई कार्जाकिन याला हरवून सलग तिसऱ्यांदा बुद्धिबळाचा राजा आपणच असल्याचे पुन्हा सिद्ध केले.
- कार्लसनने येथे न्यूयॉर्कमध्ये तीन आठवडे चाललेल्या स्पर्धेत किताबावर नाव कोरले.
- विश्वविजेतेपद पुन्हा आपल्याकडे राखण्यासाठी कार्लसनला रशियाच्या कार्जाकिनने चांगलीच लढत दिली. बारा फेऱ्यांनंतर बरोबरी झाली होती. परंतु अंतिम फेरीत नॉर्वेच्या खेळाडूने 64 घरांवरील आपले वर्चस्व सिद्ध करताना विश्वविजेतेपदाचा मुकुट आपल्याच डोक्यावर राखण्यात यश मिळवले.
कुस्तीतील “द्रोणाचार्य” भालचंद्र भागवत यांचे निधन :
- कुस्ती खेळातील पहिले द्रोणाचार्य भालचंद्र ऊर्फ “भाल” भागवत (वय 85 वर्ष) यांचे 1 डिसेंबर रोजी अमेरिका येथे निधन झाले.
- पुण्यात जन्मलेल्या भालचंद्र भागवत यांचे शिक्षणही पुण्यातच झाले. घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाल्यामुळे त्यांनी या खेळात झटपट प्रावीण्य मिळविले होते. शालेयस्तरापासून त्यांनी कुस्तीची मैदाने गाजवायला सुरवात केली होती.
- 1948 ते 1955 या कालावधीत शालेय आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्यांची जणू मक्तेदारीच होती.
- आंतरमहाविद्यालयीन कालावधीत सलग अकरा वर्षे त्यांनी बॅंटमवेट गटातील विजेतेपद राखले होते. पुढे 1992 मध्ये त्यांची हेलसिंकी ऑलिंपिकसाठी भारतीय संघात निवड झाली; पण दुर्दैवाने त्यांना त्या वेळी सहभागी होता आले नाही. त्यांची जागा तेव्हा खाशाबा जाधव यांनी घेतली होती.
- पुण्यात गरवारे महाविद्यालयात 1959 ते 1962 शारीरिक शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर 1962 ते 1991 ते पतियाळात राष्ट्रीय क्रीडा संस्थेत कुस्तीचे मुख्य प्रशिक्षक होते.
गुरूसारखा उष्ण बाह्य़ग्रह ग्रहाचा शोध :
- गुरूसारखा उष्ण दाट आवरण असलेला बाह्य़ग्रह शोधण्यात आला असून तो पृथ्वीपासून 1800 प्रकाशवर्षे दूर आहे.
- सूर्यासारख्या सहा अब्ज वर्षे जुन्या ताऱ्याभोवती हा ग्रह फिरत असून अधिक्रमणामुळे तो सापडला आहे.
- ग्रहाचे नाव एपिक 220504338 बी असे असून तो नासाच्या केप्लर के 2 मोहिमेत प्रथम शोधला गेला.
- चिलीच्या पाँटिफिकल कॅथोलिक विद्यापीठाचे नेस्टर एस्पिनोझा यांनी युरोपीय खगोल संशोधन संस्थेच्या इशेली वर्णपंक्ती यंत्रणेचा (फेरॉस) वापर करून पाठपुराव्याचे संशोधन केले.
- फेरॉस यंत्रणेमुळे एपिक 220504338 बी या गुरूसारख्या उष्ण ग्रहाची निरीक्षणे शक्य झाली. मातृताऱ्यासमोर त्याचे अधिक्रमण झाले ते पाहता आले.
- एपिक 220504338 बी हा वायूरूप व महाकाय ग्रह आहे त्याची गुणवैशिष्टय़े ही गुरूसारखीच आहेत त्याचा कक्षीय काळ 10 दिवसांपेक्षा कमी आहे.
दिनविशेष :
- भारतीय वैमानिक ईंद्र लाल रॉय यांचा जन्म 2 डिसेंबर 1898 मध्ये झाला.
- 2 डिसेंबर 1905 हा मराठी कवी, अनंत काणेकर यांचा स्मृतीदिन आहे.
- 2 डिसेंबर 1937 हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्मदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा