चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2015)
ताजमहाल ठरला “बेस्ट टुरिस्ट ऍट्रॅक्शन” :
- रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आग्रा येथील ताजमहाल केवळ देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्याही पसंतीस उतरला असून, तो जगातील “बेस्ट टुरिस्ट ऍट्रॅक्शन” ठरला आहे.
- “लोनली प्लॅनेट्स” या ऑनलाइन पोर्टलने केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली आहे.
- तसेच उत्तर कंबोडियामधील अंगकोर मंदिरे ही पर्यटकांना आकर्षित करणारी सर्वांत मोठी हॉटस्पॉट ठरली असून, या भागातील एक हजारांपेक्षाही अधिक मंदिरे, घुमट आणि अन्य वास्तू पाहण्यासाठी दरवर्षी वीस लाखांपेक्षाही अधिक पर्यटक या ठिकाणी येतात.
- यानंतर ऑस्ट्रेलियातील “ग्रेट बॅरिअर रिफ”चा क्रमांक लागतो.
- पेरूमधील माचूपिच्चू येथील “इंकासिटी” तिसऱ्या स्थानी असून, चीनमधील “ग्रेट वॉल ऑफ चायना” चौथ्या स्थानावर आहे.
- ब्रिटनमधील “ब्रिटिश म्युझियम” पर्यटकांच्या पसंतीच्या बाबतीत पंधराव्या स्थानावर आहे.
कनिका कपूर विजेती ठरली “मिस इंडिया” :
- कोचीमध्ये मंगळवारी झालेल्या “मिस एशिया 2015” स्पर्धेमध्ये भारताची “मिस इंडिया” कनिका कपूर विजेती ठरली आहे.
- या स्पर्धेमध्ये 12 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
- त्यामध्ये या स्पर्धेत चीन, भूतान, मलेशिया, इराण, नेपाळ, श्रीलंका, तिबेट याशिवाय अन्य काही देशातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
- या सर्वांमधून “मिस इंडिया” पुरस्कार विजेती कनिका कपूर विजेती ठरली आहे.
- पुरस्काराच्या स्वरुपात तिला 50 लाख रुपये मिळाले आहेत.
- “मिस फिलिपाईन्स” असलेली अल्फे मॅरी नाथानी उपविजेती ठरली आहे.
तृतीयपंथी व्यक्तीची व्हाईट हाऊसमध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक :
- समलैंगिक व्यक्तींना विवाहाचा अधिकार दिल्यानंतर अमेरिकेने आता लैंगिक अल्पसंख्यकांना समानतेची वागणूक देण्याच्या दिशेने आणकी एक पाऊल टाकत एका तृतीयपंथी व्यक्तीची व्हाईट हाऊसमध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक केली आहे.
- राफी फ्रीडमन-गुर्स्पान असे त्यांचे नाव आहे.
- नॅशनल सेंटर फॉर ट्रान्सजेंडर इक्वालिटी येथे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या राफी आता व्हाईट हाऊसच्या कार्यालयामध्ये भरती विभागामध्ये काम करतील.
दिनविशेष :
- 1775 : स्पेनने तुसॉन, अॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
- 1885 : इंडियन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना.
- 1900 : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
- 1920 : नॅशनल फुटबॉल लीगची डेट्रॉइट येथे स्थापना.
- 1926 : जपान मध्ये निप्पॉन होसो क्योकैची स्थापना.
- 1960 : सेनेगालने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- 1975 : व्हायकिंग 1चे प्रक्षेपण.
- 1991 : एस्टोनियाने स्वतःला सोवियेत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.
- 1944 : राजीव गांधी, भारतीय पंतप्रधान यांचा जन्म.
- 2013 : नरेंद्र दाभोलकर, बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांचा मृत्यू.