चालू घडामोडी 23 जुलै 2015
जीएसटी अहवाल सभागृहाला सादर :
- देशाच्या अप्रत्यक्ष करप्रणालीत व्यापक बदल प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित वस्तू व सेवाकर विधेयकाबाबत (जीएसटी) राज्यसभेच्या निवड समितीने आपला अहवाल सभागृहाला सादर केला.
- या समितीने या घटनादुरुस्ती “जीएसटी” विधेयकातील बहुतांश भाग मान्य करतानाच तीन दुरुस्त्या सुचविल्या आहेत.
- भाजपचे भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभा निवड समितीने “जीएसटी” विधेयकावरील हा अहवाल सादर केला.
- तसेच या समितीत अनिल देसाई, डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रफुल्ल पटेल, दिलीप तिर्की, के. एन. बालगोपाल, डी. राजा, नरेश गुजराल, के. सी. त्यागी आदी सदस्य होते.
परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी ब्रेकथ्रू लिसन हा प्रकल्प सुरू :
- रशियाचे इंटरनेट उद्योजक युरी मिलनर यांनी परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी ब्रेकथ्रू लिसन हा प्रकल्प सुरू केला आहे.
- तर त्याला प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पाठिंबा दिला आहे.
- तसेच आता रशियन अब्जाधीश मिलनर यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या पाठिंब्याने परग्रहावरील जीवसृष्टी शोधण्याचा हा मोठा प्रकल्प राबवला असून त्यासाठी ते 10 कोटी डॉलर्स खर्च करणार आहेत.
- जगातील सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणी परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीकडून येणाऱ्या संभाव्य रेडिओ संदेशांचा वेध घेतील तसेच खगोलशास्त्रज्ञ लाखो तारका समूहांकडून पृथ्वीपर्यंत आलेले संदेश ऐकतील.
- किमान शंभर दीर्घिका आपल्या जवळ असून त्यांच्याकडे संदेश पाठवण्यात आलेले नाहीत.
- डॅन वेर्थीमर हे या प्रकल्पाचे सल्लागार असून माहितीचा अर्थ लावण्यासाठी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सहकार्यही लाभणार आहे. या प्रकल्पाला वर्षांसाठी 20 लाख डॉलर्स खर्च येणार आहे.
- यात काही अब्ज रेडिओ कंप्रतेच्या लहरींचा अभ्यास केला जाणार आहे.
कुराणाची सर्वात जुनी प्रत बर्मिंगहॅम विद्यापीठात असल्याचा दावा :
- मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र ग्रंथाची, म्हणजे कुराणाची सर्वात जुनी प्रत बर्मिंगहॅम विद्यापीठात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- कार्बन डेटिंग पद्धतीद्वारा या प्रतीचे आयुष्य मोजल्यानंतर ती 1370 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर आली आहे.
- ही प्रत लिहिणारी व्यक्ती प्रेषित मोहंमद पैगंबरांना भेटली असण्याची शक्यताही यानंतर व्यक्त होत आहे.
- तसेच कुराणाची ही प्रत ग्रंथालयामध्ये मध्यपूर्वेतील प्राचीन कागदपत्रे आणि ग्रंथांसमवेद तशीच ठेवली गेली होती.
- कुराणाचे काही अंश चर्मपत्रावर, पामच्या पानांवर, तसेच दगडांवरही लिहिले गेले आणि नंतर त्याचे पुस्तक रूपात सन 650 च्या आसपास एकत्रीकरण झाल्याची शक्यता थॉमस यांनी व्यक्त केली आहे.
- सन 610 ते 632 या काळामध्ये पे्रषित पैगंबरांना साक्षात्कार प्राप्त झाला व त्यातून कुराणाची निर्मिती झाली असे मानले जाते.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे होणार कमी :
- शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाने आदेश जारी केला असून, पहिल्या वर्गातील मुलांच्या दप्तराचे वजन 2 किलो तर आठव्या वर्गातील मुलांच्या दप्तराचे वजन 4.2 किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये, असे आदेश देण्यात आले आहे.
- दप्तराचे वजन या मर्यादेत राहील हे पाहणे ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे.
- राज्य सरकारने दप्तराचे वजन कमी करण्याकरिता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती.
- त्यांनी केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 20 ते 30 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.
सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर :
- ताज्या आकडेवारीनुसार देशात सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र दुसर्या क्रमांक असल्याचे जाहीर झाले आहे.
- तसेच मागील तीन वर्षांत सायबर क्राईमच्या सर्वाधिक तक्रारी व गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असून अटकेच्या कारवाईत मात्र उत्तरप्रदेश अव्वल आहे.
-
-
-
भूसंपादन विधेयक अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ :
- वादग्रस्त भूसंपादन विधेयकाशी संबंधित विविध पैलूंची समीक्षा करण्यासाठी गठित संसदीय संयुक्त समितीस आपला अहवाल सादर करण्यासाठी पुन्हा एकदा 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
- बुधवारी लोकसभेत समितीचे अध्यक्ष एस.एस. अहलुवालिया यांनी मुदवाढीबाबतचा प्रस्ताव ठेवला.
- चालू अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या समितीला आपला अहवाल सादर करायचा होता.
दिनविशेष :
- 1856 – भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, प्राच्यविधी पंडित, भगवद्गितेचे भाष्यकार, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म.
- 1906 – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतीलक्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म.