Current Affairs of 20 July 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (20 जुलै 2017)
ऐतिहासिक संसदीय पुरस्कार सोहळा :
- दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमतकडून पहिला संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
- भारतातील प्रसारमाध्यमांद्वारे संसद सदस्यांना राजधानीत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
- लोकमत वृत्तपत्र समूह यापुढे दरवर्षी संसदीय पुरस्कार देणार आहे.
- भाजपाचे ज्येष्ठ नेते व लोकसभा सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि संयुक्त जनता दलाचे नेते व राज्यसभा सदस्य शरद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून एन.के. प्रेमाचंद्रन (लोकसभा सदस्य) व सीताराम येचुरी (राज्यसभा सदस्य) यांचा सन्मान करण्यात आला.
- सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू हा पुरस्कार सुश्मिता देव (लोकसभा) व जया बच्चन (राज्यसभा) यांना देण्यात आला, तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने मीनाक्षी लेखी (लोकसभा) व रजनी पाटील (राज्यसभा) यांचा गौरव केला.
Must Read (नक्की वाचा):
एचपीसीएल मधील सरकारी भागीदारी ओएनजीसीला मिळणार :
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) मधील सरकारची भागीदारी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी)ला विकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- केंद्र सरकारने जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधली सरकारची 51.11 टक्क्यांची भागीदारी आता ओएनजीसी विकत घेणार आहे. त्यानंतर अतिरिक्त भागीदारीसाठी कोणतीही अट ठेवण्यात येणार नाही.
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारी भागीदारी ओएनजीसी विकत घेण्याचा व्यवहार एका वर्षात पूर्ण होणार आहे.
- ओएनजीसीमध्ये एचपीसीएलचे विलीनीकरण झाले तरी एचपीसीएल या ब्रँडचे नाव कायम राहणार आहे.
- तसेच या व्यवहारानंतर एचपीसीएल ही भारतातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीची उपकंपनी म्हणून समोर येणार आहे.
नागालँडच्या नवनियुक्त मुख्यमंत्रीला पक्षातून काढले :
- एकापाठोपाठच्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे नागालँडमधील राजकीय पेचाला नवीन वळण लागले.
- एकीकडे नागा पीपल्स फ्रंटचे नेते आणि सत्तारूढ डेमोक्रेटिक अलायन्स ऑफ नागालँडचे अध्यक्ष टी.आर. झेलियांग यांचीच पुन्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागत त्यांचा शपथविधीही पार पडला.
- तसेच त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा वेगवान राजकीय घडामोडी घडल्या असून, पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून झेलियांग यांची नागालँड पीपल्स फंरट या पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.
- एकीकडे राजकीय पेच संपुष्टात आल्याचे दिसत असताना या नव्या घडामोडीमुळे नागालँडमधील राजकीय पेच अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे.
नेपाळमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे ‘डिजिटल व्हिलेज’ :
- स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ‘डिजिटल व्हिलेज’ उपक्रमांतर्गत नेपाळमधील काठमांडूपासून पूर्वेला 25 किमी अंतरावर असलेल्या जारीसिंगपौवा या गावाचा कायापालट केला आहे.
- एसबीआयच्या नेपाळमधील सेवेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या गावात डिजिटल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
- या गावात पैसे काढणे व भरण्यासाठी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे. या गावातील नागरिकांना 430 डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले आहे.
- तसेच हे गाव डोंगराळ भागात असल्याने काठमांडूपासून नजीक असूनही त्याचा फारसा अन्य भागाशी संपर्क नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येत होत्या. डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
दिनविशेष :
- 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन आहे.
- सरकारी सेंसरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना सन 1975 मध्ये देशातून हाकलले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा