Current Affairs (चालू घडामोडी) of 20 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | जैशाने मोडला 19 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम |
2. | सहा राज्यांना मिळणार नवीन राज्यपाल |
3. | अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन |
जैशाने मोडला 19 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम :
- 2 तास 37 मिनिटे व 29 सेकंदांची वेळ नोंदवून वॅली सत्यभामा यांच्या 19 वर्षापूर्वीच्या 2 तास 37 मिनिटे आणि 10 सेकंदांच्या विक्रमाला मागे टाकले.
- या विक्रमाबरोबरच जैशाने भारतील महिला गटाचे जेतेपद पटकावले आणि बीजिंगमध्ये होणार्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिकिटही मिळवले.
- विश्व अजिंक्यपद स्पर्धेकरिता अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडून (एएफआय) देण्यात आलेल्या 2 तास 44 मिनिटांच्या वेळेपूर्वीच जैशाने मॅरेथॉन पूर्ण केली.
- त्यानंतर गतविजेत्या ललिता बाबरने 2 तास 38 मिनिटे व 21 सेकंदाची नोंद केली आहे.
- या कामगिरीच्या बळावर दोघींनीही विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
सहा राज्यांना मिळणार नवीन राज्यपाल :
- येत्या 15 ते 20 दिवसांत किमान सहा राज्यांत नव्या राज्यपालांची नेमणूक होण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संगितले.
- बिहार, आसाम, माणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.
अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन :
- बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पहिली अभिनेत्री बेबी शकुंतला उर्फ उमादेवी खंडेराव नाडगौडा यांचे रविवारी निधन झाले.
- त्या 83 वर्षाच्या होत्या.