Current Affairs of 20 November 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 नोव्हेंबर 2017)

सरकारी वेबसाईटवरून आधारची माहिती :

  • 210 सरकारी वेबसाईटवरून आधार कार्ड्सचा डेटा सार्वजनिक झाल्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्य केले आहे.
  • विशेष बाब म्हणजे या 210 वेबसाईट केंद्र आणि राज्य सरकारच्या किंवा त्यांच्याशीच संबंधित आहेत.
  • नाव, पत्ता, शहर यांसारख्या गोष्टींची माहिती लीक झाली आहे. माहितीच्या अधिकारात मागवण्यात आलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
  • तसेच या घटनेमुळे आधार कार्ड मधील माहिती किती सुरक्षित राहू शकते? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या बँक खाते, मोबाईल नंबर किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड ही महत्त्वाची ओळख ठरली आहे.
  • प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे सक्तीचे झाले आहे. अशात ही घटना घडल्याने आधार कार्डवर असलेल्या माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रॉबर्ट मुगाबेंना यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले :

  • झिम्बाब्वेतील सत्ताधारी पक्ष झेडएएनयू-पीएलने रॉबर्ट मुगाबे यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवले आहे.
  • अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झेडएएनयू-पीएलने मुगाबे यांची पत्नीचे प्रतिस्पर्धी एमरसन म्नांगाग्वा यांना पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुगाबे यांनी 52 वर्षीय पत्नी ग्रेसचे प्रतिस्पर्धी राहिलेले उपराष्ट्राध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा यांना बरखास्त केले होते. त्यामुळे लष्कराने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेऊन मुगाबेंना नजरकैदेत ठेवले होते.
  • मुगाबे यांच्या पत्नीने देशाची सूत्रे आपल्या हाती यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांना यापूर्वीच पक्षाने निलंबित केले आहे.
  • तसेच लष्कराने जेव्हा सत्तेवर नियंत्रण मिळवले तेव्हाच मुगाबे यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे दिसून आले होते.
  • जगात सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे 93 वर्षीय राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा सुरू झाली होती. नेमके त्याचवेळी लष्कराने ही कारवाई केली.

पृथ्वीच्या बदलांच्या चित्रणात नासाला यश :

  • उत्तर अर्धगोलार्धात परिसंस्था ही वसंत ऋतूत फुलतात व झाडांना नवी पालवी फुटते. उपग्रहांनी केलेल्या निरीक्षणात अनेक ठिकाणी हिरवाईही दिसून आली आहे.
  • महासागरांमध्ये काही सूक्ष्म वनस्पती सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेल्या पाण्याखाली फुलतात व त्यातून अब्जावधी कार्बन शोषणारे सूक्ष्म जीव तयार होतात.
  • उपग्रहांच्या प्रकाश संवेदक यंत्रांनी या वनस्पतींच्या रंगातील बदलही टिपले आहेत. 1970 पासून अवकाशातील उपग्रह हे पृथ्वीवरील जमीन व महासागर यांचे निरीक्षण करीत आहेत.
  • तसेच 1997 मध्ये सी व्ह्य़ूईंग वाइड फिल्ड ऑफ व्ह्य़ू हा उपग्रह सोडण्यात आला. त्यानंतर जमीन व महासागरातील जीवनाचे सतत निरीक्षण करण्यात आले.
  • वीस वर्षांत उपग्रहांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अ‍ॅनिमेशन फिल्म तयार करण्यात आली असून त्यात पृथ्वीवरील जीवनात वीस वर्षांत झालेला बदल दाखवण्यात आला आहे.
  • नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे जीन कार्ल फेल्डमन यांनी सांगितले की, आपल्या सजीवसृष्टीने रसरसलेल्या ग्रहावर आधारित ही चित्रफीत अविश्वसनीय आहे. आपली पृथ्वी दर दिवशी नवा श्वास भरत आहे व तेथील ऋतू महासागरी प्रवाह व तापमान हे घटक सतत बदलत आहेत. सूर्यप्रकाश व वाऱ्यांच्या प्रवाहांना पृथ्वीचा प्रतिसाद सतत बदलत आहे असे फेल्डमन यांनी सांगितले.

आता आदर्श गावांसाठी 5 लाखांचा पुरस्कार :

  • आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजने अंतर्गत सन 2009-10 पासून सहभाग घेत असलेल्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावांना प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था, ग्रामकर्ता व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने महाराष्ट्र आदर्श गाव भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
  • उत्कृष्ट आदर्श गावासाठी पाच लाख रुपये रोख रक्कम स्मृती चिन्ह व सन्मान पत्र दिले जाणार आहे, अशी माहिती आदर्शगाव संकल्प प्रकल्प योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली.
  • आदर्श गाव भूषण पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटीची पूर्तता करीत असलेल्या संबधीतानी कार्यकारी समितीने विवित केलेल्या नमुन्यातील प्रपत्रात माहिती भरून एकत्रित अर्जाचा प्रस्ताव गावाच्या ग्रामसभेत सादर करावा. ग्रामसभेची मान्यता मिळाल्यास सदर प्रस्ताव ग्रामपंचायती मार्फत जिल्हा स्तरीय समितीकडे मान्यता व शिफारसीसाठी पाठवावा.
  • जिल्हास्तरीय समिती शहानिशा व गुणांकन करून योग्य त्या शिफारशीसह पात्र प्रस्ताव राज्य स्तरीय कार्यकारी समितीकडे पाठवील. त्यानंतर तांत्रिक समितीकडून प्रस्ताव पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या गावांना राज्यस्तरीय कार्यकारी समिती गावांना प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा करेल. त्यानंतर पुरस्कार निवड करेल. असे पवार यांनी सांगितले.

‘पद्मावती’ चित्रपटाचे प्रदर्शन अखेर लांबणीवर :

  • दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला असून, प्रदर्शानाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या व्हायकॉम 18 मोशन पिक्‍चर्सकडून सांगण्यात आले.
  • आम्ही स्वखुशीने या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकत आहोत. आम्ही कायद्याचे पालन करतो. ‘सीबीएफसी’ बद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याकडून आमच्या चित्रपटाला लवकरच हिरवा कंदील मिळेल, असा विश्‍वास व्हायकॉम 18 मोशन पिक्‍चर्सने प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.
  • तसेच भन्साळी यांच्या या चित्रपटाला राजपूत संघटनांनी विरोध केला आहे. करनी सेनेने भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना धमकी दिली आहे. सेन्सॉर बोर्डानेही काही तांत्रिक बदल करण्यासाठी हा चित्रपट निमार्त्यांकडे परत पाठवला आहे.

दिनविशेष :

  • 20 नोव्हेंबर हा दिवस भारतात ‘लोकशिक्षण दिन’ म्हणून पाळला जातो.
  • भारतात 20 नोव्हेंबर हा दिवस ‘बालक हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago