चालू घडामोडी (22 मार्च 2016)
21 राज्यांत अन्नसुरक्षा कायदा :
- एक एप्रिलपासून आणखी दहा राज्यांमध्ये अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले.
- तसेच या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची एकूण संख्या 21 होणार आहे.
- एक एप्रिलपासून मात्र गुजरातसह 1 राज्यांमध्ये या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे.
- डिजिटायझेशन, आधार कार्ड, रेशन कार्डला जोडले जाणे, संगणकीकृत यंत्रणा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबी या राज्यांनी पूर्ण केल्या आहेत.
- देशभरातील एकूण 24 कोटी 18 लाख 50 हजार रेशन कार्डांपैकी 99.90 टक्के रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात केले असून, 48 टक्के रेशन कार्ड आधार कार्डला जोडण्यात आले आहेत.
रेल्वेची पहिली ब्रॉडगेज मालगाडी मिझोराममध्ये दाखल :
- गुवाहाटीहून 2600 मेट्रिक टन तांदूळ घेऊन येणारी रेल्वेची पहिली ब्रॉडगेज मालगाडी (दि.21) मिझोरामच्या बैराबी स्थानकात दाखल झाली.
- राज्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मत मिझोरामचे परिवहन मंत्री जॉन रोतुआंग्लीना यांनी व्यक्त केले.
- मालगाडीतून मोठ्या प्रमाणात तांदूळ आल्यामुळे मिझोराम-आसाम सीमेवरच्या बैराबीमध्ये अन्न स्वस्त दराने उलब्ध होऊ शकेल.
- आसामच्या सिल्चर शहरातून मिझोरामला देशाबरोबर जोडणारा राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 54 हाच सध्या मिझोरामचा दळणवळणाचा मुख्य आधार आहे.
- तसेच लोहमार्गामुळे वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे.
चीन पासून नेपाळला जोडणारा रेल्वेमार्ग :
- चीन व नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात नेपाळचे पंतप्रधान के पी ओलि यांनी केलेली विनंती मान्य करण्यात (दि.21) आली.
- ओलि हे सध्या चीनच्या सात दिवसीय दौऱ्यावर असून (दि.21) या दोन देशांमध्ये दहा महत्त्वपूर्ण करार झाले.
- चीन व नेपाळमधील रेल्वेमार्गामुळे नेपाळचे भारतावरील भूराजकीय अवलंबित्व कमी होणार असल्याचे मानण्यात येत आहे.
- नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या आंदोलनावेळी येथील भारतीय वंशाच्या मधेसी समुदायाने भारत व नेपाळमधील मार्ग रोखून धरल्याने नेपाळमधील जनजीवन विस्कळित झाले होते.
- तसेच या पार्श्वभूमीवर, नेपाळ व चीनमधील दळणवळणाच्या मार्गांचा अधिकाधिक विकास करण्यासाठी नेपाळमधील नेतृत्व प्रयत्नशील आहे.
- नेपाळमध्ये एक विमानतळ व या दोन्ही देशांस जोडणाऱ्या एका पुलाच्या निर्मितीसाठी चीन विशेष आग्रही आहे.
देशात वाहन उद्योगावर ‘मारुती’चे वर्चस्व :
- देशातील अनेक मोटार उत्पादक कंपन्या आपल्या विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत असताना मारुती सुझुकीला मात्र वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी कायम राखण्यात यश आले आहे.
- कंपनीची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी मागील 14 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे.
- केवळ मारुती व ह्युंडाई कंपन्यांची बाजारपेठेत एकत्रितपणे 64 टक्के हिस्सेदारी आहे.
- उर्वरित सर्व कंपन्यांची मिळून 36 टक्के हिस्सेदारी आहे.
- विशेष म्हणजे, इतर कोणत्याही मोटार उत्पादक कंपनीची वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी नाही.
- तिसऱ्या क्रमांकाची मोटार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचीदेखील बाजारपेठेत केवळ 8.26 टक्के हिस्सेदारी आहे.
- मारुती सुझुकीचे सेल्स व मार्केटिंग विभागाचे कार्यकारी संचालक आर एस कलसी यांच्या मते, विविध कारणांमुळे कंपनीची बाजारपेठेतील हिस्सेदारी वाढण्यास मदत झाली आहे.
- ‘यंदा कंपनीने 200 विक्री शोरुम्स व 125 नेक्सा(प्रिमियम)’ शोरूम्सची सुरु केली आहेत.
- देशात विक्री होणाऱ्या आघाडीच्या पाचही मोटारी मारुती सुझुकीच्या आहेत.
अॅपलचा सर्वात स्वस्त ‘आयफोन SE’ लॉन्च :
- अॅपलने आपला सर्वात स्वस्त ‘आयफोन SE’ अखेर लॉन्च केला आहे, गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा सुरु होती.
- अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या उपस्थितीत आयफोन SE लॉन्च करण्यात आला.
- तसेच या आयफोनची किंमत 30 ते 35 हजारापर्यंत असणार आहे.
- भारतामध्ये एप्रिल महिन्यात फोन उपलब्ध होणार आहे.
- मे महिन्याच्या अखेरपर्यंत जगातील 110 देशांमध्ये आयफोन SE उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
- आयफोन SE सोबत आयपॅड प्रो आणि आयवॉचचे चार नव्या रंगातील व्हेरिएंटही लाँच करण्यात आले.
जगातील सर्वात मोठा ‘एअरक्राफ्ट’ :
- जगातील सर्वात मोठं एअर क्राफ्ट ‘एअर लॅण्डर-10’च अनावरण करण्यात आलं.
- तसेच त्यानंतर ‘एअर लॅण्डर-10’ ची पहिली टेस्ट घेण्यात आली, ती यशस्वीरित्या पार पडली.
- विशेष म्हणजे हे ‘एअर लॅण्डर-10’ कुठेही ल्रॅण्ड होऊ शकते.
- ‘एअर लॅण्डर-10’ या एअरक्राफ्ट निर्मिती युकेतील ब्रिटीश कंपनी हायब्रीड एअर व्हीकल्सने केली आहे.
- दरम्यान, या ‘एअर लॅण्डर-10’ ला बनवणा-याने असा दावा केला आहे की, हे एक साउंड प्रूफ आणि इकोफ्रेंडली एअरक्राफ्ट आहे.
- तसेच त्याच्या बॉडी आणि टेक्सचर विषया सांगायलं झालं तर हे 26 मीटर ऊंच आणि 44 मीटर रुंद आहे, त्याची लांबी 92 मीटर आहे.
- एकावेळेस हे 48 प्रवासी आणि 50 टन माल घेवून 92 मैल प्रतितासाच्या वेगानं उडू शकतं.
दोन वर्षात राज्यातील 12,433 औद्योगिक कंपन्यांना टाळे :
- राज्यात गेल्या दोन वर्षात तब्बल 12 हजार 433 औद्योगिक कंपन्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
- राज्यातील महागड्या वीज दरामुळे उद्योग परराज्यात जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अनिल भोसले, किरण पावसकर, संदीप बाजोरिया आदी सदस्यांनी विचारला होता.
- राज्यातून 2013-14 मध्ये औद्यागिक ग्राहकांच्या वीज वापरात मोठ्या प्रमाणावर घट झाली असली तरी 2014-15 मध्ये औद्यागिक वीज वापरामध्ये 5.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- महावितरण कंपनीचा औद्यागिक ग्राहकांसाठीचा वीजदर सर्वात कमी असल्याचा दावा उर्जा मंत्री बावनकुळे यांनी केला.
- औद्योगिक ग्राहकांसाठी टाटा पॉवर 8.40 रुपये प्रति युनिट तर रिलायन्स कंपनी 7.27 रुपये प्रति युनिट इतका दर आकारते.
- तसेच यातुलनेत महावितरणचा दर 7.21 रुपये असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा