चालू घडामोडी (22 डिसेंबर 2017)
2जी घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त :
- गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या पराभवास 2जी आणि कोळसा हे दोन घोटाळे मुख्यत्वे जबाबदार ठरले होते. यापैकी 2जी घोटाळ्यात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने काँग्रेसवर बसलेला ठपका दूर झाला आहे.
- काँग्रेसबद्दल निर्माण झालेली भ्रष्ट प्रतिमा दूर होण्यास या निकालाने मदतच होणार आहे. दुसरीकडे, तामिळनाडूच्या राजकारणावर या निकालाचा मोठा परिमाण होणार असून, गेले सात वर्षे सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोपांचा सामना कराव्या लागलेल्या द्रमुकला दिलासाच मिळाला आहे.
- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, त्यानंतर झालेली निर्माण झालेली लोकभावना यातून काँग्रेसची प्रतिमा भ्रष्ट अशी झाली होती. 2जी घोटाळ्यातील निकालाने काँग्रेसला दिलासाच मिळाला आहे.
गंगाप्रसाद अग्रवाल यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार :
- अमेरिकास्थित मराठी लोकांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्य, समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
- साहित्य जीवन गौरव पुरस्कारासाठी अनिल अवचट (पुणे), समाजकार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी वसमत (जि. हिंगोली) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गंगाप्रसाद अग्रवाल यांची निवड झाली.
- डॉ. हमीद दाभोलकर यांनी 21 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत यासंर्भात माहिती दिली. पुरस्कारार्थींत नाटककार अजित दळवी यांचाही समावेश आहे.
- तसेच या संस्थेतर्फे गेल्या 24 वर्षांपासून हे पुरस्कार दिले जात आहेत. 2017 साठीच्या पुरस्कारांत साहित्य, समाजकार्यासाठी प्रत्येकी चार तर एक डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे.
शौर्य अजित डोवलचा भाजपामध्ये प्रवेश :
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अजित डोवल यांचा मुलगा शौर्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शौर्य आता भाजपमध्ये सहभागी होणार आहे.
- उत्तराखंडमधील हल्दवानी येथे झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून ते सहभागी झाले होते.
- शौर्य यांना राजकारणात उतरवण्याची भाजपने योजना आखली आहे. राज्यसभेच्या माध्यमातून ते संसदेत येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.
- शौर्य हे पंतप्रधान मोदींच्या थिंक टँकमध्येही आहेत. इंडिया फाउंडेशनवरून काँग्रेसच्या निशाण्यावर ते आले होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत.
- उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपचे नेते सतपाल महाराजांच्या समर्थनात चौबट्टाखाल विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उतरले होते. आता कार्यकारिणी सदस्याच्या रूपात त्यांचा थेट पक्षात प्रवेश झाला आहे.
संशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर :
- सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील 24 उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतनवाढी संबंधीचे विधेयक 21 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. यामुळे न्यायाधीशांच्या वेतनात सुमारे अडीचपट वाढ होणार आहे.
- कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (वेतन आणि सेवा) संशोधक विधेयक 2017 लोकसभेत सादर केले.
- या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर न्यायाधीशांचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या वेतनाएवढी वाढ होणार आहे. न्यायाधीशांची वेतनवाढ जानेवारी 2017 पासून लागू होणार आहे. त्याशिवाय घरभाडे भत्ता एक जुलैपासून तर वाहतूक भत्ता 22 सप्टेंबर 2017 पासून लागू होईल. या कायद्यानुसार, सेवानिवृत्त न्यायाधीशांनाही वेतनवाढ मिळणार आहे.
किदम्बी श्रीकांतची जागतिक क्रमवारीत सुधारणा :
- भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर श्रीकांत चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
- 21 डिसेंबर रोजी जागतिक बॅडमिंटन परिषदेने खेळाडूंच्या मानांकन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये श्रीकांतने ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगला मागे टाकत सर्वोत्तम 3 जणांच्या यादीत आपले स्थान पक्क केले आहे.
- किदम्बी श्रीकांतव्यतिरीक्त बी.साई प्रणीतच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या साई प्रणीतने क्रमवारीत 16वे स्थान पटकावले आहे.
- तसेच याव्यतिरीक्त एच.एस. प्रणॉयच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाहीये, तो अजुनही दहाव्या क्रमांकावर कायम राहिला आहे. समीर वर्मा, अजय जयराम आणि सौरभ वर्मा या भारतीय खेळाडूंनीही आपले स्थान कायम राखले आहे.
बीसीसीआय पाकिस्तानात क्रिकेट स्पर्धा नाहीच :
- पाकिस्तानात ‘Asian Emerging Nations Cup’ ही स्पर्धा होऊ घातली आहे. मात्र, आम्हाला न विचारता या स्पर्धेचं ठिकाण पाकिस्तानात ठरवल्याचा आरोप करत BCCI या स्पर्धेला मोडता घालण्याच्या तयारीत आहे.
- भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेला दबदबा लक्षात घेता, पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या पारड्यात माप पडेल आणि स्पर्धेचे ठिकाण बदलेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- 29 ऑक्टोबररोजी लाहोर येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला आगामी ‘Asian Emerging Nations Cup’ स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क देण्यात आले. या बैठकीला बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्याने हजेरी लावली नव्हती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दुबईत झालेल्या बैठकीत बीसीसीआयने, क्रिकेट परिषदेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
- भारताचे मत विचारात न घेता स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय घेण्यात आल्याचा बीसीसीआयचा आक्षेप आहे.
राज्यभर एसटीची पार्सल सेवा बंद :
- एसटी महामंडळाने राज्यस्तरीय असलेली पार्सल सेवा अचानक बंद केली आहे. खासगी एजन्सीने कराराचा भंग केल्याचा दावा करीत एसटी महामंडळाने करार मोडीत काढला आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाने राज्यातील हजारो पार्सल ठप्प झाले आहेत. नवीन पार्सल पाठविणाऱ्यांना खासगी कुरिअरकडे धाव घ्यावी लागत आहे.
- राज्य परिवहन मंडळाची पार्सल सेवा महामंडळाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. यासाठी पूर्वी एसटीच्या आस्थापनेवर हमाल हा कर्मचारी संवर्ग कार्यरत होता. राज्यभर कुठेही अगदी भरवशाची पार्सल सेवा म्हणून एसटीच्या पार्सल सेवेची ख्याती होती. मात्र, एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे खासगीकरण केले.
- वर्ष 2012 मध्ये राज्यातील पार्सल सेवा ‘अंकल पार्सल सर्व्हिसेस’ या खासगी संस्थेला देण्यात आली होती. असे असतानाच एसटी महामंडळाने अचानक ही सेवा बंद करून टाकली. ‘अंकल सर्व्हिसेस’ने कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवून महामंडळाने एजन्सीकडून ही सेवा काढून घेतली आहे.
- सध्या एसटीकडे आलेल्या पार्सलचे पूर्णपूणे वितरण होईपर्यंत हीच संस्था पार्सल वितरण करणार आहे; मात्र नव्याने कुठलेही पार्सल घेण्यास कंपनीला मज्जाव करण्यात आला आहे. अचानक पार्सल सेवा बंद झाल्याने एसटीने पार्सल पाठविणाऱ्या शेकडो व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे. या व्यावसायिकांनी खासगी कुरिअरची मदत घेण्यास सुरवात केली आहे. एसटी महामंडळ नवीन एजन्सीकडे हे काम सोपविणार असल्याची चर्चा सध्या अधिकारी वर्तुळात सुरू आहे.
दिनविशेष :
- शिखांचे 10वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 मध्ये झाला.
- भारतातील ‘पहिली मालगाडी’ रुरकी येथे सन 1851 मध्ये 22 डिसेंबर रोजी सुरु करण्यात आली.
- भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला.
- 22 डिसेंबर 1921 रोजी भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
{source}
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/0K5dvNJNcgM?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}