चालू घडामोडी (21 मे 2016)
भारतीय तरुणाकडे ‘नासा’च्या मोहिमेचे नेतृत्त्व :
- आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासा राबवित असलेल्या प्रकल्पातील एका मोहिमेच्या नेतृत्त्वासाठी मूळ अहमदाबादमधील भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन या तरुणाची निवड झाली आहे.
- गेल्या दोन दशकात आपल्या सौरमालेबाहेरील तीन हजार ग्रहांचा शोध लागला आहे. पण त्यापैकी एकाही ग्रहावर जीवसृष्टी आढळलेली नाही.
- अद्यापही ज्ञात आणि अज्ञात सौरमालेतील अनेक ग्रहांचा शोध घेणे बाकी आहे.
- सुव्रत हे सध्या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.
- नव्या ग्रहांचा शोध लावण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एनईआयडी’ या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी सुव्रत यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाची नासाने नासाने निवड केली आहे.
- सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या सुव्रतने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना याबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक मंजूर :
- व्हाइट हाउसचा आक्षेप धुडकावून रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या अमेरिकी प्रतिनिधी सभेने पाकिस्तानविरोधी ‘राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक’ (एनडीएए) संमत केले.
- हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाई करण्यात अपयश आल्यास पाकला मिळणारी 45 कोटी डॉलरची मदत रोखण्याची तरतूद या विधेयकात आहे.
- अमेरिकी प्रतिनिधी सभेने (दि.18) 147 विरुद्ध 277 मतांनी ‘एनडीएए’-2017 (एचआर 4909) पारित केले. त्यात तीन प्रमुख दुरुस्त्याही सामील करण्यात आल्या आहेत.
- प्रतिनिधी सभेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार मदत म्हणून पाकिस्तानला 45 कोटी डॉलरची रक्कम जारी करण्यापूर्वी पाकिस्तानने अटींचे पालन केल्याचे प्रमाणपत्र ओबामा प्र्रशासनाने द्यावे लागेल.
- पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि मध्यम स्तरावरील टोळ्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात प्रगती दाखविली आहे.
- खासदार डाना रोहराबाथर यांच्या दुरुस्तीत आणखी एक अतिरिक्त आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पशुसंवर्धन दिन साजरा :
- दरवर्षी 20 मे हा महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खाते स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
- तसेच त्यानुसार, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, मुरबाड यांच्या वतीने पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरेश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली तो साजरा करण्यात आला.
- या वेळी सहायक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, मानवी जीवनाच्या दैनंदिन व्यवहारात रोज जे दूध, अंडी, चिकन, मटण, उपलब्ध होते, त्याचा निर्माता जरी शेतकरी असला तरी पशुवैद्यकांचे आणि राज्य शासकीय पशुसंवर्धन विभागाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.
- या खात्याचे अधिकारी, कर्मचारी पशुपालक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा देतात.
- तसेच शासकीय योजनांचा प्रचार-प्रसारही या खात्याच्या वतीने केला जातो.
- या पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्याच्या पशुवैद्यकीय संस्थेमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना एक गुलाबपुष्प देऊन त्यांच्या शासकीय सेवेचा सन्मान करण्यात आला.
अमेरिकेकडून भारतीय, पाकिस्तानी शास्त्रज्ञांचा गौरव :
- विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनात योगदान देणाऱ्या अमेरिकी-भारतीय आणि अमेरिकी पाकिस्तानी शास्त्रज्ञांचा (दि.20) अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
- व्हाइट हाउस येथे झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष बराक ओबामा यांनी शास्त्रज्ञांच्या कार्याचे आणि संशोधनाचे कौतुक केले.
- हॉवर्ड मेडिकल स्कूल आणि मॅंचेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे राकेश के जैन यांना कर्करोग निदान, प्रतिबंध आणि उपचारातील संशोधनाबाबत नॅशनल मेडिकल ऑफ सायन्स या पुरस्काराने गौरविले.
- पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान डॉ. महंमद अली जिना यांची वैयक्तिक देखभाल करणाऱ्या डॉक्टरांचे नातू हुमायू (वय 53) यांनाही नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पुरस्काराने गौरविले.
- हुमायूंचे कुटुंबीय मूळचे जालंधरचे. फाळणीनंतर ते पाकिस्तानात आणि कालांतराने 1972 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले.
विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री :
- माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व धर्मदमचे आमदार पिनरयी विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री असतील.
- माकपच्या वरिष्ठ नेत्यांची (दि.21) सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये विजयन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले 93 वर्षीय व्ही. एस. अच्युतानंदन यांना पक्ष सचिवालयात बोलावून निर्णयाची कल्पना देण्यात आली.
- कन्नूर जिल्ह्य़ातील धर्मदम मतदारसंघातून 36 हजार 905 मतांनी ते विजयी झाले आहेत.
माकपचे ते चौथे मुख्यमंत्री असतील. - 72 वर्षीय विजय कुशल संघटक मानले जातात. गरीब कुटुंबातून आलेले विजयन राजकीयदृष्टय़ा प्रभावी थिय्या समाजातून आले आहेत.
- केरळमधील पक्षसंघटनेवर त्यांचा प्रभाव आहे.
- 1996 ते 98 या काळात ऊर्जामंत्रिपद सांभाळताना त्यांनी ठसा उमटवला होता.
एनटीपीसी पश्चिम विभागाला ‘पीआर पुरस्कार’ :
- राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या पश्चिम विभागीय-1 मुख्यालयाला राष्ट्रीय पातळीवर जनसंपर्क विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग तिसऱ्यांदा ‘पीआर एमओयू एक्सलन्स अॅवॉर्ड’ मिळाला आहे.
- कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या सामंजस्य करारातील उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण केल्याबाबत हा पुरस्कार दिला जातो.
- तर विभागाच्या सोलापूर प्रकल्पाला हाउस जर्नल पुरस्काराच्या कंपनी पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
- नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांच्या हस्ते पश्चिम विभाग मुख्यालयाचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (जनसंपर्क) के. रवींद्रन, उपव्यवस्थापक (जनसंपर्क) क्रिती दत्ता यांनी पुरस्कार स्वीकारला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा