Current Affairs of 21 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 नोव्हेंबर 2017)
दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी :
- भारताचे दलवीर भंडारी यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे.
- आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे 9 वर्षांसाठी नेमणूक होते. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली होती. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपत असून या पदासाठी भारताने पुन्हा न्या. भंडारी यांना नामांकन जाहीर केले होते.
- न्या. भंडारी यांच्या फेरनियुक्तीत ब्रिटनचा अडथळा होता. ब्रिटनने या पदासाठी क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ब्रिटनचा समावेश असून अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांचे ग्रीनवुड यांना समर्थन होते. त्यामुळे ब्रिटनचे पारडे जड दिसत होते.
- अकरा फेरीत संयुक्त राष्ट्राच्या महासभेत न्या. भंडारी यांना बहुमत मिळाले होते. मात्र सुरक्षा परिषदेत भंडारी पिछाडीवर होते. यासाठी 12 वी फेरी पार पडणार होती. मात्र त्यापूर्वीच ब्रिटनने माघार घेतली आणि न्या. भंडारी यांचा मार्ग मोकळा झाला. आमच्या निकटच्या मित्राच्या (भारत) विजयाचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिटनने दिली.
Must Read (नक्की वाचा):
माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्ना कालवश :
- माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे 19 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या 49 वर्षांच्या होत्या. झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जाना चेक रिपब्लिकची नागरिक होत्या.
- जाना नोवोत्ना यांनी त्यांच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत 17 ग्रँड स्लॅम जिंकले. दुहेरी प्रकारात जानाच्या नावावर 76 विजेतेपदे होती. तर एकेरी प्रकारात 24 विजेतेपदांवर जानाने नाव कोरले होते.
- 1988 मध्ये त्यांना ऑलिम्पिकचे रौप्यपदक मिळाले. तर 1996 मध्ये अटलांटा गेम्समध्ये त्यांना रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने जाना नोवोत्नाच्या निधनाच्या संदर्भातले वृत्त दिले आहे.
- 2005 मध्ये त्यांनी कोचिंग करायला सुरूवात केली. 2013 मध्ये जाना निवृत्त झाल्या. 1993 मध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेतील त्यांचा खेळ क्रीडा प्रेमींच्या स्मरणात राहिला आहे.
मोदी सरकार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे विश्वासार्ह सरकार :
- केंद्रातील मोदी सरकार हे जगातील विश्वासार्ह देशांच्या सरकारांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील सर्वाधिक विश्वासार्ह सरकारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्वित्झर्लंड आणि इंडोनेशियातील सरकार अव्वलस्थानी आहेत तर भारत यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारची प्रशंसा केली आहे. तसेच भारताच्या विकासाचा हा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, भारतातील तीन तृतीयांश अर्थात 74 टक्के भारतीयांनी केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी फोरमने जगभरातील देशांची अर्थव्यवस्था, तेथील राजकीय घडामोडी आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांचा निकष लावला आहे.
- जगातील इतर देशातील सरकारांच्या विश्वासार्हतेबाबत ग्रीसची परिस्थिती भयावह आहे. कारण या देशातील केवळ 10 नागरिकांनीच देशाच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.
- दरम्यान, विविध देशांतील विश्वासार्ह सरकारांच्या यादीत स्वित्झर्लंड आणि इंडोनेशिया हे देश अव्वलस्थानी आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
- विशेष म्हणजे आश्चर्यकारकपणे जगातील सर्वात शक्तीशाली देशात सत्तांतर घडवून आणून राष्ट्रप्रमुख बनलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवरही अमेरिकन नागरिकांनी पुरेसा विश्वास दाखवलेला नाही.
चीनकडून नव्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी :
- चीनने ‘डाँगफेंग-41’ (डीएफ-41) या अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतल्याचे वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 12 हजार ते 15 हजार किलोमीटर असून एकावेळी अनेक अण्वस्त्रे जगाच्या कोणत्याही भागात डागण्याची त्याची क्षमता आहे. त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दहापट असल्याने अमेरिका व अन्य देशांच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांना चकवा देऊन लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षपणास्त्र पुढील वर्षी चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
- चीनच्या ताफ्यात यापूर्वीच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असून अत्याधुनिक डाँगफेंग-41 हे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे काम तेथे 1990च्या दशकापासून सुरू आहे. या क्षेपणास्त्राच्या 2012 पासून सात चाचण्या झाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात चीनच्या पश्चिमेकडील वाळवंटातून त्याची आठवी चाचणी घेण्यात आली, असे वृत्त ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ या वृत्तपत्राने दिले आहे.
- तसेच हे क्षेपणास्त्र 2018 सालापर्यंत चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दाखल होईल, असे चीनच्या सकारी मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
भारतीय बनवतीचे पहिले विमान :
- देशी बनावटीचे पहिले विमान बनविणारे मुंबईचे अमोल यादव यांच्या टीएसी 003 या विमानाची अखेर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नोंदणी केली असून तसे प्रमाणपत्रही दिले. त्यामुळे यादव यांचे विमान निर्मितीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- या नोंदणीसाठी कसोशीने पाठपुरावा केल्याबद्दल यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शाबासकी देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- वैमानिक अमोल यादव यांनी चारकोप येथील घराच्या गच्चीवर 2011 मध्ये विमान बनविले. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहात ते प्रदर्शित केले. यादव हे थ्रस्ट इंडिया या त्यांच्या कंपनीमार्फत महाराष्ट्रात विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभारतील.
- भारतीय बनावटीचे विमान बनविण्याचा त्यांचा संकल्प पाहता राज्य सरकारने त्यांच्या कंपनीस सहकार्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 19 आसनी विमान बनविण्यासाठी जमीन देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा