Current Affairs of 22 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 जानेवारी 2018)
मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत :
- मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या संदर्भातली घोषणा केली आहे.
- केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकानुसार ही माहिती समोर आली आहे. अचल कुमार ज्योती यांच्या जागी आता ओम प्रकाश रावत आता काम पाहतील.
- अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपतो आहे. त्याचमुळे ओम प्रकाश रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ज्योती यांच्या आधी नसीम जैदी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचा कार्यकाळ जुलै 2017 मध्ये संपला होता. त्यानंतर अचल कुमार ज्योती यांनी हे पद स्वीकारले. आता ज्योती यांचा कार्यकाळ संपल्याने ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद :
- एस.व्ही.जे.सी.टी क्रीडा संकुल डेरवण येथे सुरु असलेल्या 63व्या राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राने 50 गुणांची कामे करीत सर्व साधारण विजेतेपद पटकावले.
- महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल 43 गुण मिळवत तर मुलांच्या गटात दिल्लीने 31 गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक संपादन केला.
- या स्पर्धेत मुली गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान केंद्रीय विद्यालयाच्या गौतमी शेट्टीने तर मुलांच्या गटात विभागून दिल्लीच्या मनीष कुमार आणि शौर्य राजपूत यांनी संपादन केला.
- गेले तीन दिवस डेरवण येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक्स स्पर्धेचा शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकाची कमाई करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.
आप सरकारच्या 20 आमदारांचे सदस्यत्त्व रद्द :
- लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या वीस आमदारांचे सदस्यत्त्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केले आहे. अर्थातच त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातो आहे.
- निवडणूक आयोगाने कारवाई करत लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या 20 आमदारांना राष्ट्रपतींनी अपात्र ठरवावे अशी शिफारस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य करत 20 आमदारांना अपात्र ठरवले आहे.
- 19 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातली शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ही शिफारस मान्य करण्यात आली आहे.
भारतीय संविधान हेच सर्वोच्च सार्वजनिक धोरण :
- भारतीय संविधान हेच सर्वोच्च सार्वजनिक धोरण असून ती तयार करणाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती न्या. चेलमेश्वर यांनी केले.
- तरुणांनी भारतीय संविधानाचा आदर केला पाहिजे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागातून संविधानाला मूर्त स्वरुप मिळाले आहे. भारतीय युवकांना याची जाण असायला पाहिजे, असे न्या. चेलमेश्वर यांनी सांगितले.
- तसेच यावेळी त्यांनी भारतीय संविधान तयार करताना संविधान सभेच्या सदस्यांनी घेतलेल्या अपरिमित मेहनतीचाही उल्लेख केला. संविधान सभेतील सदस्यांना असणारे अनेक विषयांचे ज्ञान आणि त्यांच्या समृद्ध अनुभवामुळेच भारतीय घटनेचा परिपूर्ण आराखड तयार करणे शक्य झाले.
- याद्वारे त्यांनी देशाचे राजकीय भविष्य कसे असावे, याचा आराखडा आखून दिला. त्यामुळे जोपर्यंत आपल्या देशाचा कारभार घटनेनुसार सुरू राहील तोवर आपली धोरणे व्यापक घटकांना विचारात घेऊन आखली जावीत, असे न्या. चेलमेश्वर यांनी म्हटले.
उक्षी येथील हत्तीच्या कातळशिल्पाचे लोकार्पण :
- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील 16 बाय 18 फुटी हत्तीचे कातळ खोदशिल्प 21 जानेवारी पासून लोकांना पाहण्यासाठी खुले झाले. ग्रामपंचायत व लोकसहभागातून कोकणात प्रथमच या खोदशिल्पाचे संरक्षण केले आहे.
- रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांतील 43 गावांत 71 ठिकाणी 950 खोदशिल्प आढळली आहेत. सुमारे दहा हजार ते 35 हजार वर्षांपूर्वीची ही शिल्पे म्हणजे जागतिक वारसा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शासनाच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे.
- गेल्या तीन वर्षांपासून कातळशिल्पांवर मोठे संशोधन सुरू आहे. सरपंच मिलिंद खानविलकर व उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांनी लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधला आहे. त्याशेजारी चबुतरा बांधला असून त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते.
भारताने अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला :
- अंधांच्या विश्वचषक 2018 यास्पर्धेत भारताने 20 जानेवारी रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले.
- शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला.
- पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 308 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान दोन गडी राखून पार केले.
दिनविशेष :
- डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय सन 1963मध्ये 22 जानेवारी रोजी स्थापन झाले.
- ‘सर्व मित्र सिकरी’ यांनी भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून 22 जानेवारी 1971 रोजी कार्यभार सांभाळला.
- आय.एन.एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात 22 जानेवारी 2001 मध्ये दाखल झाली.
- बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत हरियाणा येथे झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा