Current Affairs (चालू घडामोडी) of 20 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | जयंत नारळीकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर |
2. | राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुणे पहिला |
3. | जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे |
4. | राजीव गांधी योजनेस आता दीनदयाल उपाध्याय यांचे नाव |
जयंत नारळीकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर :
- ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.
- देशातील साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रातिष्ठीत समजला जाणार्या साहित्य अकादमी पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.
- ‘चार नगरातले माझे विश्व‘ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार करण्यात आला.
- तसेच माधवी सरदेसाय यांना कोकणी भाषेतील मंथन या लेखसंग्रहासाठी गौरवण्यात येणार आहे.
राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुणे पहिला :
- राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहरात सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे दाखल झाली आहेत.
- पुण्यानंतर नाशिक व बॉम्बे च क्रमांक लागतो.
जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे :
- जपानच्या रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे सर्वाधिक परफोर्मिंग नेते ठरले आहेत.
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे यादीत अव्वल स्थानावर आहेत.
- टोकियोतिल एका रिसर्च कंपनीने जगातील टॉप 30 परफोर्मिंग नेत्यांची यादी तयार केली आहे.
राजीव गांधी योजनेस आता दीनदयाल उपाध्याय यांचे नाव :
- राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेस (आरजीजीव्हीवाय) दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना असे नाव देण्यात आले.
- ‘निर्मल भारत अभियान‘ ऐवजी ‘स्वच्छं भारत मिशन‘ (ग्रामीण) असे नाव देण्यात आले आहे.