Current Affairs of 22 November 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2015)
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय :
- राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे नोव्हेंबर 2015-2016च्या खरीप आणि रब्बी हंगामांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या 14 हजार 708 दुष्काळग्रस्त गावांतील आर्थिक दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.
- कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागांतील 14 हजार 708 दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त गावांतील ईबीसीधारक विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व परीक्षा मंडळांचे परीक्षा शुल्क या निर्णयामुळे माफ होणार आहे.
- राज्यातील 2015-2016च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
- त्यानुसार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
सागरी उत्पादनांसाठी लवकरच एकछत्री योजना :
- देशांतर्गत गोड्या पाण्यातील मासेमारी, सागरी उत्पादने, खोल पाण्यातील मासेमारी या सर्वांसाठी एकच योजना अमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, नीलक्रांती : सर्वसमावेशक विकास आणि मत्स्य व्यवस्थापन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
- जागतिक मासेमारी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी ही घोषणा केली.
- भारतातील मत्स्योद्योगाची वाढ, विविध योजनांची तातडीने अंमलबजावणी होण्याची गरज लक्षात घेऊन मंत्रालयाने विद्यमान सर्व योजनांना एकत्र करून एक सर्वसमावेशक योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे.
- या योजनेमध्ये राष्ट्रीय मत्स्योद्योग विकास महामंडळांच्या सर्व उपक्रमांचा समावेश असेल.
प्रजासत्ताक दिनाला अध्यक्ष म्हणून फ्रान्सचे फ्रान्स्वा ओलॉंद :
- प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद हे अध्यक्ष म्हणून येण्याची दाट शक्यता आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ओलॉंद यांना हे निमंत्रण दिले होते निमंत्रण स्वीकारल्याची माहिती भारत दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस यांनी दिल्याचे समजते.
- या वर्षी झालेल्या प्रजासत्ताक दिनाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि चीनच्या प्रमुखांची भेट :
- मलेशियामध्ये सुरू असलेल्या 13 व्या आसियान- भारत परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि चीनच्या प्रमुखांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
- या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंध हा प्रमुख मुद्दा होता.
- ऍबे हे 11 डिसेंबरला भारतात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व होते.
‘मन की बात’ हा कार्यक्रम 29 नोव्हेंबरला होणार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ‘मन की बात’ हा रेडिओवरून जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम 29 नोव्हेंबरला होणार आहे.
- ‘मन की बात’मध्ये मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत, ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
- पंतप्रधान दर महिन्यात रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती देतात.
- मोदींनी यापूर्वी “वन रॅंक, वन पेन्शन”, “काळा पैसा”, “शेतकरी‘, “परीक्षा” अशा विविध विषयांवर “मन की बात” या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.
राजेंद्र दर्डा यांच्या संकेतस्थळाचे उदघाटन :
- लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com या संकेतस्थळाचे उदघाटन त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
- सन 2000 मध्ये त्यावेळच्या तंत्रज्ञानासह हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले.
- त्यानंतर सर्वसामान्यांशी थेट आदान-प्रदान करणा-या फीचरसह 2012 मध्ये हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले.
- आता माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे संकेतस्थळ पाहण्याचे माध्यमही बदलले आहे.
- त्यामुळे डेस्कटॉपसह स्मार्टफोन व टॅब्लेटवर सहज पाहता येईल अशा फीचर व आकर्षक डिझाईनसह डायनामिक स्वरूपात rajendradarda.com हे संकतेस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे.
चीनने लढाऊ ड्रोन विमान तयार केले :
- चीनने अत्यंत मजबूत असे लढाऊ ड्रोन विमान तयार केले असून ते टेहळणीही करू शकणार आहे.
- याच वर्षी चीनने या ड्रोन विमानाचे उड्डाण यशस्वी केले असून ते तीन हजार किलोचे वजन सहज वाहून नेऊ शकते. चीनच्या लष्कराने सीएच 5 हे लढाऊ व टेहळणी ड्रोन सादर केले असून ते चायना अॅकॅडमी ऑफ एरोस्पेस अँड एरोडायनॅमिक्स या संस्थेने तयार केले आहे.
- त्याचे उत्पादन मात्र चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कार्पोरेशन या ग्वांगडाँग राज्यातील शेनझेन येथे असलेल्या कंपनीने केले आहे.
- इतर लष्करी ड्रोनशी तुलना करता चीनचे सीएच 5 हे लष्करी ड्रोन विमान 3000 किलो वजन व 900 किलो साधनसामग्री वाहून नेऊ शकते.
- इतर ड्रोन विमाने केवळ 1500 किलो वजन वाहून नेऊ शकतात.
- त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने जास्त टेहळणी सामग्री त्यावर ठेवता येते व ते ड्रोन विमान 80 कि.मी.च्या त्रिज्येत कुठेही फिरू शकते, असे या अॅकॅडमीचे अभियंता लॅन वेन्बो यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसामच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती :
- केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसामच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून ते पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत.
- आसाममध्ये निवडणुका होणार असून सोनोवाल यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुखपदही सोपविण्यात आले आहे.
दिनविशेष :
- 1943 : दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.
- 1943 : लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- 1977 : ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क काँकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.
- 1998 : आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
- 2005 : एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.