Current Affairs of 20 June 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी 20 जून 2015 :

आकार पटेल यांची अॅमेनेस्टी इंटरनॅशनल संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती :

  • मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या अॅमेनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या भारतातील प्रमुखपदी लेखक आणि पत्रकार आकार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • डेक्कन क्रोनिकल या दैनिकात त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केले होते.
  • तसेच मिड-डेचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
  • एमनेस्टीचे भारतात तीन मुख्य कार्यालये आहेत.
  • अॅमेनेस्टी इंटरनॅशल :
  • मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी ही संस्था जगभर कार्य करते.
  • 1961 मध्ये लंडनमधील बॅरीस्टर पिटर बेनेसन यांनी स्थापन केली होती.
  • स्वतंत्र्यासाठी पोर्तुगालमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं या घटनेनंतर ही संस्था स्थापन करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 19 जून 2015

अमेरिकेतील दहा डॉलरच्या नोटेवरील जागा आता एक महिला घेणार :

  • अमेरिकेतील दहा डॉलरच्या नोटेवरील अलेक्झांडर हॅमिल्टन यांची जागा आता एक महिला घेणार आहे.
  • अमेरिकेचे अर्थमंत्री जेकब ल्यू यांनी याबाबतची घोषणा केली असून, 2020 मध्ये ही नोट अमेरिकेच्या बाजारपेठेत येणार आहे.
  • या निर्णयामुळे गेल्या शंभर वर्षांत पहिल्यांदाच डॉलरच्या नोटेवर महिला दिसणार आहे.
  • तसेच यासाठी thenew10.treasury.gov या वेबसाइटवर या संदर्भात मते नोंदविण्याचे आवाहन ल्यू यांनी केले.

दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी ‘मनरेगा’च्या कार्यकालावधीमध्ये वाढ :

  • दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मनरेगा’च्या कार्यअवधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता ‘मनरेगा’चे काम शंभर ऐवजी दीडशे दिवस चालेल.
  • दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अधिक रोजगार हवा असेल, तर त्यांना ‘मनरेगा’वर दीडशे दिवस काम उपलब्ध होऊ शकेल. दुष्काळाची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांमध्ये या उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.
  • देशातील बहुसंख्य भागात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ‘मनरेगा’च्या कामाचे दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • सध्या देशातील 652 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. याचा सर्वाधिक लाभ शेतमजूर आणि महिला कामगारांना होतो आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक पाचवे कुटुंब ‘मनरेगा’शी जोडलेले आहे.
  • ‘मनरेगा’च्या वाढलेल्या अवधीचा सर्वाधिक फायदा झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील लोकांना होणार आहे.

भारत आणि स्पेन दरम्यान राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या

  • भारत आणि स्पेन दरम्यान, राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 17 जून 2015 रोजी मंजूरी देण्यात आली.
  • यामुळे भारत आणि स्पेनच्या राजनैतिक पारपत्रधारकाला एकमेकांच्या देशात प्रवेश करताना, प्रवास करताना तसेच 90 दिवसांचा मुक्काम करताना आवश्यक पूर्ततेसह व्हिसाशिवाय प्रवास करता येईल.
  • भारताने व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याचा असा करार आतापर्यंत 40 देशांबरोबर केला आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या संचालकपदी अर्चना रामसुंदरम

  • वरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची केंद्रीय अन्वेषण विभागातून (सीबीआय) उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचे (एनसीआरबी) संचालक करण्यात आले आहे.

  • त्या 1980 च्या तामिळनाडू तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत.
  • गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची ‘सीबीआय’च्या अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवर वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
  • त्यांची नियुक्ती बेकायदा आणि नियमाविरुद्ध असल्याचे दिसून येत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदावर काम करण्यास मनाई केली होती.

श्रीनिवासन सलग 14व्यांदा टीएनसीएच्या अध्यक्षपदी

  • बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी 12 जून 2015 रोजी सलग 14व्यांदा निर्वाचित झाले. श्रीनिवासन यांना पुढील एका वर्षासाठी अध्यक्ष निवडण्यात आले आहे.

  • श्रीनिवासन हे 2002-03 पासून टीएनसीएचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांचा पराभव करीत ते पदावर आले होते.
  • आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली होती. मार्चमध्ये झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून त्यांना प्रतिबंधित करण्यात आले होते.
  • श्रीनिवासन 2016 पर्यंत मात्र आयसीसी चेअरमनपदावर कायम राहणार आहेत.

‘दि राइट ब्रदर्स’ पुस्तक प्रकाशित :

  • पुलित्झर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डेव्हिड मॅककुलॉघ यांनी ‘दि राइट ब्रदर्स’ नावाचे पुस्तक लिहिले असून  त्यामध्ये विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथा नव्या रूपात मांडण्यात आली आहे.

  • प्रत्यक्षात राइट बंधूंना विमानाची कल्पना कधी सुचली. कसलेही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसताना त्यांनी कशा पद्धतीने विमानाची चाचणी घेतली आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नाट्यमयता या नव्या पुस्तकातून लोकांसमोर येणार आहे.
  • ‘सिमन अँड शुश्टर’ या प्रकाशन संस्थेने ही राइट बंधूंची संशोधन गाथा प्रसिद्ध केली आहे. या ग्रंथाच्या लेखनासाठी मॅककुलाघ यांनी राइट बंधूंच्या खासगी डायऱ्या, वह्या, स्क्रॅपबुक आणि त्यांनी परस्परांना लिहिलेली शेकडो पत्रे चाळली. त्यातून एक नवे भावविश्व त्यांच्या हाती लागले. आता हीच संशोधनगाथा पुस्तक रूपाने वाचकांच्या हाती येईल.

     

एनएल बेनो जेफिन – देशातील पहिली अंध आयएफएस अधिकारी

  • तामिळनाडूची एनएल बेनो जेफिन देशाची पहिली दृष्टिहीन आयएफएस अधिकारी बनली आहे. बेनोने देशातील सगळ्यात कठिण यूपीएससी परिक्षेत 353 रँक मिळविला आहे.
  • सध्या बेनो स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी अधिकारीच्या पदावर काम करत आहे. गेल्या काही वर्ष बेनो या परीक्षेची तयारी करत होती.

    2013 च्या परिक्षेच्या निकालाचे परिणाम आल्यावर बेनोने नवीन इतिहास रचला आहे.

  • बेनो तामिळनाडू भारतियार यूनिवर्सिटीतून इंग्रजीमध्ये पीएचडी करत आहे. पीएचडी चालू असताना बेनोने सिविल सर्विसची तयारी सुद्धा केली.

दिनविशेष :

  • 1869 – किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म.
  • 1921 – पुणे येथे टिळक विद्यापीठाची स्थापना.
  • 1960 – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना.
  • 1977 – पुण्यात देशातील पहिल्या कीर्तन महाविद्यालयाचे उद्घाटन.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 21 जून 2015

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago