Current Affairs of 20 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (20 सप्टेंबर 2016)
रिले स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक :
- पोलीस कॉन्स्टेबल सुहास सोपान मांजरे याने 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत जोरदार धाव घेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले.
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या वतीने 65 व्या अखिल भारतीय पोलीस अँथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
- तसेच धावण्याच्या 800 मीटर स्पर्धेत सोनी मोकळने सुवर्ण पदकावर नाव कोरले.
- मुंबईचे सहपोलिस आयुक्त अनुपकूमार सिंग यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले.
- अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियामक मंडळाच्या मान्यतेने हैद्रराबाद येथील जीएमसी बालायोगी, गचिबावली स्टेडियमवर स्पर्धा पार पडली.
- स्पर्धेत निमलष्करी बल आणि राज्य पोलीस अशा 40 संघाच्या 1 हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
- साईगीताने 5000 मीटर स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले. तर स्वाती भिलारेने 4 बाय 400 मी. रिले स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.
Must Read (नक्की वाचा):
जगात ‘स्थलांतरितांचा देश’ 21 व्या क्रमांकावर :
- न्यूयॉर्कमध्ये मायदेशातील युद्धग्रस्त परिस्थितीमुळे स्थलांतर कराव्या लागलेल्या निर्वासितांची संख्या 6 कोटी 53 लाख इतकी झाली असून, ही संख्या ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे.
- स्थलांतरितांचा एक देश केल्यास तो लोकसंख्येच्या बाबतीत जगातील 21 वा मोठा देश असेल.
- संयुक्त राष्ट्रसंघाने ही माहिती प्रसिद्ध केली असून त्यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच स्थलांतरितांची संख्या इतकी वाढली आहे.
- इराक, सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, जॉर्डन या देशांमधून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.
- दहशतवादी कारवायांमुळे या देशांमध्ये अराजकता निर्माण झाली असल्याने येथील नागरिक सुरक्षितस्थळी आश्रय घेत आहेत.
- निर्वासित झालेल्या कुटुंबांची संख्या मोठी असून, त्यांच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी जागतिक स्तरावर गंभीरपणे चर्चा होणे आवश्यक असल्याचे राष्ट्रसंघाने अहवालात म्हटले आहे.
- अहवालानुसार, पृथ्वीवरील दर 113 नागरिकांमागे एक जण निर्वासित आहे.
वृक्षारोपणात महाराष्ट्राची लिम्का बुकमध्ये नोंद :
- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.
- महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला.
- तसेच यामध्ये 1 जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये 2 कोटी 81 लाख 38 हजार 634 रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
- सर्वसामान्य नागरिकांसह, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सरकारी, खासगी संस्था, संघटनांनी वृक्षारोपण केले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले आहे.
- पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव, शासकीय अधिकारी व राज्यातील नागरिकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
कोरी अँडरसनचे न्यूझीलंड संघात पुनरागमन :
- भारताविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या वन-डे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला असून अष्टपैलू कोरी अँडरसनला संघात स्थान दिले आहे. तो स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात खेळणार आहे.
- टाचेच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आऊट झालेला अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीला 15 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे तर कसोटी संघात समावेश असलेल्या निकोल्सला संघात स्थान मिळू शकले नाही.
- 16 ऑक्टोबरपासून धर्मशालामध्ये प्रारंभ होत असलेल्या मालिकेसाठी फलंदाज एंटन डेवसिच, अष्टपैलू जिमी निशाम व यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
- अँडरसन यापूर्वी न्यूझीलंडतर्फे अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना भारतात झालेल्या विश्व टी-20 स्पर्धेदरम्यान खेळला होता, पण त्यानंतर पाठदुखीमुळे झिम्बाब्वे व दक्षिण आफ्रिका दौऱ्याला त्याला मुकावे लागले.
महाराष्ट्राची हर्षदा निठवेला सांघिक गोल्ड :
- ज्युनिअर नेमबाजांनी अझरबैजान येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक नेमबाजीत पदकांची लूट सुरू ठेवली आहे.
- भारताने दुसऱ्या दिवशी (दि.19) एका सुवर्णपदकासह सहा पदके जिंकली. यात महाराष्ट्राची हर्षदा निठवे हिने भारताला सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले.
- तसेच या स्पर्धेत आता भारताची एकूण पदकांची संख्या 13 वर पोहोचली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे, त्यांपैकी दोन सुवर्णपदके जिंकून देण्यात महाराष्ट्राचा प्रतिभावान नेमबाज संभाजी पाटील याचा सिंहाचा वाटा होता.
- भारताला एकमेव सुवर्णपदक ज्युनिअर मुलींच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत औरंगाबादच्या हर्षदा निठवे हिच्यासह यशस्विनी सिंह देशवाल, मलाइका गोयल यांच्या संघाने जिंकून दिले.
- भारतीय संघाने एकूण 1,122 गुणांची नोंद केली. तुर्कीने रौप्य आणि उझबेकिस्तानने कांस्यपदक जिंकले. वैयक्तिक गटात हर्षदा निठवेचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- तसेच यात रशियाच्या लोमोव्हा मार्गारिटा हिने सुवर्णपदक जिंकले.
दिनविशेष :
- 1922 : चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक, द.न. गोखले यांचा जन्मदिन.
- 1933 : ब्रिटिश, भारतीय समाजसुधारिका ऍनी बेझंट स्मृतीदिन.
- 1996 : दया पवार, मराठी साहित्यिक स्मृतीदिन.
- 2004 : एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा