चालू घडामोडी (20 एप्रिल 2017)
राजकपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर :
- राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.
- चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.
- सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली.
- जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.
- सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.
श्री श्री रविशंकर राष्ट्रीय सांस्कृतिक दूत :
- स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला.
- तसेच ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत, तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यात एक मे पासून स्वस्थ अभियान :
- राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांत येत्या 1 ते 27 मे 2017 दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
- तसेच त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसामध्ये बदल केला :
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.
- तसेच याचा भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.
- या व्हिसाचा गैरवापर रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च कुशल आणि सर्वाधिक वेतनधारी विदेशी व्यावसायिकांनाच हा व्हिसा मिळावा, असे ट्रम्प यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दिनविशेष :
- ई.स.पूर्व 788 हा आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्मदिन आहे.
- 20 एप्रिल मध्ये 1657 मध्ये न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
- खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे 20 एप्रिल 1992 मध्ये उभारली गेली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा