चालू घडामोडी (21 एप्रिल 2017)
आशियाई स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व दुती चंदकडे :
- भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां.प्री. 2017च्या तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी 16 सदस्यांचा भारतीय संघ चीनला रवाना होणार आहे.
- जियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे 24 आणि 27 एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र 30 एप्रिलला चिनी तैपई येथे होईल.
- 400 मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा 2014 क्रीडा स्पर्धेत 400 मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील.
राज्यात सिंचनाचा विक्रम मोडला :
- राज्यात 2016-17 या वर्षात आजवरचे सर्वाधिक कृषी सिंचनाचा आकडा गाठण्यात यश आले आहे. यंदा तब्बल 40 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. हा आजवरचा विक्रम आहे.
- तसेच या आधी 2012 मध्ये 32 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती.
- खरिप व रब्बी हंगाम मिळून 37.22 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली तर, सध्याच्या उन्हाळी हंगामात 2 लाख 80 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जात आहे.
- पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठीचे पाणी दिल्यानंतर कृषी सिंचनासाठी शिल्लक पाण्याच्या वाटपाचे नियोजन पहिल्यांदाच अचूक पद्धतीने करण्यात आल्याने हे यश आले आहे.
जी. श्रीकांत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी :
- राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे.
- नागरी सेवा दिनानिमित्त 21 एप्रिल रोजी मुंबईतील ‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
- उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनामार्फत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिन प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली आहे.
टी-20 क्रिकेटचा पहिला ‘दस हजारी’ खेळाडू ख्रिस गेल :
- झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वप्रथम दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला.
- आयपीएलमध्ये गुजरातविरुद्ध लौकिकास साजेशी फलंदाजी करताना ख्रिस गेल ही कामगिरी केली.
- आयपीएलच्या नव्या मोसमात गेलची फटकेबाजी प्रथमच बघायला मिळाली. त्यानंतर गेलने स्वतःचे ‘युनिव्हर्स बॉस’ असे वर्णन करताना प्रतिस्पर्धी संघांना आपल्याला फॉर्म गवसल्याचा जणू इशाराच दिला.
- तसेच या सामन्याचा मानकरी ठरल्यावर गेल म्हणाला,’मी अजूनही विश्वविजेता आहे आणि जिवंत आहे. मला विश्वविजेता म्हणवून घ्यायला आवडते.’
- गेलची आकडेवारी –
290 सामने
10,074 धावा
149.51 स्ट्राईक रेट
18 शतके
769 चौकार
743 षटकार
दिनविशेष :
- 21 एप्रिल 1659 रोजी शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली.
- नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे 21 एप्रिल 1932 मध्ये सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
- 21 एप्रिल 1997 मध्ये भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा