Current Affairs of 23 January 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (23 जानेवारी 2018)
भारतीय अर्थव्यवस्था 2018 मध्ये चीनलाही मागे टाकेल :
- जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारत यंदाच्या वर्षी (2018) चीनलाही मागे टाकून पुढे जाणार आहे. इतकेच नव्हे तर एका अहवालानुसार यावर्षी इक्विटी मार्केटमध्येही भारत जगातील पाचवा सर्वांत मोठा देश होईल. सँक्टम वेल्थ मॅनेजमेंट अहवालानुसार, ज्यावेळी जगातील इतर देश आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी झुंज देत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल. चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असेही या अहवालात म्हटले आहे.
- अशावेळी जेव्हा विकसित देश 2 ते 3 टक्क्यांनी प्रगती करत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगाने विकास करेल. त्याचबरोबर इतर उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत वेगाने विकास करेल.
- महत्वाचे म्हणजे यंदा चीनच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार आहे. इक्विटीजच्या माध्यमातून मिळणारे परतावेही 6 ते 8 टक्केपर्यंत असेल, असे या अहवालात म्हटले आहे.
Must Read (नक्की वाचा):
उल्हासनगर पालिकेची परिवहन सेवा तीन महिन्यांत :
- शिवसेनेच्या कालावधीत सुरू झालेल्या मात्र भाड्याची दरवाढ होत नसल्याने आणि त्यामुळे पालिका परिवहन सेवेचे खाजगी कंत्राटदार केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी परिवहनचा गाशा गुंडाळल्याने गेल्या चार वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगरातील परिवहन सेवा येत्या तीन महिन्यांत धावणार आहे, असे स्थायी समिती सभापती कंचन अमर लुंड आणि नगरसेवक शेरी लुंड यांनी केलेल्या या मागणीला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सकारात्मक घेताना तीन महिन्यात पालिकेची परिवहन सेवा धावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गोरगरिबांची रिक्षांच्या भुर्दंडातून सुटका होणार आहे.
- महापौरपदी शिवसेनेच्या राजश्री चौधरी असताना 2010 मध्ये पालिकेची परिवहन सेवा सुरू झाली. ही सेवा केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी तीन वर्षे हाताळली.
- मात्र, इतर शहराप्रमाणे भाडेवाढ होत नसल्याने व खड्यांमूळे बसेसच्या दुरुस्तीत बिघाड होत असल्याने कंपणी तोट्यात असल्याची ओरड करून गेमनानी यांनी परिवहन सेवेचा गाशा 2013 मध्ये गुंडाळला.
- तसेच तेव्हापासून परिवहन सेवा असल्याने शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असून, याचा फायदा रिक्षाचालक घेत आहेत.
चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग :
- आयपीएलच्या आगामी हंगामात दमदार पुनरागमन करण्याच्या हेतूने चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे.
- महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जाडेजा यांना संघात कायम राखल्यानंतर चेन्नई संघ व्यवस्थापनाने स्टिफन फ्लेमिंग यांना संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा परत आणले आहे. चेन्नई सुपर किंग्जचे विशेष कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी ही माहिती दिली.
- आयपीएलच्या पहिल्या हंगामात फ्लेमिंग चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळाडू म्हणून सहभागी होते. यानंतर पुढच्या हंगामात फ्लेमिंग यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी स्विकारणे पसंत केले.
- फ्लेमिंग यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2010 आणि 2011 या सालांमध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जने ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकल हसी याला फलंदाजी प्रशिक्षक तर लक्ष्मीपती बालाजी याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले आहे.
एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांचे सदस्यत्व रद्द होणार :
- कोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणारया मच्छीमार नौकाविरोधात कारवाईचा फास आवळला जाणार आहे.
- एलईडी लाईटचा वापर करणारया नौकां आणि त्यांना सहकार्य करणारया मच्छीमार संस्थावर कारवाई केली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.
- रात्रीच्या वेळी खोल समुद्रात मासमारी करतांना एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लाईटमुळे आकर्षति होऊन मासे जाळ्यात अलगद सापडत असत.
- मात्र यामुळे लहानमोठ्या सर्वच प्रकारच्या प्रजाती नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळे खोलसमुद्रात मासेमारी करताना एलईडी लाईटचा वापर करण्यास र्निबध घालावेत अशी माणगी रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संघटनांनी केली होती.
- पुर्वी 12 सागरी मलापासून पुढे काही अटी आणि शर्तीवर एलईडी मासेमारीला परवानगी देण्यात आली होती. आता मात्र देशभरातील कुठल्याच किनारयांवर आता एलईडी लाईट्सच्या साह्याने मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
- 10 नोव्हेंबर 2017 ला याबाबतचे एक परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले होते. मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दलाला अशा बोटींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
दिनविशेष :
- सन 1708मध्ये 23 जानेवारी रोजी छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला.
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 मध्ये झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा