Current Affairs (चालू घडामोडी) of 20 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘पृथ्वी-2’ची यशस्वी चाचणी |
2. | मुकेश अंबानी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी |
3. | ‘हायब्रीड स्पोटर्स कार’ सचिन तेंडुलकर याने केली लॉच |
4. | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय |
5. | राजन वेळूकर यांना कुलगुरू पदावरून हटवले |
6. | ‘सोलर इम्पल्स’ मोहीम येत्या मार्चपासून |
7. | दिनविशेष |
‘पृथ्वी-2’ची यशस्वी चाचणी :
- अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘पृथ्वी-2’या या स्वदेशी बनावट क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली.
- लष्करी तळावर जमिनीवरून 350 किलोमीटर वेगाने मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचे मोबाईल लॉचरच्या साहयाने यशस्वी उड्डाण करण्यात आले.
- या क्षेपणास्त्रात 500 ते 1000 किलोग्राम इतका शस्त्रसाठा वाहून नेण्याची क्षमता आहे.
- लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या क्षेपणास्त्रात अद्यावत मार्गदर्शन प्रणालीची सुविधा आहे.
- यापूर्वी 14 नोव्हेंबर 2014 रोजी ‘पृथ्वी-2’ची चाचणी करण्यात आली.
मुकेश अंबानी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी :
- इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेकनोलॉजी मुंबई संस्थेकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
- अंबानी हे हा सन्मान प्राप्त करणारे चौथे व्यक्ती आहेत.
- या संस्थेकडून त्यांनी केमिकल इजीनीयरिंगची पदवी मिळवलेली आहे.
‘हायब्रीड स्पोटर्स कार’ सचिन तेंडुलकर याने केली लॉच :
- सचिन तेंडुलकर याने आज मुंबईत ‘बीएमडब्ल्यु ई8 हायब्रीड स्पोटर्स कार’ सादर केली.
- 2 कोटी 29 लाख या कारची किंमत आहे.
- कारच वजन फक्त 1485 किलो इतकेच आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय :
- पतीचे असलेले अनैतिक संबंध हे मानसिक छळ अथवा आत्महत्येचे कारण होवू शकत नाही.
- पतीचे अनैतिक संबंध संबंध म्हणजे छळ नव्हे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.
- एका याचिकेदारम्यान हा निर्णय घेण्यात आला.
राजन वेळूकर यांना कुलगुरू पदावरून हटवले :
- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना आज कुलगुरू पदावरून हटवण्याचे आदेश राज्यपाल यांनी दिले.
‘सोलर इम्पल्स’ मोहीम येत्या मार्चपासून :
- इंधनाचा थोडाही वापर न करता केवळ सौर उर्जेवर चालणार्या विमानांतून जगप्रदक्षिणेच्या ‘सोलर इम्पल्स’ मोहिमेला येत्या मार्चपासून सुरवात होत आहे.
- भारतात या विमानात प्रवेश केल्यावर या मोहिमेचे यजमानपद भूषविण्याचा मान आदित्य बिर्ला समूहाला बहाल करण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 1999 – राम गणेश गडकरी यांच्या एकाच प्याला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
- 1962 – मार्क्युरी अवकाशयानातून जॉन ग्लेन अवकाशवीराने पहिली पृथ्वी प्रदक्षिणा केली.
- 1950 – देशभक्त शरदचंद्र बोस यांचे निधन.