Current Affairs of 21 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 जानेवारी 2018)

अमेरिकेवर आर्थिक संकट, सरकार ‘शटडाऊन’ :

  • अमेरिका म्हणजे जगातील महासत्ता. मात्र याच देशावर आर्थिक संकट आले आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या वर्षपूर्तीच्या वेळीच सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या एका महत्त्वाच्या विधेयकाला खासदारांची मंजुरी
  • मिळू शकली नाही. त्याचमुळे शटडाऊन करावे लागले.
  • ‘शटडाऊन’ झाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत तसेच लाखो कर्मचाऱ्यांची नोकरीही जाणार आहे त्यांना घरी बसावे लागणार आहे.
  • अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू आहे. त्यामुळे निधीची कमतरता असल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचे कामकाज थांबवावे लागते.
  • निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टॉप गॅप बिल’ आणले जाते. हे डील अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने आणि सिनेट सदस्यांनी मंजूर करावे लागते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 जानेवारी 2018)

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशीच ‘मराठवाडा विकास सेने’ची स्थापना :

  • मराठवाड्याच्या विकासाची हाक देत माजी शिवसैनिकांनी नवा पक्ष स्थापन करणार आहेत.
  • ‘मराठवाडा विकास सेना’ असे या पक्षाचे नाव असून मराठवाड्यातील प्रश्नांवर हा पक्ष काम करणार आहे.
  • 23 जानेवारीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पक्षाची घोषणा केली जाणार आहे.

भगतसिंग यांना सर्वोच्च वीरता पुरस्कार द्या :

  • शहीद भगतसिंग यांना पाकिस्तानातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पाकिस्तानात जोर धरत आहे.
  • निशान-ए-हैदर हा पुरस्कार पाकिस्तानात सर्वोच्च मानला जातो.
  • भगतसिंग यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी येथील भगतसिंग मेमोरीयल फाऊंडेशनने केली आहे.
  • भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने पाकिस्तानच्या पंजाब प्रांत शासनाला या संबंधात नव्याने याचिका दिली आहे.
  • ‘भगतसिंह यांच्यासारखा शूर व्यक्ती उपखंडात कोणीही झाला नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे संस्थापक कैद-ए-आझम मोहम्मद अली जिन्ना यांनी या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

63 फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी :

  • बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला.
  • या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली.
  • तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली.
  • या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे –

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार
  • सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)
  • सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)
  • सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा – सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना – बद्रीनाथ की दुल्हनिया)
  • सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा – सिनेमा जग्गा जासूस)

महाराष्ट्रातील महिलांचा फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरव :

  • विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील 16 महिलांसह देशातील 112 कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणार्या देशातील 112 महिलांची निवड ‘फर्स्ट लेडी’ पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
  • सन्मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप होते.
  • भारतात सर्वप्रथम प्रवासी रेल्वे चालविण्याचा विक्रम करणार्या सातारा येथील सुरेखा यादव यांनी पुरस्कार स्वीकारला.
  • त्यांनी 1988 मध्ये रेल्वेची पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल ट्रेन चालवून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. 8 मार्च 2011 ला त्यांनी ‘डेक्कन क्वीन’ ही पुणे ते मुंबई (सीएटी) या कठीण मार्गावरील रेल्वे चालवून असा विक्रम करणारी आशियातील पहिली महिला रेल्वेचालक बनण्याचा मान मिळविला.
  • देशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक परभणी जिल्ह्यातील शीला डावरे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी 1988 मध्ये सर्वप्रथम ऑटोरिक्षा चालविला. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. त्यांनी सतत 13 वर्ष ऑटोरिक्षा चालविला, त्यानंतर महिला ऑटोरिक्षा चालकांसाठी अकादमी सुरू केली. भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार पद्मश्री डायना एडलजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1975 ते 1995 पर्यंत त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करून महिला क्रिकेटला नवी दिशा दिली. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भारताचे दोन वेळा नेतृत्व केले.
  • भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्याच्या अरुणा राजे पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
  • 1969 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत प्रवेश करणार्या अरुणा राजे पाटील यांनी पटकथाकार, संपादक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
  • डॉ. चंद्रानी प्रसाद वर्मा या पहिल्या खाण अभियंता आहेत.
  • डॉ. स्वाती पिरामल या प्रथम महिला आहेत ज्या असोचेम या संघटनेच्या अध्यक्षा झाल्या.त्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण सेवामध्ये आमूलाग्र बदल व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्या देशातील आघाडीच्या उद्योजक म्हणून गणल्या जातात.
  • उपासना मकाती यांनी दृष्टिहीनांसासाठी ब्रेललिपीमध्ये देशातील पहिले इंग्रजीमध्ये ‘व्हाईट प्रिंट’ नावाचे मासिक 2013 पासून प्रकाशित केले आहे. त्यांचे हे मासिक शाळा, महाविद्यालय, वृद्धाश्रम, रुग्णालय, ग्रंथालयात ठेवले जाते. 2016 च्या फोर्ब्सच्या यादीत स्मार्ट सीईओ म्हणून पहिल्या 30 मध्ये त्यांचे नाव नोंदविले होते.
  • देशातील पहिली सॅनिटरी पॅडची बँक सुरू करणा-या आमदार म्हणून वर्सोवा, मुंबई येथील विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व शाळांमध्ये सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन स्थापित केल्या. त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधासह महिलांच्या आरोग्य, शिक्षणासाठी महत्त्वाचे कार्य केले.
  • रजनी पंडित या देशातील पहिल्या नोंदणीकृत खासगी लोकप्रिय गुप्तहेर आहेत. पंडित यांनी आतापर्यंत 75000 पेक्षा अधिक केसेस सोडविल्या आहेत. त्यांनी या विषयावर डॉक्युमेंट्री तयार केलेली आहे.
  • डॉ. इंदिरा हिंदुजा या प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत ज्यांनी पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती केली आहे. 1989 मध्ये त्यांनी आयव्हीएफ सेंटरची स्थापना केली आहे. सध्या त्या पी.डी. हिंदुजा राष्ट्रीय रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रात कार्यरत आहेत.
  • जागतिक ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकणार्या पहिल्या महिला बुद्धिबळपटू मुंबई येथील पद्मश्री भाग्यश्री ठिपसे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी पाच वेळा बुद्धिबळात राष्ट्रीय चॅम्पियनशीपचा खिताब मिळविला आहे. त्या 1991 मध्ये महिला आशियाई बुध्दिबळाच्या मानकरी ठरल्या. 1999 च्या राष्ट्रकुल देशांच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण तर तीन वेळा रजत पदकावर मोहर उमटविली आहे.
  • पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाºया मुंबई येथील स्नेहा कामत यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिलांसाठी वाहन चालनाचे प्रशिक्षण प्रदान करणाºया स्नेहा कामथ यांनी शी कॅन ड्रॉईव्ह हा उपक्रम सुरू केला आहे.
  • डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योद्ध्यांचा परिचय करून देणारी पहिली तरुणी मुंबईची 18 वर्षीय तारा आनंद.
  • भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबलावादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला. आज दुर्गाबाई कामत यांच्यावतीने हा पुरस्कार वृषाली गोखले यांनी तर डॉ. अबन मिस्त्री यांच्या वतीने जामिनी जवेरी यांनी स्वीकारला.

दिनविशेष :

  • 1972: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
  • 2000 : फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago