Current Affairs of 20 December 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (20 डिसेंबर 2016)
भारताचा दुसरा त्रिशतकवीर करुण नायर :
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात 19 डिसेंबर रोजी कर्नाटकाच्या करुण नायर याने नाबाद त्रिशतकी खेळी करण्याची कामगिरी केली.
- कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने दोन वेळा त्रिशतकी खेळी केल्या आहेत.
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस भारतीय विक्रमांचा ठरला.
- नायरच्या त्रिशतकी खेळीनंतर 7 बाद 759 धावसंख्येवर कोहलीने भारताचा डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
- करुण नायरने देखील भारताचा सर्वात तरुण त्रिशतकवीर होण्याचा मान मिळविला. सेहवागने (25 वर्षे 160 दिवस) 2004 मध्ये पहिले त्रिशतक ठोकले होते.
- कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारताची 9 बाद 726 ही सर्वोच्च धावसंख्या होती. श्रीलंकेविरुद्ध 2009 मध्ये मुंबईत भारताने ही कामगिरी केली होती.
Must Read (नक्की वाचा):
स्टेफनी डेल वॅले ठरली 2016 ची विश्वसुंदरी :
- पोर्टो रिको या कॅरेबियन समुद्रातील छोट्याशा व्दिपसमूहावरील 19 वर्षांची स्टेफनी डेल वॅले हिची 18 डिसेंबर रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘विश्वसुंदरी 2016’ म्हणून निवड झाली.
- डॉमिनिकन रिपब्लिकची यारित्झा मिग्युलिना रेयेस रमिरेज व इंडोनेशियाची नताशा मॅन्युएला या अनुक्रमे ‘फर्स्ट रनर-अप’ व ‘सेकंड रनर-अप’ ठरल्या.
- 1951 मध्ये ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या या सर्वात जुन्या जागतिक सौंदर्य स्पर्धेचे यंदाचे 66 वे वर्ष होते.
- ब्रिटनमधील एमजीएम नॅशनल हार्बरमध्ये झालेल्या अंतिम फेरीत परीक्षकांनी जगभरातील 100 हून अधिक स्पर्धकांमधून स्टेफनीची ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड केली.
भारतीय हॉकी महिला संघ ‘अ’ गटात अव्वल :
- भारताच्या पुरुष ज्युनिअर संघाने विश्वविजेतेपदाची भेट दिल्यानंतर भारताच्या 18 वर्षांखालील महिला संघानेही चमकदार खेळ करताना 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले.
- भारताच्या महिलांनी आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात मलेशियाचा 3-1 असा पराभव केला.
- सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध भूमिका घेत एकमेकांच्या आक्रमणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.
- मात्र, भारतीय महिलांनी आघाडी मिळवल्यानंतर आपली पकड अधिक घट्ट करताना मलेशियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
- दरम्यान, मलेशियाला सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, भारतीयांनी उत्कृष्ट बचाव करताना मलेशियाला रोखले.
बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरलेला यासिन भटकळला मृत्युदंड :
- हैदराबाद येथील दिलसुख नगरमध्ये 2013 साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ व त्याच्या चार साथीदारांना, पाच विशेष एनआयए न्यायालयाने 19 डिसेंबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली.
- तसेच या बॉम्बस्फोटांमध्ये कोणार्क थिएटर व दिलसुखनगर येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये 17 जण मरण पावले होते आणि 131 जण जखमी झाले होते.
- एनआयए न्यायालयाने या बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीनंतर 13 डिसेंबर रोजी यासिन भटकळसह पाच जणांना दोषी ठरवले होते.
दिनविशेष :
- रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना 20 डिसेंबर 1917 रोजी झाली.
- 20 डिसेंबर 1956 हा संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा