Current Affairs of 21 March 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 मार्च 2017)
संयुक्त राष्ट्रांच्या वैद्यकीय गटात सौम्या स्वामिनाथन :
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संचालक सौम्या स्वामिनाथन यांची संयुक्त राष्ट्रांच्या जीवाणूविरोधी लढ्यासाठीच्या उच्चस्तरीय गटात नेमणूक करण्यात आली आहे. त्या जीवाणू प्रतिरोध तज्ज्ञ म्हणून या गटात सल्लागाराची भूमिका पार पाडणार आहेत.
- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यानी त्यांची नेमणूक केली आहे. स्वामिनाथन (वय 57) यांची जीवाणूरोधक समन्वय गटात नेमणूक झाली असून या गटात उप सरचिटणीस अमीन महंमद या सहअध्यक्ष असतील, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक मार्गारेट चॅन यांनी सांगितले.
- स्वामिनाथन या भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव आहेत. त्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
- इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस अँड लंग डिसिजेस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या एचआयव्ही विभागाच्या त्या अध्यक्ष आहेत.
- तसेच पुण्याच्या एएफएमसी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वज्ञिान केंद्रातून बालवैद्यकीत एमडी केले.
Must Read (नक्की वाचा):
पीकविमा योजनेसाठी आधार अनिवार्य :
- खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना व हवामान आधारित फळ पीकविमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. या योजनांसाठी आधार क्रमांक संलग्न केलेल्या बॅंक खात्याच्या वापरामुळे योजनेची अंमलबजावणी जलद होणार आहे.
- शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून खात्यावर थेट जमा करणे सुलभ होणार आहे.
- राज्यात खरीप 2016 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे.
- केंद्र सरकारच्या 8 फेब्रुवारी 2017 च्या राजपत्रान्वये खरीप हंगाम 2017 पासून प्रधानमंत्री पीकविमा योजना व फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणिकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी आदिती तटकरे :
- रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अॅड. आस्वाद पाटील यांची निवड, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत निश्चित करण्यात आले असल्याची माहिती शे.का.पक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस अॅड. परेश देशमुख यांनी दिली आहे.
- रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया गेल्या 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊ न पार पडली या निवडणूकीत शे.का. पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले असून 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या स्व.ना.ना. पाटील सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे.
- तसेच या पाश्र्वभूमीवर आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासमवेत पनवेल येथे कर्नाळा भवनमध्ये पार पडली असून अध्यक्षपदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी अॅड. आस्वाद पाटील यांच्या नावावर सहमंती दर्शविली आहे.
तमिळनाडूने जिंकला विजय हजारे करंडक :
- सीनिअर फलंदाज दिनेश कार्तिकच्या शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर तमिळनाडूने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगालवर 37 धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले.
- विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूने बंगालवर अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा विजय मिळवला. याआधी तमिळनाडूने 2008-09 आणि 2009-10 मध्येदेखील बंगालवर मात केली होती.
- तमिळनाडूने 47.2 षटकांत 2014 धावा केल्या. यात कार्तिकच्या सुरेख 112 खेळींचा समावेश होता. दिनेश कार्तिकने त्याच्या शतकी खेळीत 14 चौकार मारले.
- तसेच बंगालकडून मोहम्मद शमीने 26 धावांत 4, तर अशोक दिंडाने 36 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर तमिळनाडूने बंगाल संघाला 180 धावांत गुंडाळले.
दिनविशेष :
- 21 मार्च हा जागतिक वनदिन आहे.
- 21 मार्च हा विश्व वंशभेद निर्मूलन दिवस म्हणून साजरा करतात.
- 21 मार्च हा पृथ्वी दिन म्हणून पाळला जातो.
- 21 मार्च 1916 हा भारतीय सनईवादक ‘बिस्मिल्ला खाँ’ यांचा जन्म दिन आहे.
- भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात 21 मार्च 1992 रोजी सामील झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा