Current Affairs of 20 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (20 एप्रिल 2016)

महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सला विक्रमी पुरस्कार :

  • जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठेचा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार मिळवला.  
  • तसेच दुसऱ्या बाजूला अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.
  • नुकताच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये जगातील विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंना 2015 मध्ये केलेल्या कामगिरीनुसार गौरविण्यात आले.
  • जोकोविचला सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • तसेच या वेळी सेरेनाला चौथ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
  • सेरेनाने गतवर्षी जबरदस्त कामगिरी करताना 3 ग्रँडस्लॅम पटकावण्याचा पराक्रम केला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 एप्रिल 2016)

तिरुपती देवस्थान सुवर्ण बचत योजनेत सहभागी :

  • तिरुमला तिरुपती देवस्थानाने केंद्र सरकारच्या सुवर्ण ठेव योजनेनुसार पंजाब नॅशनल बॅंकेत तब्बल 1 हजार 311 किलो सोने जमा केले आहे.
  • तीन वर्षांच्या अल्प मुदतीसाठी हे सोने जमा करण्यात आले आहे.
  • तसेच बॅंकेकडून यावर 1.75 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.
  • मंदिर परिसरात झालेल्या समारंभात हे सोने बॅंकेला देण्यात आले.
  • बॅंकेत 0.996 शुद्ध सोने बिस्किटांच्या स्वरूपात जमा करण्यात आले आहे.
  • तिरुपती देवस्थानने सुवर्ण ठेव योजनेत काही बदल सुचवले आहेत, याविषयी देवस्थानातर्फे रिझर्व्ह बॅंक व केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे.

भगवान महावीर हे जगातील मोठे पर्यावरणवादी :

  • भगवान महावीर जगातील सर्वात मोठे पर्यावरणवादी होते, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 42 वर्षे त्यांनी भारतभ्रमण केले.
  • चिटणवीस पार्क येथे श्री जैन सेवा मंडळातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक ‘महोत्सव-2016’ हे कार्यक्रम पार पडले.
  • या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वाणी बुद्धीवर विजय मिळविण्याची शिकवण भगवान महावीर यांनी दिली.
  • दुसऱ्याशी संघर्ष करण्यापेक्षा स्वत:तील वाईट प्रवृत्तीवर विजय प्राप्त करण्याचा संदेश दिला, हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे.
  • राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करून भूतदयेचा विचार समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.
  • नाशिक जिल्ह्यात मांगीतुंगी महोत्सव सरकारने पुढाकार घेऊन साजरा केला.  
  • महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे हा महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
  • प्रारंभी श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता यांनी प्रास्ताविकात गोवंश हत्याबंदी केल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले.

कॅनबँकची हीम टेक्नोफोर्जमध्ये गुंतवणूक :

  • कॅनबँक व्हेन्चर कॅपिलट फंडाने आपल्या असुचीबद्ध कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या धोरणांतर्गत हीम टेक्नोफोर्जमधील मायनॉरिटी इक्विटी समभागांची निवड केली आहे. यासाठी 30 कोटी रुपयांची गुंतवणूक येईल.
  • तसेच यामध्ये सात कोटी 80 लाख रुपये आयएफसीआय व्हेन्चर कॅपिटल फंडस् लिं. कडील इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरले जातील.
  • अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या आणि वेगाने उत्पादन पूर्ण करतानाच सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी हा विस्तार व गुंतवणुकीचा निर्णय घेतल्याची माहिती कॅनबँक व्हेन्चर कॅपिटल फंड लि.चे कार्यकारी संचालक के.बास्करन यांनी दिली.

न्यूयॉर्क टाइम्सला पुलित्झर पुरस्कार जाहीर :

  • अमेरिकी पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पुलित्झर पुरस्कार विजेत्यांमध्ये यंदा ‘द असोसिएटेड प्रेस’ (एपी) ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्था तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राचा समावेश आहे.
  • पुरस्कारांचे हे 100 वे वर्ष असून न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
  • आग्नेय आशियाई देशांतून अमेरिकी बाजारात येणाऱ्या मासे आणि अन्य सागरी अन्नाच्या व्यापारात मोठय़ा प्रमाणात कामगारांना वेठीला धरले जाते.
  • तसेच त्या गैरप्रकारांवर एपीने 10 लेखांच्या मालिकेतून प्रकाश टाकला होता, त्यानंतर 2000 कामगारांची सुटका होऊन ही यंत्रणा सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. या कार्याबद्दल एपीला पुलित्झर पुरस्कार जाहीर झालाआहे.
  • तर युरोपीय देशांतील निर्वासितांचे प्रश्न छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्याबद्दल रॉयटर्स आणि न्यूयॉर्क टाइम्सला पुरस्कार मिळाला.
  • न्यूयॉर्क टाइम्सला आजवर त्यांच्या पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेबद्दल 117 पुलित्झर पारितोषिके मिळाली आहेत.
  • कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो येथे इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकाडांच्या वृत्तांकनासाठी ‘लॉस एंजल्स टाइम्स’ला पुलित्झर पुरस्कार मिळाला.
  • ‘द बोस्टन ग्लोब’, ‘टॅम्पा बे’ आणि ‘द न्यूयॉर्कर’ या नियतकालिकांनाही प्रत्येकी दोन पुरस्कार मिळाले.

‘हॅशटॅग’चा ब्रँड अॅम्बेसिडर अंकुश चौधरी :

  • मोठ्या पडद्यावरील आपला वावर आणि शैलीने प्रेक्षकांवर एक वेगळी छाप पडणारा महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीत बेंचमार्क सेट केला आहे.
  • उत्कृष्ट फॅशन सेन्स असलेला आणि तीन वेळा महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉनचा पुरस्कार पटकावून हॅट्रिक करणाऱ्या अंकुशच्या जबरदस्त स्टाईलला तरुणांनी नेहमीच उचलून धरले आहे.
  • अंकुशची ‘हॅशटॅग’ नावाच्या मेन्स फॅशन ब्रँडने ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून निवड केली आहे.
  • ‘द हाउस ऑफ कॉरनिया’चे सब-ब्रँड असलेला ‘हॅशटॅग’ ब्रँडमध्ये तरुणांसाठी फॉरमल, कॅज्युअल, पार्टी आणि एथनिक वेअरमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत.
  • अंकुशची तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता, तरुणांमध्ये असलेली त्याची क्रेझ आणि ब्रँडला मॅच होणारे व्यक्तिमत्व यामुळे फॅशन ब्रँडला प्रमोट करण्यासाठी अंकुशची निवड करण्यात आली.
  • तसेच नुकतेच पुण्यामध्ये अंकुशच्या उपस्थितीत ‘हॅशटॅग’ स्टोर लाँचचा सोहळा पार पडला.

दिनविशेष :

  • 1657 : न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
  • 1992 : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अ‍ॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.