Current Affairs of 20 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 ऑक्टोंबर 2015)

पाकिस्तानी पंच अलीम दार यांना हटवित असल्याची घोषणा :

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून पाकिस्तानी पंच अलीम दार यांना हटवित असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली.
  • एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांसाठी दार यांनी पंच म्हणून काम पाहिले असून, चेन्नईत 22 ऑक्‍टोबरला आणि मुंबईत 25 ऑक्‍टोबरला होणाऱ्या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या सामन्यातही ते पंच असणार होते.
  • दार यांच्याबाबत आम्हाला कोणतीही अडचण नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते.
  • मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अलीम दार यांना उर्वरित सामन्यांसाठी वगळणेच योग्य असून, पर्यायी पंचाची लवकरच घोषणा केली जाईल, असे आयसीसीच्या एका प्रवक्‍त्याने सांगितले.

नथुराम गोडसे याचा मृत्यूदिन बलिदान दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय :

  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा मृत्यूदिन बलिदान दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे.

  • हिंदू महासभेने गेल्यावर्षी नथुराम गोडसे याचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला होता.
  • आता त्याची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • नथुराम गोडसे याची 15 नोव्हेंबरला मृत्यूदिन आहे.
  • याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या केल्याप्रकरणी गोडसेला फाशी देण्यात आली होती.
  • अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी सांगितले, की यावर्षी आम्ही देशभरातील आमच्या 120 कार्यालयांना बलिदान दिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
  • जिल्हा स्तरावरही हा कार्यक्रम होणार आहे.
  • या कार्यक्रमानिमित्त हिंदू महासभा गोपाळ गोडसे यांनी लिहिलेले ‘गांधीवध क्यो’ हे पुस्तक वाटण्यात येणार आहे.

उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी साहित्य अकादमी पुरस्कार रकमेसह परत :

  • देशातील असहिष्णु वातावरण व विविध घडामोडींना विरोध करत उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी साहित्य अकादमी पुरस्कार रकमेसह परत केला आहे.
  • रविवारी रात्री एका वृत्तवाहिनीवर सरकार विरूद्ध साहित्यकार असा कार्यक्रम सुरू असतानाच मुनव्वर राणा यांनी पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली.
  • यावेळी त्यांनी पुरस्कारासह पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कमही सरकारला परत करत असल्याचे सांगितले. मुनव्वर राणा हे उर्दू साहित्यक्षेत्रात नामवंत आहेत.
  • त्यांचे अनेक काव्यसंग्रह आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नासीर खान जंजुआ यांची नियुक्ती :

  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर (एनएसए) लेफ्टनंट जनरल नासीर खान जंजुआ (निवृत्त) यांची नियुक्ती करण्याचे पाकिस्तान सरकारने ठरविले आहे.
  • भारताबरोबरील सध्याचे तणावाचे संबंध लक्षात घेता देशाच्या सुरक्षाविषयक बाबींवर लष्कराची असलेली पकड आणखी मजबूत करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
  • सरताज अझीझ हे पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून त्यांच्याकडे पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहारासंबंधीचे सल्लगार म्हणूनही काम आहे.

मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर :

  • ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • अभिनेते अरुण नलावडे यांना के. नारायण काळे पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • या पुरस्कारांचे वितरण मुंबई मराठी साहित्य संघाच्या 80 व्या वर्धापनदिनी 28 ऑक्टोबर रोजी डॉ. अ. ना भालेराव नाट्यगृहात करण्यात येईल.

वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत :

  • भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
  • भारतात जाऊन अधिकृतरीत्या घोषणा करणार असल्याचे खुद्द सेहवागनेच दुबई येथे झालेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या लाँचिंग दरम्यान स्पष्ट केले.
  • वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवृत्तीनंतर सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या सेहवागने अखेरचा कसोटी सामना मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादेत खेळला होता.

मॅगी नूडल्सवरची बंदी गुजरात एफडीसीएने उठवली :

  • नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगी नूडल्सवरची बंदी गुजरात अन्न व औषध नियंत्रण प्राधिकरणाने (एफडीसीए) उठवली आहे.

  • मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्येच मॅगीवरील देशव्यापी बंदी उठवण्याचा निकाल दिला होता.
  • गुजरातचे अन्न व औषध प्राधिकरण आयुक्त एच. जी कोशिया यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मॅगीवरील बंदी उठवण्यात येत आहे.
  • गुजरातने जुलैत मॅगीवर बंदी घातली होती, कारण त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट व शिशाचे प्रमाण जास्त आढळले होते.
  • नंतर ही बंदी सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली होती.
  • मॅगीच्या तीन प्रयोगशाळांमध्ये नवीन उत्पादन केल्यानंतरच्या चाचण्यात काहीही दोष आढळला नाही त्यामुळे आता मॅगीची बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • अजूनही गुजरातमध्ये मॅगी उपलब्ध नाही, पण लवकरच या नूडल्स उपलब्ध होतील.
  • मॅगीचा सर्व साठा त्यावेळी बाजारातून मागे घ्यायला लावला होता.
  • देशातील विविध भागातून घेतलेले मॅगीचे नमुने पूर्वी सदोष आढळले होते.

व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन :

  • वैज्ञानिकांनी अनेक वर्षे प्रतीक्षा असलेला ग्लूबॉल नावाच्या नवीन कणाचे अस्तित्व शोधून काढल्याचा दावा केला आहे.
  • अणुकणांना एकत्र ठेवणाऱ्या चिकट कणांना ग्लुऑन असे म्हटले जाते.
  • ग्लुबॉल्स हे अस्थिर असतात व त्यांचे थेट अस्तित्व जाणवत नाही, त्यांचे क्षरण होत असताना विश्लेषण केले तरच त्यांचे अस्तित्व जाणवते.
  • ग्लुबॉल्सच्या क्षरणाची प्रक्रिया मात्र अजून पूर्णपणे समजलेली नाही.
  • प्रा. अँटन रेभान व फ्रेडरिक ब्रुनर या व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी यात सैद्धांतिक दृष्टिकोन वापरला असून त्यातून त्यांनी ग्लुबॉलचे क्षरण कसे होते हे शोधून काढले आहे.
  • कण त्वरणकाने केलेल्या निरीक्षणातील माहितीशी हे संशोधन जुळणारे आहे.
  • अनेक प्रयोगात एफ 0 (1710) हे सस्पंदन जाणवले असून ते प्रत्यक्षात ग्लुबॉल असल्याचे दिसून आले आहे.
  • आणखी प्रयोगात्मक निष्कर्ष येत्या काही महिन्यात मिळणे अपेक्षित आहे.
  • प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामध्ये आणखी सूक्ष्म कण असतात त्यांना क्वार्क म्हणतात व क्वार्क हे शक्तिमान आण्विक बलाने एकत्र बांधलेले असतात.

दिनविशेष :

  • राष्ट्रीय एकता दिन
  • लोकशिक्षण दिन
  • 1962 : चिनी फौजांनी भारतावर आक्रमण केले.
  • 1969 : पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago