चालू घडामोडी (21 फेब्रुवारी 2017)
आता ऑनलाइन ‘ईपीएफ’ काढता येणार :
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना मे महिन्यापासून ऑनलाइन ‘ईपीएफ’ काढता येणार आहे.
- तसेच, निवृत्तिवेतनही निश्चित करता येणार असून, कागदोपत्री प्रक्रियेमुळे यासाठी लागणारा विलंब ऑनलाइन प्रक्रियेमुळे कमी होणार आहे.
- सध्या “ईपीएफओ’कडे 1 कोटीपर्यंत अर्ज येतात. यात ईपीएफ काढणे, तडजोड करणे, निवृत्तिवेतन निश्चिती आणि मृत व्यक्तीच्या समूह विम्याचा लाभ या बाबींचा समावेश असतो.
- ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी “ईपीएफओ’ची देशभरातील कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात होणार आहे.
- एखाद्याने अर्ज केल्यानंतर काही तासांत त्याचा ‘ईपीएफ’ देण्याची महत्त्वाकांक्षी योजना “ईपीएफओ‘ने आखली आहे. यामुळे एखाद्याला तीन तासांमध्ये ‘ईपीएफ’ मिळू शकेल.
- “ईपीएफओ’ने कर्मचाऱ्याने अर्ज केल्यानंतर 20 दिवसांत ‘ईपीएफ’ अथवा निवृत्तिवेतन देणे गरजेचे आहे.
-
- सध्या “ईपीएफओ’ने 50 क्षेत्रीय कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडली आहेत. नुकत्याच झालेल्या “ईपीएफओ’च्या बैठकीत डिजिटायजेशनवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार “ईपीएफओ’ची देशातील 125 कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडली जात आहेत.
- ‘ईपीएफ’ खात्याशी आधार क्रमांक जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे ‘ईपीएफ’ खाते, निवृत्तिवेतन खाते, बॅंक खाते आणि आधार क्रमांक जोडले जाऊन ऑनलाइन सुविधा देणे सोपे होणार आहे.
- आधार जोडणी करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची अखेरची मुदत देण्यात आली आहे.
नासाकडून ‘स्पेस-एक्स’च्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण :
- सुमारे 50 वर्षांपूर्वी चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांनी जिथून उड्डाण केले त्या ‘नासा’च्या लाँच पॅडवरून स्पेस-एक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे 19 फेब्रुवारी रोजी प्रक्षेपण करण्यात आले. अवकाश स्थानकाला पुरवठा करण्यासाठी हे रॉकेट सोडण्यात आले आहे.
- चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यासाठी येथील लाँचपॅड वापरले जाते. प्रदीर्घ काळापासून ते वापरले गेले नव्हते. अंतराळातील ये-जा करण्याची मोहीम (शटल प्रोग्रॅम) सहा वर्षांपूर्वी संपल्यानंतर नासाचे अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे लाँच काँप्लेक्स 39ए प्रथमच उड्डाणासाठी वापरण्यात आले.
- अमेरिकेतील अवकाशसंबंधी निर्मिती आणि वाहतूक करणारी अवकाश संशोधन तंत्रज्ञान महामंडळ तथा स्पेस-एक्स ही संस्था आहे.
- मागील वर्षी उन्हाळ्यात एका रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर स्पेस-एक्सच्या वतीने प्रथमच फ्लोरिडातून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले.
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी शुरहोझेलाई लिझित्सू :
- नागालँडच्या मुख्यमंत्रिपदासाठी सहमतीचे उमेदवार म्हणून नागालँड पीपल्स फ्रन्टचे (एनपीएफ) अध्यक्ष शुरहोझेलाई लिझित्सू यांची निवड करण्यात आली. ते टी.आर. झेलियांग यांची जागा घेतील.
- डेमोक्रॅटिक अलायन्स ऑफ नागालॅण्डच्या (डीएएन) बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून लिझित्सू यांची निवड करण्यात आली. या बैठकीला 59 आमदार उपस्थित होते. लिझित्सू डीएएनचेही अध्यक्ष आहेत.
- झेलियांग यांनी अलीकडेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील व्यवस्था होईपर्यंत राज्याचा कारभार पाहण्यास सांगितले.
- एनपीएफ विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड करण्यात आली, असे झेलियांग यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
- नगरपालिका निवडणुकांत 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर नागालँडमध्ये निदर्शनांना तोंड फुटले होते.
- विविध संघटना नगरपालिका निवडणुका रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. परिणामी झेलियांग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
विश्वचषकविजेत्या दृष्टिहीन क्रिकेट संघाला विशेष पुरस्कार :
- पाकिस्तानला अंतिम सामन्यात नमवून टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाला दहा लाखांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली.
- भारतीय संघाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अंतिम सामना जिंकला होता. याविषयी बोलताना गोयल म्हणाले, “भारताने संपूर्ण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून जगात अपराजित असल्याचे या संघाने सिद्ध केले आहे. रिओ पॅरालिम्पिकमध्ये देशाने चार पदके जिंकली. आता दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकल्यामुळे देशातील दिव्यांग खेळाडू किती प्रतिभावान आहेत, याचा प्रत्यय येतो. या खेळाडूंना प्रोत्साहन आणि मदत मिळण्याची गरज आहे.’’
दिनविशेष :
- शांतीस्वरुप भटनागर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.
- 21 फेब्रुवारी 1967 रोजी जिनिव्हा येथे नि:शस्त्रीकरण शिखर परिषद पार पडली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा