चालू घडामोडी (23 जानेवारी 2016)
नेताजी बोसांनाही होते फॅसिझमचे आकर्षण :
- देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीपुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्त्चाविषयी आजही भारतीय जनमानसात मोठे आकर्षण दिसून येते.
- नेताजी स्वातंत्र्य लढ्याला केवळ आक्रमक रूप देऊन थांबले नाहीत; तर स्वातंत्र्यानंतर आपला देश कसा असावा, याचा ठोस आराखडाही त्यांनी तयार केला होता, त्यांच्या मनामध्ये फॅसिस्ट विचारसरणीचेही सुप्त आकर्षण होते.
- स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील कम्युनिस्ट नेते रजनीपम दत्त यांनी 24 जानेवारी 1938 मध्ये लंडनच्या ‘डेली वर्कर’ या दैनिकासाठी नेताजींची मुलाखत घेतली होती.
- तसेच यामध्ये नेताजींनी समाजवाद आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या आकर्षणाचा स्पष्टपणे उल्लेख केला होता, याचे नेमके प्रतिबिंब त्यांनी 1935 मध्ये लिहिलेल्या ‘दि इंडियन स्ट्रगल’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथामध्ये उमटलेले दिसून येते.
ओडिशात डॉल्फिनची गणना :
- ओडिशातील भीतरकणिका राष्ट्रीय उद्यानात डॉल्फिनची गणना येत्या 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
- सलग दुसऱ्या वर्षी ही गणना करण्यात येत आहे, असे राजनगर खारफुटी वन व वन्यजीव विभागाचे अधिकारी विमल प्रसन्न आचार्य यांनी सांगितले.
- ओडिशाच्या किनारपट्टीवरील धमरानदीपासून देवीनदीच्या मुखापर्यंतच्या भागात दिसणाऱ्या डॉल्फिनची मोजणी यात करण्यात येणार आहे.
- गेल्या वर्षी झालेल्या गणनेत या भागात इरावडी, बॉटलनोज, हम्पबॅक डॉल्फिन (सॉसा चायनिसीस), हम्पबॅक डॉल्फिन (सॉसा प्लम्बिया), पॅन ट्रॉपिकल स्पॉटेड डॉल्फिन व फिनलेस पॉर्पाइज अशा डॉल्फिनच्या सहा जाती आढळल्या होत्या.
- ‘फिनलेस पॉर्पाइज’ जातीचा एक डॉल्फिन हुकीतोला येथे तर अन्य जातींचे डॉल्फिन गहिरमाता अभयारण्यात आढळले. ‘हम्पबॅक डॉल्फिन’ सर्वाधिक संख्येने येथे आहेत, ओडिशा किनारपट्टीवर डॉल्फिनच्या सुमारे 12 जाती आढळतात.
400 रेल्वे स्थानके वाय-फाय :
- जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे मुंबई सेंट्रल स्थानकातील पहिल्या वाय-फाय सेवेचा शुभारंभ (दि.22 रोजी) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
- या वेळी रेल्वेमंत्री आणि गुगलतर्फे 2018 पर्यंत 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा पुरविण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.
- भारतातील व्यस्त रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा गुगलमार्फत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
- त्यानुसार मुंबई सेंट्रल स्थानकात ही सुविधा सुरू करण्यात आली, ही वाय-फाय सेवा मोफत आहे.
रॉजर फेडररचे ‘ग्रँड’ त्रिशतक :
- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला 300 वा ग्रँडस्लॅम सामना जिंकला.
- महिला गटात अव्वल टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाच्या मारिया शारापोव्हा यांनी विजयी धडाका कायम राखताना चौथी फेरी गाठली.
‘महामना एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा :
प्रजासत्ताक दिनी राजपथावरून 27 विमानांची मानवंदना :
- प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये यंदा भारतीय हवाई दलाची 27 विमाने सहभागी होणार आहेत.
- या विमानांकडून होणाऱ्या प्रात्यक्षिकांची सुरुवात चार एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सने होणार आहे, हे हेलिकॉप्टर्स इंग्रजीतील ‘वाय’ अक्षराच्या आकाराने संचलन मार्गावरून जातील.
- दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन एमआय 35 हेलिकॉप्टर्स संचलनामध्ये सहभागी होतील. ही हेलिकॉप्टर्स ‘Vic’ आकाराने राजपथावरून जाणार आहेत. त्यानंतर तीन सी-130 जे सुपर हर्क्युलस विमाने राजपथावरून जातील.
- लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकामध्ये पाच जॅग्वार, पाच मिग-29 आणि तीन सुखोई 30 एमकेआय यांचा समावेश असेल.
- विमानांच्या साह्याने दिल्या जाणाऱ्या मानवंदनेचा शेवट हे नेहमीप्रमाणे सुखोई 30 एमकेआय जातीच्या लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांनी होणार आहे.
भारताचा विकास दर 7.3 टक्के :
- भारत यावर्षी 7.3 टक्के विकास दर राखून जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सगळ्यात वेगाने विकास दर प्राप्त करणारी अर्थव्यवस्था असेल.
- संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या अहवालात 2016 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.3 टक्के असेल.
- दक्षिण आशियाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2017 मध्ये 7.5 टक्के असेल.
- संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्धीस दिलेल्या ‘जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता 2016 या अहवालात भारताची अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगाने वाढणारी असल्याचे म्हटले आहे.
राहुल ठक्कर यांना ऑस्कर पुरस्कार :
- सुरुवातीला कोर्ट तर त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचून ऑस्करच्या स्पर्धेतून हेमलकसा बाहेर पडल्याने चित्रपटसृष्टीत कलाकार आणि सर्वच प्रेक्षकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
- मूळचे भारतीय वंशाचे असलेले आणि हॉलिवूडमध्ये काम करणारे राहुल ठक्कर यांना या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे.
- भारतीय कुटुंबावरील शॉर्टफिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड राहुल आणि त्यांचा सहकारी रिचर्स चॅग यांनी ‘अॅडव्हान्स प्लेबॅक फीचर्स’ या प्रकारात गेल्या दशकभरात भरीव कार्य केले आहे.
दिनविशेष :
- 1556 : जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला.
- 1897 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा कटक येथे जन्म.
- 1926 : बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक यांचा जन्म.
- 1950 : रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते ऑटो डायलय यांचा जन्म.
- 1996 : संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा