Current Affairs of 22 June 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी 22 जून 2015 :

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विक्रमांची नोंद :

  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर करण्यात आलेल्या योग कार्यक्रमाच्या नावावर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विक्रमांची नोंद झाली.
  • 1. या कार्यक्रमात एकाचवेळी 35,985 नागरिकांनी भाग घेतला.
  • 2. दुसरा विक्रम म्हणजे या कार्यक्रमात 84 देशांचे नागरिक सहभागी झाले होते.
  • यापूर्वी हा विक्रम विवेकानंद केंद्राच्या वतीने 19 नोव्हेंबर 2005 रोजी ग्वाल्हेर येथे आयोजित योगशिबिराच्या नावावर होता.
  • या शिबिरात 29,973 लोकांनी सहभाग घेतला होता.
  • गिनिज बुकने किमान 50 देशांचे नागरिक एखाद्या योग कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विक्रमाची नोंद करण्याचे ठरविले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 21 जून 2015

काळा पैसा असलेल्या देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :

  • काळ्या पैशाचे माहेरघर असलेल्या स्वित्र्झलडमध्ये भारतातील काही लोकांचा काळा पैसा असला तरी तेथे काळा पैसा असलेल्या देशांच्या यादीत भारताचे स्थान 61 पर्यंत खाली आले आहे.
  • तर पाकिस्तान 73 व्या स्थानावर आहे.
  • जगातील 1.6 अन्त्य डॉलर्स इतका काळा पैसा स्वित्र्झलडमध्ये असून त्यात केवळ 0.123 टक्के भारतीय पैसा आहे.
  • स्वीस बँकांच्या ग्राहकांत ब्रिटन व अमेरिका आघाडीवर असून यूबीएस व क्रेडीट सुसी या दोन बँकात दोन तृतीयांश काळा पैसा ठेवलेला आहे.
  • या दोन बँकात भारतीयांचा 82 टक्के काळा पैसा आहे.
  • स्वीस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा स्वीस बँकांतील काळा पैसा 10 टक्क्य़ांनी कमी झाला असून तो 2014 मध्ये 1.8 अब्ज स्वीस फ्रँक (1.98 अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे 12615 कोटी रुपये) इतका होता.
  • स्वित्र्झलडमधील काळ्या पैशात पहिल्या दहा देशात ब्रिटन, अमेरिका, वेस्टइंडिज, गुर्नसे, बहामाज, लक्झेमबर्ग, फ्रान्स, जेरेसी व हाँगकाँग यांचा समावेश आहे.

2005 पूर्वीच्या पाचशे व हजाराच्या चलनी नोटा बदलवून मिळणार :

  • 2005 पूर्वीच्या पाचशे व हजाराच्या चलनी नोटा असतील तर त्यांनी त्या येत्या 10 दिवसात बँकेत जमा करून बदलून घेणे आवश्यक आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.
  • 2005 पूर्वीच्या या नोटा चलनातून काढून घेण्यात येत असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे.
  • ग्राहकांनी त्यांच्या नजीकच्या बँकेत जाऊन या नोटा जमा कराव्यात असे सांगण्यात आले आहे.
  • यापूर्वी 1 जानेवारीची मर्यादा दिली होती, ती नंतर वाढवण्यात आली.
  • बँकांमध्ये 2005 पूर्वीच्या पाचशे व हजाराच्या नोटा जमा केल्यास त्याचे पूर्ण पैसे मिळणार आहेत.
  • या नोटांवर विरूद्ध बाजूला छपाईचे वर्ष नसेल तर त्या 2005 च्या नोटा आहेत असे समजावे.
  • तसेच 2005 नंतरच्या नोटांवर विरूद्ध बाजूला नोटांच्या छपाईची तारीख तळाशी दिलेली आहे.
  • 2005 पूर्वीच्या नोटा सुरक्षित नाहीत त्यामुळे त्या काढून घेण्यात येत आहेत.

फेसबुक, व्हॉट्स अँपसह सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविणारे संदेश पाठविणार्‍यांना सहा महिन्यांची शिक्षा :

  • फेसबुक, व्हॉट्स अँपसह सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविणारे संदेश पाठविले जातात.

  • या संदेशांमधून भीती दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.
  • हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत मोडत असून, असे संदेश पाठविणार्‍यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिला आहे.
  • हा कायदा लागू होऊन 1 वर्ष 10 महिने झाले आहेत.

आता मतदान यंत्रांवर दिसणार उमेदवारांचे छायाचित्रही :

  • देशातील मतदानप्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी तसेच मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी यापुढे मतदान यंत्रणामध्ये उमेदवारांच्या नावापुढे पक्षाचे चिन्ह तसेच छायाचित्रही देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
  • अशा प्रकारचा प्रयोग सर्वप्रथम केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, तामिळनाडू आणि त्रिपुरा येथे 27 जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीदरम्यान करण्यात येणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मतदान यंत्रणांवर उमेदवारांचे आणि उमेदवारांच्या पक्षाचे चिन्ह यामध्ये उमेदवाराचे छायाचित्र देण्यात येणार आहे.

भारत टांझानियातील गॅस क्षेत्राचा विकास करणार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जकाया मृशो किक्वेते यांच्यात 19 जून रोजी द्विपक्षीय मुद्यांवर व्यापक चर्चा झाली.
  • टांझानियातील नैसर्गिक वायू क्षेत्र विकासासाठी मदतीचा प्रस्ताव भारताने यावेळी ठेवला, शिवाय आफ्रिकी देशातील लोकांना ई-पर्यटन व्हिसा सुविधा देण्याचा निर्णयही जाहीर केला.
  • मोदी-किक्वेते यांच्यातील चर्चेदरम्यान उभय देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात परस्पर सहकार्यासाठी एक संयुक्त कृती समूह गठित करण्याचा निर्णय घेतला.
  • तसेच विविध क्षेत्रातील द्विपक्षीस संबंध दृढ करण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त ‘ऑपरेशन डोगा’ :

  • आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या 21 जून रोजी राजपथवर होणाऱ्या समारंभादरम्यान कडेकोट सुरक्षा बंदोबस्तासाठी सशस्त्र दलातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याचे नामकरण ‘डोगा’असे करण्यात आले आहे.
  • ऑपरेशन डोगाअंतर्गत दिल्लीतील हा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात येईल आणि सुरक्षा बंदोबस्तात प्रशिक्षित श्वान तैनात केले जातील.
  • निमलष्करी दल आयटीबीपीचे श्वानपथक यात महत्त्वाची भूमिका वठविणार आहे. त्यामुळे ‘डॉग’आणि ‘योग’ या दोन शब्दांचा मेळ घालून ‘डोगा’ (DOGA) असे नाव देण्यात आले आहे.
  • इंडिया गेट ते राजपथ या मार्गावरील मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांसह 40,000 लोक सहभागी होणार आहेत.
  • आयटीबीपीच्या श्वानपथकाने यापूर्वीही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

चीनने केली विजेवर चालणाऱ्या विमानाची निर्मिती :

  • जगात विजेवर चालणाऱ्या पहिल्या विमानाची निर्मिती चीनने केली असून त्याला हवाई उड्डाण सक्षमतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. बीएक्स 1 इ असे या विमानाचे नाव असून त्याचे पंख 14.5 मीटर लांब आहेत तर त्यातून 230 किलो वजन वाहून नेता येते.
  • हे विमान तीन हजार मीटर उंचीवरून उडते. दोन तासांत विमानाचे चार्जिग होते व नंतर ते 45 मिनिटे ते 1 तास उडू शकते, या विमानाचा ताशी वेग 160 कि.मी. आहे.
  • शेनयांग एरोस्पेस युनिव्हर्सिटी व लायोनिंग जनरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅकॅडमी यांनी हे विमान तयार केले आहे. पहिली दोन विमाने लायोनिंग रूक्सीयांग जनरल अ‍ॅव्हिएशन लि या कंपनीला विकण्यात आली आहेत.
  • वैमानिक प्रशिक्षण, पर्यटन, हवामानशास्त्र व मदतकार्य या क्षेत्रात या विमानाचा उपयोग होऊ शकतो. या विमानाची किंमत 10 लाख युआन म्हणजे 1,63,000 डॉलर्स आहे. आतापर्यंत अशा 28 विमानांची मागणी नोंदण्यात आली आहे.

उत्तेजकसेवनात भारत तिसऱ्या स्थानावर :

  • क्रीडा क्षेत्राला काळिमा असलेल्या उत्तेजक सेवन प्रकरणांमध्ये भारताला जगात तिसरे स्थान देण्यात आले आहे.
  • जागतिक उत्तेजक द्रव्यसेवनविरोधी संस्था (वाडा) ने 2013 वर्षांसाठीच्या मांडलेल्या अहवालात सर्वाधिक उत्तेजक सेवन क्रीडापटूंच्या यादीत रशिया अव्वल तर टर्की दुसऱ्या स्थानी आहे.
  • 2013 मध्ये भारताचे 91 खेळाडू उत्तेजक सेवन चाचणीत दोषी सापडले होते. राष्ट्रीय उत्तेजक सेवन विरोधी संघटनेकडे उत्तेजक सेवनाची 93 प्रकरणे आली होती. यापैकी 90 प्रकरणांमध्ये क्रीडापटू दोषी असल्याचे ‘वाडा’च्या सखोल परीक्षणानंतर स्पष्ट झाले.
  • ‘वाडा’ने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय व्यापक असा अहवाल तयार केला आहे. उत्तेजक सेवन संदर्भातील हा सगळ्यात अद्ययावत अभ्यास आहे.

दिनविशेष :

  • 1856 – इतिहासकार रामचंद्र भिकजी जोशी यांचा जन्म.
  • 1897 – क्रांतिकारी दामोदर हरी चाफेकर यांनी रॅण्ड आणि आयरेस्ट यांची गोळ्या घालून हत्या केली.
  • 2002 – इराणच्या उत्तरेकडील भागात भीषण भूकंपात 261 नागरिकांचा मृत्यू.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 23 जून 2014

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago