Current Affairs (चालू घडामोडी)

Current Affairs of 20 June 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 जून 2018)

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट :

  • जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करायला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार होते. पण भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले.
  • राज्यातील इतर कोणत्याही महत्वाच्या पक्षाने सरकार स्थापण्यासाठी पीडीपीला पाठिंबा न दिल्याने मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात सरकार स्थापण होण्याची स्थिती नसल्याने येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी अशा शिफारशीचा अहवाल जम्मू-काश्मीरच्या राज्यापालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता.
  • मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. मात्र, कोणीही पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा न दर्शवल्याने अखेर राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवून दिला. यामध्ये त्यांनी राज्यघटनेच्या कलम 92 अन्वये जम्मू आणि काश्मीर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जून 2018)

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर :

  • मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.
  • 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. या परिषदेत अमेरिकेला नुकतेच दीड वर्ष पूर्ण झाले होते.
  • अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत असे वृत्त काही दिवसांपासून आले होते. तेव्हापासूनच अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. याबाबत केवळ अधिकृत घोषणा झाली नव्हती.

अनुकृती वास ठरली मिस इंडिया 2018 :

  • भारतातील सौंदर्याच्या जगतातील ‘फेमिना मिस इंडिया 2018’ या सर्वोच्च स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने बाजी मारली आहे. तर हरयाणाची मीनाक्षी चौधरी ही दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानी राहिली. गेल्या वर्षीची मिस इंडिया मानुषी छिल्लरने अनुकृतीच्या डोक्यावर ‘मिस इंडिया‘चा मुकुट चढवला.
  • मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोम येथे 19 जून रोजी रात्री फेमिना ‘मिस इंडिया 2018‘ ही स्पर्धा पार पडली.
  • सौंदर्य, ग्लॅमर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी अशा वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत माधुरी दीक्षितच्या नृत्याने सर्वांची दाद मिळवली. करण जोहर आणि आयुषमान खुराणा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

रेल्वेचा दर रविवारी ‘राष्ट्रीय ब्लॉक’ असणार :

  • रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आता भारतीय रेल्वे मुंबईत घेतल्या जाणाऱ्या मेगाब्लॉकचे देशव्यापी अनुकरण करणार आहे.
  • रेल्वेच्या देशभरातील सर्वच विभागांमध्ये पुढचे किमान वर्षभर दर रविवारी सहा ते सात तासांचे मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली.
  • मेगाब्लॉकदरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे भोजनाच्या वेळेत हाल होऊ नयेत, म्हणून आयआरसीटीसीतर्फे मोफत भोजनही देण्याची घोषणा गोयल यांनी केली. ही सुविधा तूर्तास आरक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच दिली जाणार आहे.
  • लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी यापुढे रविवारचा दिवस त्रासदायक ठरणार आहे. मात्र, रविवारच्या मेगाब्लॉकची प्रवाशांना त्याची एसएमएस; तसेच वृत्तपत्रांमधील जाहिरातींद्वारे पूर्वसूचना दिली जाईल. प्रत्येक गाडीच्या वाटचालीची नोंद करण्यासाठी रेल्वेच्या प्रणालीमध्ये जीपीएस लॉगर्सचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे.
  • तसेच येत्या 15 ऑगस्टपासून रेल्वेचे वेळापत्रक बदलण्यात येईल. रविवारचे मेगाब्लॉक सहा ते सात चालतील. प्रवाशांनी आपल्या मोबाइल फोनवर गाडीचा क्रमांक टाइप केल्यास त्यांना गाडी कुठवर पोहोचली याची माहिती मिळेल.

मुंबई महापालिकेची 7 संगीत अकादमी केंद्रे सुरू :

  • महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांची जोपासना होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या सर्व सात परिमंडळांमध्ये नुकतीच संगीत अकादमी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
  • प्रत्येक केंद्रात 25 विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पद्धतीनुसार गायन व वादनाचे आणि कथ्थक, भरतनाट्यम व मोहिनीअट्टम या नृत्यशैलींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भायखळा, परळ, सांताक्रूझ, मालाड, चेंबूर, मुलुंड व कांदिवली येथे ही संगीत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
  • अभिजात भारतीय संगीत परंपरेचा प्रसार व्हावा या हेतूने ही संगीत अकादमी केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्यांमध्ये पारंपरिक वाद्यांसह अत्याधुनिक पद्धतीचे संगीत वाद्य संचदेखील देण्यात आले आहेत.
  • तसेच यामध्ये प्रामुख्याने हार्मोनियम, तबला-डग्गा, इतर तालवाद्ये तसेच खंजिरी, इलेक्ट्रॉनिक तानपुरा, इलेक्ट्रॉनिक तबला यांचा समावेश आहे. या केंद्रांमध्ये 87 संगीत शिक्षकांद्वारे गायन, वादन व नृत्य इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • सुरुवातीला गाणी, कविता या ‘सुगम संगीत‘ प्रकारातील प्रशिक्षण दिले जाईल व त्यानंतर विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतानुरूप धडे दिले जाणार आहेत.

दिनविशेष :

  • 20 जून हा दिवस जागतिक शरणार्थी दिन म्हणून पाळला जातो.
  • इंग्लंडच्या राणीपदी 20 जून 1837 मध्ये व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
  • देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस.टी.) हे 20 जून 1887 रोजी सुरू झाले.
  • 20 जून 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 20 जून 190 मध्ये झाली.
  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ 20 जून 1997 रोजी सुरू झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जून 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

3 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

3 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

3 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

3 years ago