चालू घडामोडी (22 जून 2017)
राज्यात दहा सिंचन प्रकल्पांना मान्यता :
- राज्यातील नऊ जिल्ह्यांतील 10 जलसिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पांद्वारे राज्यातील 1 लाख 16 हजार 386 हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
- तिलारी आंतरराज्य प्रकल्प सिंधुदुर्ग 6656 व गोवा 14,521 हेक्टर, उर्घ्व प्रवरा प्रकल्प अहमदनगर नाशिक, सांगोला शाखा कालवा पुणे, सातारा व सोलापूर, अजुर्ना मध्यम प्रकल्प रत्नागिरी, रापापूर लापा प्रकल्प नंदुरबार, चिंचपाणी लापा प्रकल्प जळगाव, बबलाद कोपबं सोलापूर, सोरेगांव लापा प्रकल्प सोलापूर, दरिबड लापा प्रकल्प सांगली, पिंपळगांव खांड लापा प्रकल्प अहमदनगर अशा एकूण 10 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
चीनच्या ईस्ट होप समूहासोबत भारताच्या अदानी समूहाचे करार :
- चीनमधील सर्वात मोठ्या खासगी कंपनीपैकी एक असलेल्या ईस्ट होप समूहासोबत भारताच्या अदानी समूहाने 30 कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचा करार केला. याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत.
- गुजरातमध्ये विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत (एसईझेड) हे प्रकल्प उभे राहणार आहेत.
- शांघाई येथील भारतीय वाणिज्यदूतांनी सांगितले की, अदानी आणि ईस्ट होप यांच्यातील करारानुसार, गुजरातच्या मुंद्राक विशेष आर्थिक क्षेत्रात सौरऊर्जा उत्पादन उपकरण, रसायन, अॅल्युमिनियम आणि पशुखाद्यनिर्मिती संच उभारण्यात येणार आहेत.
- तसेच उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी ईस्ट होप समूहाचा इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रियल विभाग कार्यरत असणार आहे.
देशातल्या पहिल्या ट्रेडमार्कचा दर्जा मुंबईतील ताजला :
- गेट वे ऑफ इंडियाजवळच्या ‘ताज महाल पॅलेस’ हॉटेलच्या बिल्डिंगला ‘ट्रेडमार्क’चा दर्जा मिळाला आहे.
- न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचा आयफेल टॉवर, सिडनीचे ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या वास्तूंच्या पंगतीत आता मुंबईतला ताज महाल पॅलेसही जाऊन बसला आहे.
- 114 वर्षं जुनी असलेली ताजमहाल पॅलेस हॉटेलची बिल्डिंग ट्रेडमार्क लाभलेली भारतातील एकमेव वास्तू आहे.
- एखाद्या ब्रँडचा लोगो, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी अशा गोष्टींचे ब-याचदा ट्रेडमार्क होत असतात.
- भारतात ट्रेडमार्क अॅक्ट 1999 पासून लागू करण्यात आला आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाचा मुंबईतल्या ताजमहाल पॅलेस या हॉटेलच्या बिल्डिंगला ट्रेडमार्कचा दर्जा देण्यात आला आहे.
- ताज महाल पॅलेस हॉटेलमधल्या वास्तूरचनेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आम्ही ट्रेडमार्कचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केल्याचंही ताजमहाल पॅलेस चालवणाऱ्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे जनरल काऊन्सिल राजेंद्र मिश्रा म्हणाले आहेत.
‘उबर’चे सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक यांचा राजीनामा :
- वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उबर कंपनीचे सीईओ आणि संस्थापक ट्रॅव्हिस कॅलनिक यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
- महिला कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांवर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे ट्रॅव्हिस हे अचानकपणे सुट्टीवर गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता.
- अमेरिकेतील वृत्तपत्र असलेल्या न्यूयार्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उबर कंपनीचे सीईओ ट्रॅव्हिस कॅलनिक यांनी राजीनामा दिला असून त्यांनी कंपनीला ‘राम-राम’ ठोकला आहे.
दिनविशेष :
- महानुभाव साहित्य संशोधक ‘डॉ. विष्णू भिकाजी कोलते’ यांचा जन्म 22 जून 1908 मध्ये झाला.
- 22 जून 2001 हा भारतीय अर्थतज्ञ डॉ. अरुण घोष यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा