Current Affairs (चालू घडामोडी) of 22 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘स्वच्छ भारत’साठी मोबाइल, इंटरनेटची बिले वाढणार |
2. | सरकार करणार देशभर सर्वेक्षण |
3. | केंद्रीय अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर होणार |
4. | ‘एफआयआर’ ऑनलाइन उपलब्ध होणार |
5. | दिनविशेष |
स्वच्छ भारत’साठी मोबाइल, इंटरनेटची बिले वाढणार :
-
देश स्वच्छ दिसावा यासाठी मोबाइल आणि इंटरनेट यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
-
कारण स्वच्छ भारत मोहिमेला निधि उपलब्ध करून देण्यासाठी सरकार टेलिकॉम सेवांवर उपकर (सेस) लावण्याच्या विचारात आहेत.
-
अशाप्रकारचा कर टेलिकॉम सेवांवर लावण्याच्या बाबतीतील शक्यता पडताळण्याच्या दृष्टीने सरकारने अटॉर्नि जनरलकडून यासंदर्भातली मत मागवले आहेत.
-
स्पेक्ट्रम आकारणीअंतर्गत दूरसंचार कायद्यांतर्गत सरकारी आदेश काढून स्वच्छ भारत मोहिमेसाठी उपकर लावता येईल का याविषयी दूरसंचार विभागाणे अटॉर्नि जनरलकडून मत मागवले आहे.
-
स्वच्छ भारत मोहिमेसाठी पैसा उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपकर न लावण्याचा कायदेशीर सल्ला त्यांनी दिला आहे.
-
अशा प्रकारचा कर आकारल्यास कलम 265 अंतर्गत घटनाबाहय ठरेल असे मत अटॉर्नि जनरलने व्यक्त केले.
सरकार करणार देशभर सर्वेक्षण :
- ‘टाइमपास‘ म्हणून भारतीय काय करतात या संदर्भात सरकार देशभर सर्वेक्षण करणार आहे.
- भारतीयांच्या झोपेच्या वेळा, शाळा महाविद्यालयातील मुले-मुली किती वेळ अभ्यासाला देतात, घरकाम करणार्या महिलेला घरकाम करून स्वतःसाठी कितपत वेळ मिळतो, भारतीय नागरिक दिवसातील 24 तास कशे घालवतात याचे सरकार सर्वेक्षण करणार आहे.
- अर्थतज्ञ एस.आर.हशीम यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
- नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन (एनएसएसओ) किंवा दुसर्या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला सादर होणार :
- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प पुढच्या महिन्यात 28 फेब्रुवारीला सादर करणार आहे.
- सरकार आणि सर्वेक्षण अहवाल 27 फेब्रुवारी तर रेल्वे अर्थसंकल्प 26 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे.
- संसदीय अर्थसंकल्प अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत चालेल.
- दुसरे सत्र 20 एप्रिलपासून ते 8 मेपर्यंत चालेल.
‘एफआयआर’ ऑनलाइन उपलब्ध होणार :
- ‘एफआयआर‘ (प्रथम खबरी अहवाल)हा दस्तऐवजी ऑनलाइन पाहण्याची, डाऊनलोड करण्याची व प्रिंटआऊट काढण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्यायची की नाही याबद्दल 10 आठवड्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायमूर्ती अरुण चौधरी आणि प्रदीप देशमुख यांना दिलेत.
- उच्च न्यायालयचाही एक निर्णय आहे त्यात ‘एफआयआर’ची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देता येवू शकते.
दिनविशेष :
- 1963 – डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना.
- 1972 – राजनीतीज्ञ आणि शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.