चालू घडामोडी (20 फेब्रुवारी 2017)
साई पॉइंट होंडा ठरला ऑल इंडिया विनर :
- ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेल्या ऑल इंडिया वितरकांच्या व्यावसायिक मेळाव्यात साई पॉर्इंट होंडाला लागोपाठ सातव्यांदा ऑल इंडिया विनरचा बहुमान मिळाला आहे.
- साई पॉर्इंट होंडाने 2016 मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वाधिक 2607 दुचाकी वाहने विकल्यामुळे साई पॉर्इंट होंडाला विशेष पुरस्कार देण्यात आला.
- साई पॉर्इंट होंडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिलीप पाटील यांनी हा पुरस्कार होंडाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अयामा सान यांच्या हस्ते स्वीकारला.
- साई पॉर्इंट होंडामध्ये ग्राहकांना विक्री, सेवा, सुटेभाग यात दर्जेदार सेवा पुरविण्यात येत असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यश मिळाले असून, त्यामुळेच हा बहुमोलाचा पुरस्कार मिळाला आहे.
- साई पॉर्इंट होंडाची नागपूर, मुंबई, ठाणे, यवतमाळ आणि विदर्भाच्या इतर ठिकाणी दुचाकीची डीलरशिप आहे. या ग्रुपतर्फे साई पॉर्इंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे दुचाकीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
- पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
- आक्रमक फलंदाजी आणि उंच फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने यापूर्वीच 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून आणि 2015 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
- आता त्याने आपली 21 वर्षांची क्रिकेट कारकिर्दी थांबविण्याचा निर्णय घेतला. आफ्रिदीने या महिन्याच्या सुरवातीलाच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते.
- आफ्रिदीने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 37 चेंडूत शतक झळकाविण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम 17 वर्षे अबाधित होता.
- आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांत 8064 धावा आणि 395 बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याची ओळख अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून होती.
मंगळ ग्रहावर मानवी वसाहत शक्य :
- संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) मंगळ ग्रहावर जीवनासाठी पोषक वातावरण निर्माण करून तेथे मानवी वस्ती स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू केले आहे.
- शेख मोहंमद बिन राशीद अल मख्तुम यांनी दुबईत या आठवड्याच्या प्रारंभी “मार्स 2117” प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प 100 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- दुबईतील 5 व्या जागतिक सरकार शिखर परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. यावेळी शेख म्हणाले की, “2117 मार्स” ही दीर्घकालीन योजना आहे.
- तसेच यात सुरुवातीला आमची विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या विकासासाठी मदत केली जाईल. युवा पिढी वैज्ञानिक शोधाच्या प्रत्येक क्षेत्रात पारंगत व्हावी यासाठी ही मदत असेल.
पाकमध्ये हिंदू विवाह कायद्यास मंजुरी :
- पाकिस्तानमधील हिंदू महिलांना दिलासा देणारा हिंदू विवाह कायद्याला 18 फेब्रुवारी रोजी वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली आहे. संसदीय समितीनेही मंजुरी दिली आहे.
- सरकारच्या अनुत्साहामुळे अनेक दशकांपासून लांबणीवर पडलेले हिंदू विवाह विधेयक मंजूर झाले आहे.
- संसदीय समितीने मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबाजवणीसाठी वरिष्ठ सभागृहाची मंजुरी आवश्यक होती. आता ती मंजुरी मिळाल्याने हिंदू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहाने चार महिन्यांपूर्वीच या कायद्याच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब केले होते. या कायद्यामुळे हिंदूंच्या विवाहाची अधिकृत नोंदणी होणार असल्याने हिंदू महिलांना वाद निर्माण झाल्यास न्यायालयात दावा दाखल करता येणे शक्य आहे.
- पाकिस्तानमधील संसदीय समितीने एकमताने मंजूर केले होते. या कायद्यामुळे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू नागरिकांसाठी लवकरच नवा विवाह कायदा अस्तित्वात येईल.
- कायदा आणि न्याय विषयावरील स्थायी समितीने हिंदू विवाह विधेयक, 2015 चा मसुदा मंजूर केला होता.
दिनविशेष :
- दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फ़ुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1827 मध्ये झाला.
- 20 फेब्रुवारी 1987 मध्ये मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा