चालू घडामोडी (21 जून 2016)
आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन :
- देशभरात सर्वत्र (ता. 21) आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त जोरदार तयारी सुरू असून, अनेक ठिकाणी विविध संस्था योग प्रशिक्षण शिबिरे अयोजित करत आहेत.
- केंद्र सरकारनेही योग दिन जोरदार साजरा करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत.
- 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर झाल्यानंतरचा हा दुसरा योग दिन आहे.
- योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चंदीगडमध्ये होणार आहे.
- शाळांमध्ये योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे, तर हिमाचल प्रदेश सरकारने राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन केले होते.
- विविध देशांमधील भारतीय दूतावासांनीही त्या त्या देशांशी संपर्क साधून योग दिनाची तयारी केली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे मलेशियात अनावरण :
- मलेशियातील भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात (दि.20) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ब्रॉंझच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
- तसेच या वेळी भारतीय राष्ट्रीय लष्कराचे (आयएनए) नऊ सदस्य उपस्थित होते, यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
- गतवर्षी मलेशिया भेटीवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सांस्कृतिक केंद्राचे नाव “नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय सांस्कृतिक केंद्र” असे करण्याची घोषणा केली होती.
- आयएनए, झाशी रेजिमेंट आणि बालक सेनेसाठी ऐतिहासिक असा हा क्षण नुकताच जुळून आला.
41 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात :
- बरोबर आजच्याच दिवशी 41 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती.
- सात जून ते 21 जून 1975 या कालावधील ही स्पर्धा झाली होती.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पहिली वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवली होती.
- प्रुडेनशियल कंपनीने स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्याने पहिला वर्ल्डकप प्रुडेनशियल वर्ल्डकप म्हणून ओळखला जातो.
- पहिला आंतराष्ट्रीय सामना 1844 मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.
- तसेच सध्या जगभरात 20 पेक्षा जास्त देशात हा खेळ खेळला जातो.
- 1877 मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली.
- 1882 मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.
आयसीसी क्रमवारीत 13 व्या स्थानी अक्षर पटेल :
- भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने (दि.20) जाहीर वन-डे गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 13 वे स्थान पटकावले, तर जसप्रीत बुमराह व धवल कुलकर्णी यांनी झिम्बाब्वेविरुद्धची मालिका संपल्यानंतर क्रमवारीतील स्थानामध्ये प्रगती केली आहे.
- पटेलने झिम्बाब्वेविरुद्ध तीन बळी घेतले. तो भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला गोलंदाज रविचंद्रन आश्विनच्या तुलनेत तीन स्थानांनी पिछाडीवर आहे.
- वेगवान गोलंदाज बुमराह मालिकेत 9 बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने मानांकनामध्ये प्रगती करताना 97 वे स्थान पटकावले.
- पाच बळी घेणाऱ्या कुलकर्णीने 29 स्थानांची प्रगती करताना 88 वे स्थान पटकावले आहे.
जागतिक शांततेसाठी लोकप्रिय संगीत दिन :
- 1960 च्या सुमारास शहरातील तरुणांवर प्रभाव पाडणारे अमेरिकन सोल म्युझिक व रेग्गेचाही प्रभाव राहिला.
- स्थानिकांमध्ये प्रिय असलेले बबलगम आणि जगाचे लक्ष वेधून घेणारी पहिली आफ्रिकन लोकप्रिय संगीत शैली क्वेला.
- 1900 च्या सुमारास असलेली मराबी स्टाईल यांनी दक्षिण आफ्रिका, लेसोथो, स्वाझीलँड यांचे संगीत समृद्ध केले.
- जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने सुरू केली. या दिवसाला तेथे ‘फेटे डे’ला ‘म्युसिक्यू’ असे संबोधतात.
- फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरिश फ्लेरेट यांनी त्यावेळी असलेल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली.
- लोकांना मोफत संगीत जलसे ऐकायला मिळावे यासाठी फ्रान्समध्ये एक घोषणा तयार करण्यात आली होती.
- तसेच ‘म्युसिक्यू’ याचा अर्थ संगीत निर्माण करा.
- जगभर संगीताच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करावी यासाठी युनेस्कोचे संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी 1975 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला.
भारतीय अवकाश संशोधन संस्था इतिहास रचण्यास सज्ज :
- पीएसएलव्ही-सी 34 या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) काउंटडाऊन सुरू केले आहे.
- बावीस जूनला सकाळी 9.26 वाजता येथील सतीश धवन अवकाशकेंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.
- उड्डाणानंतर पन्नास मिनिटांनी पीएसएलव्हीचे इंजिन पाच सेकंदांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने या प्रयोगासाठी ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ उत्सुक आहेत.
- तसेच यामुळे एकाच रॉकेटच्या साह्याने उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थिर करणे शक्य होणार आहे.
- अवकाशात सोडण्यात येणाऱ्या वीस उपग्रहांमध्ये भारताच्या आणि अमेरिकेच्याही उपग्रहांचा समावेश आहे.
- भारतातर्फे पृथ्वी निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह सोडण्यात येईल.
- तसेच, भारतीय विद्यापीठांनी केलेले दोन उपग्रहांचाही यात समावेश आहे.
- प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवशी आठ मिनिटांनंतर ‘पीएसएलव्ही’ने 505 किमी उंची गाठल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
- तसेच याआधी पीएसएलव्ही-सी 9 च्या साह्याने ‘इस्रो’ने 2008 मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते.
दिनविशेष :
- उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
- दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.
- कॅनडा स्थानिक रहिवासी दिन.
- आंतरराष्ट्रीय योग दिवस.
- 1975 : वेस्ट ईंडीझने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा