Current Affairs of 21 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2016)

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची सर्वोच्च कामगिरीची :

  • भारताने इंग्लंडवर मिळवलेल्या ऐतिहासिक मालिकाविजयाबरोबरच अनेक विक्रम नोंदले गेले आहेत.
  • भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्य़ा नावावरही अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.
  • सलग 18 कसोटी सामन्यात अपराजित राहत विराटने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढला आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 18 कसोटीत अपराजित राहण्याच्या बाबतीत विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉशी बरोबरी साधली आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटीत अपराजित राहण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाच्या नावे आहे.
  • जानेवारी 1982 ते डिसेंबर 1984 या काळात लॉइड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ तब्बल 27 कसोटीत अपराजित राहिला होता.

टेनेसिन हे 117 वे मूलद्रव्य म्हणून घोषित :

  • सहा वर्षांपूर्वी शोध लागलेल्या आवर्तसारणीतील अतिजड अशा 117 व्या मूलद्रव्याचे ‘टेनेसिन’ असे नामकरण करण्यात आले आहे.
  • नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ऍप्लाइड केमिस्ट्री’ (आययूपीएसी) या संस्थेने तब्बल एका वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ‘टेनेसिन’ या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • ‘टेनेसिन’चा शोध एप्रिल 2010 मध्ये लागला होता. हे अतिजड मूलद्रव्य असून, नैसर्गिकरीत्या ते आढळत नाही.
  • विशिष्ट समस्थानक असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा तशाच प्रकारच्या समस्थानक असलेल्या मूलद्रव्यावर प्रभाव पडल्यास संश्‍लेषण होते. त्यामुळे या दुर्मिळ घटनेत दोघांचे केंद्रके एकत्र येऊन अतिजड मूलद्रव्य तयार होते.
  • ‘टेनेसिन’च्या प्रकरणी, आवर्तसारणीतील मूलद्रव्य 117 तयार होण्यास बर्केलियम-249 हे किरणोत्साराचे लक्ष्य असावे लागते.

राष्ट्राध्यक्ष निवडीची शेवटची निवडणुक ट्रम्प यांनी जिंकली :

  • अमेरिकेच्या इलेक्टोरल कॉलेजने 19 डिसेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची आपले 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकृत विजयी होण्यासाठी गरज असलेली इलेक्टोरल कॉलेजची 270 मते मिळाली आहेत. यासोबत ट्रम्प यांचा व्हाईट हाऊसमध्ये विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत विजय मिळल्यानंतर ट्रम्प यांना इलेक्टोरल कॉलेजच्या 538 पैकी 270 मतांची गरज होती.
  • 20 जानेवारी डोनाल्ड ट्रम्प बराक ओबामांची जागा घेतील.

मानवी विचार प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात यश :

  • मानवी विचारांच्या प्रक्रियेचे एफएमआरआयच्या तंत्राने चित्रण करण्यात यश आले आहे. मानवी विचार असे वेगळे काढून दाखवता येत नाहीत, पण त्याच्या प्रक्रियेचे चित्रण शक्य झाले आहे.
  • फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे एफएमआरआय या तंत्राने रक्तातील ऑक्सिजनचे बदल टिपता येतात. न्यूरॉन्सच्या क्रियाशीलतेमुळे होणारे बदल पूर्वी टिपण्यास खूप क्षीण मानले जात होते.
  • नवीन संशोधनानुसार एफएमआरआय पद्धतीने मेंदूतील स्पंदने टिपली जातात. मेंदूविज्ञानात मेंदूचे मॅपिंग करताना याचा उपयोग होणार असून त्यात आकलन, लक्ष, केंद्रीकरण व जाणीव या पातळीवर घडणाऱ्या क्रियांची उकल होऊ शकते.
  • आरोग्यपूर्ण मेंदू जोडण्या व डिमेन्शिया व इतर विकार झालेल्या लोकांच्या मेंदूतील जोडण्या यातील फरक त्यामुळे टिपता येणार आहे. असे यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग अँड बायोइंजिनियरिंग या संस्थेने यांनी आहे.
  • एफएमआरआय तंत्राने रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण थोडे वाढले तरी समजते व हे तंत्र मेंदूतील दृष्टी, श्रवण व स्पर्श यांच्या नियंत्रणाशी संबंधित भागांकरता वापरता येईल.

लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथनला तिसरे स्थान :

  • भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळवले.
  • अमेरिकेच्या वेस्ली सो याने सहा गुणांसह अजिंक्यपद पटकावले. अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाने साडेपाच गुणांसह दुसरे स्थान घेतले.
  • तसेच आनंदने शेवटच्या फेरीत रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक याच्याशी बरोबरी स्वीकारली.
  • आनंद, क्रामनिक व अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांनी प्रत्येकी पाच गुणांसह तिसरे स्थान मिळविले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago