Current Affairs of 21 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2016)
स्टील उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर :
- भारत लवकरच जगात दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश बनण्याच्या मार्गावर आहे.
- चीन व जपाननंतर भारत स्टील उत्पादनात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- लवकरच जपानला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय स्टील विभागाचे मंत्री बीरेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे.
- केंद्र सरकारने पायाभूत सोयींच्या विकासात सर्वाधिक गुंतवणूक करण्याचे लक्ष ठरवले आहे.
- रेल्वेसाठी 1 लाख 25 हजार कोटी, राष्ट्रीय महामार्गांसाठी 80 ते 85 हजार कोटी आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 20 हजार कोटींची तरतूद तर सरकारने चालू आर्थिक वर्षातच केली असल्याने भारतात स्टीलची मागणी हमखास वाढणार आहे.
- ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत 2022 पर्यंत शहरांमधे 3 कोटी तर ग्रामीण भागात 2 कोटी अशी एकुण 5 कोटी घरे बांधली जाणार आहेत, या प्रकल्पांसाठीही स्टील लागणारच आहे.
- सिमेंट काँक्रिटऐवजी पूर्णत: लोखंडी पूल उभारल्यास तो 15 टक्के महाग असला तरी त्याचे आयुष्य किमान 150 वर्षांचे असते.
- तसेच ही बाब लक्षात घेउन पुलांच्या उभारणीत स्टीलला उत्तेजन दिले जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
राज्य परिवहन महामंडळाचे आरक्षणासाठी मोबाईल ऍप :
- स्मार्टफोनच्या युगात राज्य परिवहन महामंडळही (एसटी) स्मार्ट होऊ लागले आहे.
- महामंडळाने प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षणाची सुरू केलेली सुविधा आता प्रवाशांच्या अँड्रॉइड मोबाईलवर आणून ठेवली आहे.
- ‘ईटीआयएम-ओआरएस’ या प्रकल्पांतर्गत ‘एसटी’ने आगाऊ आरक्षण मोबाईल ऍप कार्यान्वित केले आहे.
- तसेच प्रवाशांना आता घरबसल्या मोबाईलवरून ‘एसटी‘चे आरक्षण करता येईल.
- विमान, रेल्वेकडून मिळणाऱ्या सुविधांनुसार एसटीच्या प्रवाशांनाही ऑनलाइन सुविधा महामंडळ उपलब्ध करून देत आहे.
- टप्प्या-टप्प्याने एक-एक सुविधा सुरू करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे आज सर्वच जण अँड्रॉइड मोबाईल वापरत आहेत. त्यामुळे सारे काही आपल्याच हातात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
- एकंदरीत स्मार्ट सुविधांचा वापर अलीकडे वाढला असून, त्याच अनुषंगाने ‘एसटी’नेही स्मार्ट कारभारात आणखी एक पाऊल पुढे टाकून आरक्षणाची सुविधा प्रवाशांच्या हातातच आणून ठेवली आहे.
- सदर सुविधा सुरू झाली असून, प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी केले आहे.
सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार :
- साखर उत्पादन क्षेत्राच्या विविध श्रेणीत विशेष गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या महाराष्ट्रातील 9 सहकारी साखर कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑफ शुगर इंडस्ट्रीजच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
- सर्वोत्तम कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा सन्मान यंदा कोल्हापुर जिल्ह्यातील यलगुडच्या जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याला प्राप्त झाला आहे.
- दिल्लीच्या को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाच्या सभागृहात आयोजित नॅशनल शुगर फेडरेशनच्या 57 व्या वार्षिक सभेत, फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष अमित कोरे, व्यवस्थापकीय संचालक एम.जी. जोशी व अन्य मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- गुणवत्तेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशातल्या 90 साखर कारखान्यांनी विविध श्रेणीत आपल्या प्रवेशिका सादर केल्या होत्या. त्यापैकी 21 कारखान्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.
- महाराष्ट्रातल्या 9 सहकारी साखर कारखान्यांचा त्यात समावेश आहे.
- सर्वोत्तम कामगिरी दिला जाणारा पुरस्कार जवाहर शेतकरी साखर कारखाना (यलगुड कोल्हापुर)चे अध्यक्ष कल्लप्पा आवाडेंसह कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला.
- देशात उच्च दर्जाच्या साखर उत्पादनासाठी सांगलीच्या पलुस तालुक्यातील डॉ. जी.बी.बापू लाड सहकारी कारखान्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘स्मार्ट सिटी’ च्या तिसऱ्या टप्प्यात 27 शहरांची निवड :
- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत देशभरातील 27 शहरांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे.
- केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
- राज्यातील निवड झालेल्या शहरांमध्ये नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे आणि कल्याण–डोंबिवली या शहरांचा समावेश आहे.
- पहिल्या टप्प्यात पुणे व सोलापूर या शहरांची निवड झाली होती.
- आतापर्यंत राज्यातील एकूण सात शहरांची ‘स्मार्ट सिटी’ योजनेत निवड झालेली आहे.
- (दि.20) जाहीर झालेल्या तिसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह एकूण बारा राज्यांतील शहरांचा समावेश आहे.
- तसेच यामध्ये महाराष्ट्रातील पाच, तमिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी चार, उत्तर प्रदेशातील तीन, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात, नागालॅंड आणि सिक्किम या राज्यांतील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे.
- ‘स्मार्ट सिटी’साठी निवड झालेल्या 27 शहरांच्या विकासासाठी 66 हजार 883 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
- तसेच या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 20, दुसऱ्या टप्प्यात 13 आणि आज तिसऱ्या टप्प्यात 27 शहरांची निवड करण्यात आलेली आहे.
ज्युनियर विश्वकप नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्ण :
- भारतीय नेमबाज रिषिराज बारोट याने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वकप नेमबाजी स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताला सुवर्ण मिळवून दिले.
- 19 वर्षांच्या रिषिराजने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात झेक प्रजासत्ताकाच्या खेळाडूला 25-23 असे मागे टाकून सुवर्ण जिंकले.
- पात्रता फेरीत त्याने 556 गुणांची कमाई करून अंतिम 8 स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते.
- झेक प्रजासत्तकाचा लुकास सुकोमल रौप्याचा तसेच ऑस्ट्रेलियाचा सर्गेई इव्हेगलव्हस्की कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
- रिषिराजने यंदा मे महिन्यात जर्मनीत ज्युनियर विश्वचषकात नववे स्थान मिळविले होते.
- आता पर्यंत एकूण 6 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्यांसह भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर आला.
- रशिया दहा सुवर्णांसह 21 पदके जिंकून पहिल्या स्थानावर कायम आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा