चालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2016)
सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख अधिकारी अर्चना रामसुंदरम :
- सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या निम-लष्करी दलाच्या प्रमुख होणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत.
- 1980 च्या तामिळनाडूच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेल्या अर्चना रामसुंदरम यांच्या या नियुक्तीने नवा इतिहास घडला आहे.
- भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- या आधी त्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो) संचालक होत्या.
- त्यांच्या या नियुक्तीला (सीबीआय अतिरिक्त संचालक) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
- सुरक्षा अस्थापनात फेरबदल करताना केंद्र सरकारने के. दुर्गाप्रसाद यांची केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेला 39 वर्षे पूर्ण :
- भारतीय तटरक्षक दलाने (दि.1) देशाच्या आपत्ती निवारण सेवेमधील आपले महत्त्वपूर्ण अस्तित्व आणि आव्हानात्मक वाटचालीचे 40 वे वर्ष साजरे केले.
- तसेच या दलाच्या स्थापनेला 39 वर्षे पूर्ण झाली आणि आता त्यांनी 40व्या वर्षांत पदार्पण केले,आपल्या सागरी सीमांवरील त्यांची कठोर सेवा अनुकरणीय आहे.
- किनाऱ्यांचे रक्षण करण्यापासून समुद्रात अनेकांचे जीव वाचवणे आणि युद्धनौकांचे प्रदूषण रोखण्यासारख्या सेवेबद्दल आम्हाला आमच्या तटरक्षक दलाच्या जवानांचा अभिमान वाटतो, असे प्रंतप्रधान म्हणतात.
- भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आली होती.
- 1978 मधील तटरक्षक दल कायद्यामुळे हे दल केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत पूर्णपणे स्वतंत्र लष्करी दल म्हणून कार्यरत झाले.
- कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने एक प्रभावी उपाययोजना निश्चित करण्यासाठी टेहळणी, गोपनीय माहिती मिळविणे आणि संबंधित विविध घटकांदरम्यान माहितीची देवाणघेवाण करण्यावर भर देताना तटरक्षक सुरक्षा मोहिमेत बदल करण्यात आला असल्याची माहिती तटरक्षक दलाने स्थापना दिनानिमित्त एका निवेदनाद्वारे दिली.
महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांनी पुन्हा बाजी मारली :
- 2012 मध्ये मीरा रोड येथे झालेल्या कुस्तीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने (दि.31) येथील अभिनव विद्यामंदिर पटांगणात पार पडलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पुन्हा बाजी मारली.
- आपल्या लौकिकानुसार खेळ करताना समाधानने सहज वर्चस्व राखले.
- तसेच प्रथमच महिलांसाठी खेळण्यात आलेल्या कुस्तीमध्ये भार्इंदरच्याच कोमल देसाईने विजेतेपदावर कब्जा केला.
- संजीवनी फाउंडेशन व मीरा-भार्इंदर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैदानी कुस्ती स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व विटाच्या बेनापूर गावातील महाराष्ट्र चॅम्पियन अप्पा बुटे यांच्यात खेळविण्यात आली.
सानिया-हिंगीस प्रथम स्थानी :
- ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीच्या विजेतेपदासह सलग तिसरे ग्रँडस्लॅमचे अजिंक्यपद पटकावणारी भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने (दि1) जाहीर झालेल्या ताज्या रँकिंगमध्ये एकसमान 12925 गुणांसह संयुक्तरूपाने ‘नंबर वन’वर स्थान मिळवला.
- सानिया आणि हिंगीसने आपले अव्वल स्थान कायम ठेवले, या दोन्ही खेळाडू आणि तिसऱ्या स्थानावरील कॅसी डेलाकुआ यांच्यात मोठ्या अंतराचा फरक आहे.
- महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विलियम्स 9245 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर नवीन चॅम्पियन जर्मनीची एंजेलिक केर्बरने 5700 गुणांसह महिला रँकिंगमध्ये दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
- भारताचा दुहेरी तज्ज्ञ रोहन बोपण्णाने आपल्या दुहेरीच्या रँकिंगमध्ये एका स्थानाने प्रगती केली आहे आणि आता तो आठव्या स्थानी पोहोचला आहे.
टी-20 मानांकन फलंदाजांमध्ये विराट प्रथम स्थानी :
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारतीय फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अॅरोन फिंचला पिछाडीवर टाकताना अव्वल स्थान पटकावले आहे.
- आयसीसीतर्फे जाहीर झालेल्या क्रमवारीत कोहलीने मालिकेत 47 मानांकन गुणांची कमाई केली, तो 892 मानांकन गुणांसह फिंचपेक्षा आघाडीवर आहे.
- भारताच्या सुरेश रैनाने तीन स्थानांची प्रगती करताना 13वे स्थान पटकावले.
- सलामीवीर रोहित शर्माने चार स्थानांची प्रगती करताना 16वे स्थान पटकावले.
‘गुगल’कडून ‘5 जी’ इंटरनेटची चाचपणी :
- इंटरनेट स्पीडची ‘4 जी’ सुविधा दाखल झाली असतानाच आता ‘गुगल’कडून न्यू मेक्सिको येथे ‘5 जी’ इंटरनेटसाठीची चाचपणी घेण्यात आल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ वृत्तसंस्थेने दिले आहे.
- सध्याच्या ‘4 जी’ सेवेपेक्षा अनेकपट जलद इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सौरउर्जेवर चालणाऱया ड्रोनच्या साहाय्याने ‘5 जी’ इंटरनेटसाठीची न्यू मेक्सिको येथे चाचणी घेण्यात आली आहे.
- ‘गुगल’ची ही ‘5 जी’ इंटरनेट सेवा ‘हाय फ्रिक्वेन्सी मिलिमीटर वेव्ह’ तंत्रज्ञानावर आधारलेली असून, प्रत्येक सेकंदाला जीबीचा डाटा स्पीड उपलब्ध होईल इतकी तगडी सेवा नेटिझन्सला मिळू शकेल.
- दरम्यान, उंचावरील ड्रोनकडून मिलीमीटर व्हेव तंत्रज्ञान वापरणे हे आव्हान असले तरी त्यावर तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न गुगलकडून सुरू आहेत.
- ‘गुगल’ने या ‘5 जी’ इंटरनेट प्रकल्पाला ‘स्कायबेंडर’ असे नाव दिले आहे.
- ड्रोन्सद्वारे इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणारी गुगल ही पहिली कंपनी नाही, याआधी फेसबुकनेही अॅक्विला प्रकल्पाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणाऱया ड्रोनच्या सहाय्याने इंटरनेट सेवेची चाचपणी केली होती.
दिनविशेष :
- अमेरिका : ग्राउंडहॉग दिन
- 1653 : अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.
- 1957 : सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन झाले .
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा